विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 20 September 2020

चिमासाहेब छञपती १८५७ च्या लढ्यातील कोल्हापूरच्या स्वातंञ योद्धांचे नेतृत्व

 


चिमासाहेब छञपती १८५७ च्या लढ्यातील कोल्हापूरच्या स्वातंञ योद्धांचे नेतृत्व . अकरा वर्षे इंग्रजांच्या कैदेत राहून ही माफी मागितली नाही . छञपती असूनही कैदेतच मरण पत्करले . या सच्च्या स्वातंञवीरांना मानाचा मुजरा!


१८५७ च्या कोल्हापूरच्या उठावाचे नेतृत्व केले म्हणून टोपड्यानी (राजर्षी शाहू महाराज खाजगीत बोलताना इंग्रजांना टोपडी म्हणायचे) या छञपतींना कराची येथे नेऊन कैदेत ठेवले होते .

आज या चिमासाहेबांच्या स्मृतीदिना निमित्तानं इतिहास संशोधन करताना माहिती कशी कणा कणाने मिळत जाते हे सांगायच आहे. मी आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत राजर्षी शाहूंच्या जीवनावरील पहिल्या फोटोबाॕयोग्राफी वर काम करत असताना माझ्याकडे संदर्भ काढायच काम होत आणि इंद्रजित शाहू छञपतींची छायाचिञे जमेल तिथून संकलीत करण्याचे काम करत होते. झपाटल्या सारखे कोल्हापूर , रायबाग, बेळगाव , महाबळेश्वर , पुणे , मुंबई ते बडोद्यापर्यंत राजर्षींच्या व सबंधीत छायाचिञांचा शोध चालू होता. या शोधाच्या भानगडीत त्यांना राजर्षींच्या काळातील राॕयल फोटोग्राफरांच्या वारसांचा शोध लागला. मग काय सारख त्या वारसांचा फाॕलोआप सुरू झाला. ते वारसही मोठ्या मनाचे योग्य मोबदला घेऊन गरजेनुसार त्यांनी काही छायाचिञे आणि काही काचेच्या निगेटिव्ह आम्हाला दिल्या. याच निगेटिव्ह मध्ये एक निगेटिव्ह होती चिमासाहेबांची. मग आम्ही हे छायाचिञ चिञमय चरिञात पहील्यांदा छापले .
परकिय गुलामगिरीतून स्वातंत्र्य होण्यासाठी ज्या चिमासाहेबांनी अकरा वर्षीची कैद भोगली त्या कैदेतच त्यांना मृत्यू झाला. अशा स्वातंञ्यवीराचे हे एकमेव छायाचिञ आम्ही शोधू शकलो व ते लोकांपर्यंत पोहचवू शकलो याचे आम्हाला समाधान आहे.

छञपती चिमासाहेब महाराजांना विन्रम अभिवादन.

डाॕ.देविकाराणी पाटील
१५ मे २०२०
कोल्हापूर.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...