[#श्रीमंत_सरसेनापती_दाभाडे_श्री_पाच_पांडव_मंदिर]
हिंदुस्तानात फ्कत दोन ठिकाणी 'पाच पांडव' मंदिर असल्याचे माहिती मिळते.
एक 'दिल्ली' जवळ 'पानिपत' च्या मार्गावर जाताना व दुसरे "महाराष्ट्रात".... "तळेगांव दाभाडे" गावा मध्ये....
असे
सांगितले जाते की 'पाच पांडव' व 'आई कुंती ', एका रात्री साठी (आजच्या
तळेगांव दाभाडे) येथे राहिले होते. ते जाताना त्यांनी त्यांच्या मुर्त्या
त्या ठिकाणी ठेऊन गेले.
नंतर
च्या काळात 'सरसेनापती दाभाडे' घराण्याकङून मंदिर बांधन्यात आले.
सध्याच्या ज्या मुर्त्या आहेत त्याच्या आत मुळ मुर्त्या असल्याचे सांगण्यात
येते.
'आई द्कुंती ' मागच्या खोलीत 'निद्रा' रूपात दिसतात.
लोक असे म्हणतात की त्या ६ महिन्यानी कुशी बदलतात. (पण तसे काही नाही)
मंदिराची रचना त्या वेळेस अशी केली गेली होती कि, ६ महिने आईच्या चेहेर्यावर सुर्याची किरणे पडत व ६ महिने आईच्या चेहेर्यामागे. त्यामुळे त्या कुशी बदलत असल्याचा भास होत असे.
हे मंदिर आजही "सरसेनापती दाभाडे" राजघराण्याच्या मालिकीचे आहे.
- [#सरदार_सत्यशीलराजे_पद्मसेनराजे_दाभाडे]
No comments:
Post a Comment