विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 24 September 2020

#पवार #घराण्याची #उपनावे...

१) प्रथम मुलूखगिरी करताना काही खितांब मिळाले त्या पुढे तेच खिताब आडनाव म्हणून रुजू झाले.
१) महिपतराव २) विश्वासराव ३) मुकूटराव ४) औषधराव ५)झुंझारराव ६) धारेराव ७) धारकर..
१)आरफळकर - संत ज्ञानेश्वर अन संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळाचे मालक हैबतबाबा अरफळकर मूळचे धार पवार ग्वाल्हेरचे शिंदे सरदार यांच्या सोबत कामगिरीवर असणारे हैबतबाबा हे सातारा मधील आरफळ गावचे. श्रीमंत शितोळे सरकारांच्या मदतीने आजच्या पालखी सोहळ्याचे लष्करी स्वरूप सरदार हैबतबाबा अरफळकर यांनी दिले.
२) निंबाळकर - फलटणचे प्रसिद्ध असलेले राजघराणे मूळचे धार पवार आहे. मूळ पुरुष निंबराज पवार यांनी वसवलेल्या निंबळक गावावरून निंबाळकर उपनाव प्राप्त झाले. थोरल्या महाराणी सईबाईसाहेब याच निंबाळकर घराण्यातील.
३) विश्वासराव - हे शिवपूर्व व शिवकाळातील प्रसिध्द धार पवार घराणे. नगरदेवळे येथील पवार घराणे तसेच कोकणात राजापूर येथे कुरंग कोंडगे येथें तर पनवेल येथील काल्हे गावात विजयराव विश्वासराव (शिवनेरी किल्लेदार) यांची शाखा आहे.
४) दळवी - हे शिवकालीन धार पवार सरदार घराणे आहे. यांचे मूलस्थान कोकणात पालवणी गावात होते. मुळशी तालुक्यात आंबवणे येथील दळवी घराणे सुद्धा ऐतिहासिक आहे. दलाचे अधिपती असल्या दळवी हे आडनावं झाले.
५) ढवळे - इस १३०० च्या सुमारास अबु येथील रणधवल परमार (पवार) घराण्याचा मूळ पुरुष दक्षिणेत आला. त्यांनी ढवळ व नांदवळ गावे वसवली. ढवळचे पवार फलटणच्या निंबाळकर यांच्या पदरी सरदार होते.
६) पाणसंबळ - छत्रपती शिवाजी महाराजांचे शस्त्र-प्रशिक्षण लखोजी जाधवराव यांनी नेमलेले प्रशिक्षक सरदार गोमाजी नाईक पानसंबळ यांचेकडूनच पूर्ण झाले. गोमाजी नाईक यांनी जिजाबाई साहेब आणि बाल शिवाजी हे शिवनेरी येथे असतानाच शिवाजी राजांच्या प्रशिक्षणाची सुरूवात केली होती.
नाईक पानसंबळ हे आडनाव मराठ्यांच्या शहाण्णव कुळातील पवार कुळातील आहे. ते मध्यप्रदेशातील धार संस्थानच्या परमारराव उर्फ पवार यांचे वंशज आहेत. परमाररावांचा पुढे पवार असा अपभ्रंश होऊन, पवारातील काही लोक 'नाईक निंबाळकर' अशा पडनावाने राहू लागले. आणि याच नाईक निंबाळकर आडनावातील काही लोकांच्या आडनावात पुन्हा एकदा अपभ्रंश होऊन, ते 'नाईक पानसंबळ' असे झाल्याचे गोमाजी नाईकांच्या वंशजांमधून सांगितले जाते. सरदार गोमाजी नाईक पानसंबळ यांचे गाव अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील सडे हे असल्याचे सांगितले जाते.
७)जगदाळे - श्रीमंत जगदाळे हे धारच्या पवार घरण्याची शाखा. पानिपतच्या युध्दात आपल्या पराक्रम मूळ प्रसिद्ध. बहमनी काळापासून या घराण्याला १६८ गावाचा मसूर परगणा व देशमुखी होती. मसुरे गराडे व दौंड लिंगळे येथे दिडशे गावाची सरपाटिलकी मिळाली. जगदेवराव जगदाळे हे मूळपुरुष समजले जातात.
८) औषधराव - वैद्यकीय ज्ञान व वैद्यकीय व्यवसाय असणाऱ्या धार पवार घराण्याची हि शाखा.औषधराव म्हणजे राजवैद्य, वैद्य. हेच पुढं औषधराव चे अपभ्रंश. मावळ, मुळशी तालुक्यात या घराण्यांचे वास्तव्य आहे.
९) धारेराव - सांगली जिल्ह्यातील रेनावी गावातील आपल्या कामगिरीच्या जोरावर पवार घरण्याला धारेराव हा खितांब.
१०) धारकर- पुणे जिल्ह्यातील वाल्हे गावातील धार पवार घरण्याला धारकर हा खितांब. छत्रपती संभाजी महाराज यांच्या सोबत असणाऱ्या सरदार तुकोजीराव पवार ह्याच गावचे.
११) सोरटे - पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील हे मूळ धार पवार घराणे. आपल्या सरदारकी बरोबरोच मानशिरकरी हा खितांब. दरबारात पूर्वी सोरट हा खेळला जाई. त्यात प्राविण्य असल्याने सोरटे आडनाव.
१२) वाघळकर - सुपेकर - आपल्या वतन मिळलेल्या गावात वास्तव्यामुळे धार पवार वाघाळे येथील वाघळकर तर सुपे येथील सुपेकर म्हणून ओळखले जाऊ लागले.
१३) पंडीत - कोकणात काही गावातील मंदिरात पूजेचा मान असल्या मुळे पंडित उपणाव झाले. प्रसिध्द कासोटीपटू चंद्रकांत पंडित हे ह्याच धार पवार घराण्यातील.
१४) सावंत - कोकणात असलेले हे मूळ धार पवार घराणे. आपल्या स्वकर्तुत्वाने वर आले. १७०० साली नर्मदेच्या पलीकडे जाऊन हल्ला केलेला पाहिले मराठा सरदार हे कृष्णजी सावंत हे मूळ धार पवार.
१५) कोकणात गूढेकर , घोसाळकर , पटेल ,बणे , गढीकर , सावंत , विश्वासराव , पंडित हि धारपवार घराण्याची उपणावे...
१६) सोरटे, कवडे, पोकळे, भरम , वाघ , नातू , वैद्य ,धनवडे , धारराव,सरोदे, वाकचौरे हि पुणे जिल्ह्यातील धार पवार घरण्याची उपणावे...
१७) उत्तर भारतात पणवार , परमार , पँवार , पुवार तर गॊवा भागात पोआर असा उल्लेख करतात.
श्रीमंत राजे पवार घराणे निरंतर...!!

 

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...