सरसेनापती प्रतापराव गुजर...
प्रतापराव गुजर हे मराठा साम्राज्याचे तिसरे सेनापती होते. यांचे खरे नाव कुडतोजी गुजर असे होतो. छत्रपती शिवाजी महाराजांकडून त्यांना 'प्रतापराव' अशी पदवी मिळाली होती.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्ऱ्यावरून परतीनंतर प्रतापराव आणि मोरोपंत पिंगळे यांनी पुरंदरच्या तहात गेलेले अनेक दुर्ग परत जिंकून घेतले. साल्हेर किल्ल्यासाठी झालेल्या समोरासमोरच्या लढाईत त्यांनी मुघल सरदार इखलास खान व बहलोल खान यांचा पराभव करून इतिहास घडविला.
लेखक :
ओंकार रामराव गुजर (सरसेनापती प्रतापराव गुजर वंशज ) प्रतापराव गुजर उर्फ
कुडतोजीराव गुजर यांबद्दल वाचू काही । कुडतोजी गुजर यांच्या गावात मुघलांचे
अत्याचार वाढत होते । कुडतोजींना हे काही सहन होत नव्हते । अखेरीस त्यांनी
लढा देण्याचे ठरवले । मुघलांविरोधात लढा देण्यास त्यांनी सुरुवात केली ।
त्याचे मुख्य उद्धिष्ट म्हणजे गावातील स्त्रियांचे रक्षण करणे ।
प्राण्यांचे रक्षण करणे आणि मुघलांना विरोध करणे । हाच त्यांचा मुख्य
कार्यक्रम असे । एकदा मुघलांच्या खनिज्यावर एकाच वेळी दोन मराठी वाघांनी
हल्ला केला । शिकार झाली । ते दोन वाघ म्हणजेच खुद्द "छत्रपती शिवाजी
महाराज" आणि दुसरे वाघ म्हणजेच "कुडतोजी गुजर" । छत्रपती शिवाजी महाराज
यांनी कुडतोजी गुजर यांना स्वराज्याचा विचार सांगितला । कुडतोजीराव खुश
झाले । त्यांनी हसत हसत महाराजांना होकार दिला । कुडतोजीराव एकदा रागाच्या
भरात आपल्या घरादाराची पर्वा न करता मुर्झाराजे यावर चालून गेले ।
कुडतोजीरावांची निडरता बघून मिर्झाराजे म्हणतो "आमच्या सोबत आपण सामील होऊन
जावा पाहिजे ते आपल्या पायात टाकून देऊ शकतो" त्यावर कुडतोजीराव म्हणाले
"आमचे स्वर्ग फक्त महाराजांच्या चरणांशी आहे" । मिर्झाराजे कुडतोजीरावांना
काहीही हानी न करता सोडून देतात । महाराज या सर्व प्रसंगावरून
कुडतोजीरावांवर रागावतात । परंतु त्यांनी केलेल्या या प्रतापी कार्यामुळे
महाराज त्यांना प्रतापराव गुजर अशी पदवी देतात । "स्वराज्याचे तिसरे
सरसेनापती प्रताराव गुजर" झाले । बहलोलखान स्वराज्यात धुमाकूळ घालत होता ।
रयतेचा छळ करत होता । त्याचा बंदोबस्त करणे गरजेचे होते । महाराज प्रतापराव
गुजरांना खानाचा वध करा असे आदेश देतात । प्रतापराव गुजर यांनी गनिमी
काव्याने खानास डोंगरदर्यातच पकडले । वेळ प्रसंग पाहून खान शरण आला ।
प्रतापराव गुजर हे मेहेरबान झाले । युद्धात शरण आलेल्याला मारू नये असे
त्यांचा शिपाईधर्म सांगत होता । त्यांनी खानास सोडून दिले । ही बातमी
छत्रपती शिवाजी महाराज यांपर्यंत पोहचली । आपल्या रयतेचे हाल करणारा
बहलोलखान जिवंत जातो याचा महाराजांना राग आला । त्यांनी एक खरमरीत पत्र
पाठवून प्रतापरावांची कान उघाडणी केली । त्या पत्रात एक वाक्य असं होतं की
बहलोलखानाला मारल्याशिवाय मला तोंड दाखवू नका । त्याकाळी मावळ्यांचा
शिवाजीमहाराजांवर असलेला जीव पाहता ही किती भयंकर शिक्षा सुनावल्या गेली
होती हे लक्षात येईल । प्रतापराव गुजर निराश झाले । दुःखी झाले । त्यांना
काय करू सुचेना । जीवाची तगमग होत होती । प्रतापरावांनी वेळ न घालवता सैन्य
घेऊन खानाचा शोध घेण्यास सुरुवात केली । त्यांनी ठरवले "खानाला
मारल्याशिवाय महाराजांना तोंड दाखवणार नाही । अशातच एके ठिकाणी सैन्याचा तळ
पडलेला होता. मन रमत नाही म्हणून जवळचे सहा सरदार घेऊन प्रतापराव शिकारीला
निघाले. काही मैल गेल्या नंतर त्यांच्या हेरांनी बातमी आणली की बहलोलखान
जवळच आहे. जवळ म्हणजे कोठे? तर हा समोरचा डोंगर ओलांडला की छावणी आहे.
प्रतापराव गुजर यांना राग अनावर झाला । सैन्य येइपर्यंत थांबने त्यांना
मंजूर नव्हते । त्यांनी आपल्या सरदारांना घेऊन चढायचा निर्णय घेतला । अवघे
सात मराठे पंधरा हजार सैन्यावर हल्ला करतात । १) विसाजी बल्लाळ २) दिपाजी
राउतराव ३) विठ्ठल पिलाजी अत्रे ४) कृष्णाजी भास्कर ५) सिद्धी हिलाल ६)
विठोटजी ७) आणि खुद्द कडतोजी, उर्फ स्वराज्याचे सरसेनापती म्हणजेच “सरनौबत”
प्रतापराव गुजर] त्यातल्या एकाचेही पाय डगमगत नाहीत । आपण मुत्यु कडे जात
आहोत हे माहिती असेल देखून ते घाबरत नाहीत । ते माघार घेत नाहीत । हे
सर्वांची ताकद म्हणजे एकच व्यक्ती "श्री छत्रपती शिवाजी महाराज" । सात ही
वीर मरण पावले । मराठ्यांच्या इतिहासात नवीन इतिहास घडला गेला होता । हे
सर्व महाराजांच्या कानी पडल्यावर महाराज दुःखी होतात । म्हणूनच तर म्हणतात
"वेडात मराठे वीर दौडले सात" । सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या
पराक्रमाला माझा मानाचा मुजरा । जय प्रतापराव गुजर । जय शिवराय । जय
महाराष्ट्र । ✍️:- ओंकार रामराव गुजर (सरसेनापती प्रतापराव गुजर वंशज )
प्रतापराव गुजर यांची समाधी कोल्हापूर जिल्ह्यातील नेसरी नावाच्या गावी (तालुका गडहिंग्लज) आहे.
कविवर्य कुसुमाग्रजांनी या प्रसंगावर लिहिलंय, ‘वेडात मराठे वीर दौडले सात.. अद्याप विराणी कुणी वा-यावर गात.. वेडात मराठे वीर दौडले सात.’
धन्य त्या जिजाऊ...
धन्य ते शिवराय...
धन्य ते शंभूराजे...
धन्य ते मावळे...
No comments:
Post a Comment