विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 7 October 2020

!! शहाजीमहाराजसाहेब यांचा जन्म !!

 


!! शहाजीमहाराजसाहेब यांचा जन्म !!
कविँद्र परमानंदक्रुत शिवभारतात मालोजीराजे यांची माहिती कुमारप्रभव नामक पहिल्या अध्यायातील श्लोक क्रमांक 42 ते 92 आणी शाहशरीफपरिणयो नामक दुसर्या अध्यायातील श्लोक क्रमांक 1 ते 7 यात दिलेली आहे ती पुढीलप्रमाणे= 1ला अध्याय -
"दक्षिणस्यां दिशि श्रीमान् मालवर्मा नरेश्वरः ! बभुव वंशे सुर्यस्य स्वयं सुर्य इवौजसा !! 42 !!
महाराष्ट्रं जनपदं महाराष्ट्रस्य भुमिपः !
प्रशशास प्रसन्नात्मा निजधर्मधुरंधरः !! 43 !!
मालोजीराजे भोसले हे सुर्यवंशी असुन दाक्षिणात्य होते,ते पुणे प्रांती राहुन भीमेच्या काठी अमंल चालवत असत आणी त्यानी शंभुमहादेवाच्या डोंगरावर म्हणजे शिखरसिँघणापुर येथे सुंदर तलाव बांधला .पुणे प्रांतावरील मालोजीराजेंचा अमंल त्यानी निजामशाहीत नोकरी धरण्यापुर्वीपासुन होता असे कविँद्र परमानंदानी नमुद केले आहे.पुढे देखिल शहाजीराजेनी नविन मिळवलेला मुलुख देऊन टाकला तरी त्यांचा पुणे प्रांतावरचा हक्क कायम होता व तोच पुढे शिवराय महाराजाना मिळाला असे कविँद्र सांगतो.याचा अर्थ मुस्लिम पातशाह्या दक्षिणेत नांदत असल्या तरी ठिकठिकाणी लहान सहान अमंल गाजवणारे गावोगावचे देशमुख, पाटील इ वतनदार हे स्वतंञ व खरे मालक होते आणी ते आपखुषीने अधिक वैभव मिळवण्यासाठी यवनांची नोकरी पत्कारीत,पण या नोकरीच्या पेशाने त्यांच्या गावच्या स्वामित्वास बाधा येत नव्हता असे कविँद्र म्हणतो.पुणे प्रांतातील काही गावांपुरता राजेभोसल्यांचा हा अमंल मोगलानी देखील मान्य केला होता-पुरंदरच्या तहानंतर इतर भाग मोगलांकडे गेला तरी कर्यात मावळचे 36 गाव राजेभोसल्यांच्या नावाने मोगलानी वजा केले होते.या देशमुख-पाटीलकीच्या हक्कासच कवीने "सौराज्य" हा शब्द लावलेला दिसतो.तसेच कविने मालोजीराजे याना "महाराष्ट्र भुमिप" हे पद लावलेले आहे म्हणजे "मराठा राजा" या अर्थाने महाराष्ट्र शब्द वापरला आहे. मालोजीराजे यांच्या पत्नीचे नाव उमाबाईसाहेब होते.त्यानी शंभुमहादेवाच्या डोंगरावर मोठा तलाव खणविला नंतर निजामशाहाची नोकरी पत्करली . त्यावेळी वेरुळ येथेराजवाडा,गढी,बागा,विहिरी,पाणपोया व धर्मशाळा बांधल्या.त्यावेळी निजामशहा देवगिरी येथे राज्य करीत असुन यादवराजे/जाधवराव आदि दक्षिणात्य राजे त्याच्या पदरी होते.त्याचवेळी विजापुरास आदिलशाही राज्य असुन तेथे यवन सरदार नांदत असत. अदिल व निजाम यांच्यात झालेल्या युद्धात मालोजीराजे व विठोजीराजे यानी मोठा पराक्रम केला त्यामुळे निजामाने मालोजीराजे यांचा गौरव करुन जहागिरी दिली.
त्यानंतर काही काळानंतर मालोजीराजेना पहिला पुञ झाला त्याचे नाव "शहाजी" व पुढे दोन वर्षानी दुसरा पुञ "शरिफजी" असे नाव ठेवण्यात आले.पुढे शहाजीराजे पाच वर्षाचे झाले असता मालोजीराजे निजामातर्फे आदिलशहा विरुद्ध इंदापुर येथे लढताना पराक्रम गाजवुन मारले गेले आणी त्यांची समाधी इंदापुर येथे आहे.शिवभारतात मालोजीराजे यांच्या म्रुत्युची मिती दिलेली नाही परंतु इतर कागदपञावरुन इंदापुरचे युद्ध इ स 1606 मध्ये झाले.
आज मराठा स्वराज्यसंकल्पक शहाजीमहाराजसाहेब यांचा जन्मदिवस....त्यानिमित्त विनम्र अभिवादन व कोटी कोटी नमन ......^......

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...