विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 10 December 2020

चासकर वाडा

 
























चासकर वाडा

पोस्टसांभार : Padmanabh Puranik
अजय देशपांडे यांची फेसबुक पोस्ट बघून ठरवलं की चासकर वाडा ला भेट द्यायची. त्यातच राजगुरुनगर मधील युवक श्रीराज चव्हाण याची युट्युब पोस्ट बघितली. मग काय रविवारी सकाळी मी व सौ निघालो चास कडे. तळेगाव एम आय डिसी वरून बधल वाडी मार्गे करंजविहीरे येथे पोहोचलो. करंज विहिरे चौकामध्ये मस्त मिसळ आणि भजी चा आस्वाद घेतला. त्यानंतर कडूस मार्गे चास रस्त्याला लागलो.. करंजविहीरे गावातील रस्ता हा सिमेंटचा असून अतिशय सुंदर तयार केलेला आहे. पुढे डांबरी सडक. पण पुढे थोडा कच्चा रस्ता आहे. सकाळच्या प्रसन्न वातावरणात जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूस. हिरवीगार शेते पाहून मन प्रसन्न झाले. पुढे राजगुरूनगरच्या चास रस्ता लागला. थोड्याच वेळात चास मध्ये पोहोचलो. विचारत विचारत वाड्यावर पोचलो.
वाड्या बाहेरील तटबंदी अगदी शनिवार वाड्या सारखी. मोठे आणि भक्कम प्रवेशद्वार. मोठा दिंडी दरवाजा त्यावर अणुकुचीदार खिळे. आत शिरलो तर समोर एक एकरवर पसरलेला भव्य वाडा. दृष्टीस पडला . बाहेर बसलेल्या आजी नी आत आवाज दिला . भक्कम दगडी पायऱ्या चढून आत गेलो. एक भारदस्त व्यक्तिमत्व सामोरे आले. त्यांनी " या " असा आवाज देऊन आमचे स्वागत केले. हे वाड्याचे दहावे वंशज श्री सुरेश जोशी .. आम्ही वाडा बघायला खास तळेगाव वरून आलो आहे. हे ऐकून त्यांना फार आनंद झाला. त्यांनी मोठ्या उत्साहाने आम्हाला त्या वाड्याचा इतिहास कथन केला. मनसोक्त गप्पा झाल्या त्यातच ही जोशी या आमच्या तळेगाव चे श्री गिरीश तात्या खेर यांचे नातेवाईक असलेचे समजले. थोरले बाजीराव पेशवे यांच्या. पत्नी काशीबाई यांचे हे माहेरघर. त्यांच्या पिताश्रींनी हा वाडा २९० वर्षा पूर्वी बांधला. त्याकाळी चासगाव हे त्यांनी वसवलं . या वाड्या बरोबरच नदी काठी सुदंर असे महादेव मंदिर पण श्री जोशी यांचे पूर्वजांनी बांधले आहे. श्री जोशी यांनी आम्हाला आज पूर्ण वाडा फिरून दाखवला. जवळजवळ शंभर दीडशे जणांचा राबता या वाड्यामध्ये त्याकाळी असायचा. स्वयम
मोठे स्वयंपाक. घर, न्हाणी घर, पुरण वाटायचं मोठा दगडी पा टा . आणि वरवंटा, जुन्या काळच्या छोट्या तोफा..आतील खोल्या आणि देवघर फिरून दाखवले..वाड्याच्या
आतील बांधणी खूप भक्कम आहे. शिसवी तुळ या पूर्ण छतावर वापरलेल्या आहेत. बाहेरील बाजूस गुरांचा मोठा गोठा आहे. आज या वाड्यात श्री जोशी यांची ही दहावी पिढी रहात आहे.वयोमान नुसार वाडा आता खूप जुना .. झाला आहे बाहेरील तटबंदी ढासळेली
असली तरी आतील इमारत भक्कम आहे. श्री जोशी यांच्या परिवाराने शक्य ती डाग दुजी केली आहे. आणि इमारत जपायचा खूप प्रयत्न केला आहे. काशी बाईच्या पिताश्री यांनी नदी काठावर सर्वांग सुंदर असे महादेवाचे मंदिर बांधले आहे. आत मधे शिरताच मोठी दीपमाळ आपले लक्ष वेधून घेते. पुढे नंदी आणि आतील गर्भगृह पण सुंदर रित्या बांधले आहे. बाहेरील बाजूस भक्कम सुंदर आखीव-रेखीव तटबंदी केलेली आहे. येथे कळस पण अतिशय सुंदर आहेत.नुकतच तिथं पेंटिंग चे काम केल्यामुळे मंदिर अगदी स्वच्छ आणि सुंदर दिसत आहे. मंदिराबाहेर सुंदरशी बाग आणि लाईटची सोय तेथील ट्रस्ट ने केलेली आहे. हे मंदिर अतिशय पाहण्यासारखे आहे. चास जर कधी गेलात तर हा वाडा आणि हे मंदिर आपण आवर्जून पहा

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...