शिवाजी महाराजांना रोखण्यासाठी आदिलशाहने एक कापती डाव टाकला, त्याने मुस्तफाखानला शहाजीराजांचा काटा काढण्यासाठी रवाना केले.
पण हे काम तितकेसे सोपे नव्हते, कारण दक्षिणेतल्या पाळेगार, नायकांचा पूर्ण पाठींबा शहाजीराजांना होता आणि खुद्द शहाजीराजांचा दक्षिणेत इतका दबदबा होता की आदिलशाह सुद्धा त्यांना दचकून रहात असे.
शहाजीराजांना कैद करण्यासाठी मुस्तफाखानने एक कट रचला आणि त्याने शहाजीराजांना जिंजीच्या वेढ्यात सामील होण्यासाठी आज्ञा केली.
शहाजीराजे सावध होते आणि त्यांनी वेढ्यात सामील होण्यास नाकारले.
तेव्हा मुस्तफाखान दुसरा डाव खेळला, वरकरणी नरमाईचे धोरण स्वीकारून त्याने राजांना गाफील ठेवले.
काही दिवसांनी शहाजीराजांना सुद्धा मुस्तफाखानाचा भरोसा वाटू लागला आणि ते बेसावध राहू लागले.
एक रात्री शहाजीराजे गाफील होते, गाढ झोपले होते आणि हीच संधी साधून मुस्तफाखानाने शहाजीरांच्या छावणीला चहूबाजूने घेरले.
राजांनी आधीच आपले मुख्य सैन्य बंगळूरला पाठविले होते आणि आता त्यांच्या बरोबर काही निवडक सैनिकच होते.
मुस्तफाखानाने बरोबर बहलोलखान, मसूदखान, बाळाजी हैबतराव, मंबाजी पवार, मंबाजी भोसले, बाजी घोरपडे आणि त्यांचे चार बंधू असे नामवंत सरदार आणले होते आणि दिमतीला प्रचंड फौजतर होतीच.
आपण घेरले गेल्याचे लक्षात येताच, शहाजीराजांनी बरोबर असलेल्या सैन्याला सज्ज होण्याचा हुकुम सोडला.
एकच रणकंदन सुरु झाले.
खासा बाजी घोरपडे राजांवर चालून आलेला पाहताच, शहाजीराजांचा स्वामिनिष्ठ सेवक खंडोजी पाटील त्याचावर तुटून पडला.
खंडोजी पाटील आणि बाजीचे घनघोर युद्ध झाले. खंडोजी पाटलाने केलेला वार बाजीच्या छातीवर लागला आणि बाजी कोसळला.
पण थोड्याच वेळात बाजी परत आला आणि या वेळेस त्याने जोरदार प्रतिकार केला.
अखेरीस बाजीने खंडोजीस ठार केले.
अखेर शहाजीराजे कैद झाले पण त्यांच्या अंगरक्षकाने दिलेले बलिदान सुद्धा मोलाचे होते.
No comments:
Post a Comment