सातारा जिल्ह्यातील लोणंद तालुक्यातील तडवळे गावात सरदार खराडेंची गढी आहे. तडवळे हे फलटण तालुक्याला लागून असलेले गाव लोणंदपासून १५ कि.मी अंतरावर आहे. काळज गावापासून जवळच आहे. सद्यस्थितीत गढीचे भव्य प्रवेशद्वार आणि तीन बुरूजासह तटबंदी शिल्लक आहे. प्रवेशद्वारावर शिल्पे कोरलेली आहेत. गढीतील विहीर एकदम सुबक आहे. विहिरीत एक भुयारी मार्ग गावातील भैरवनाथ मंदिरातून येतो असे स्थानिक गावकरी सांगतात. वर बुरूजावर नाथपंथीय साधूंची समाधी आहे.गढीच्या आत एक भलेमोठे दगडी कमानी असलेले तळघर आहे.
छत्रपती शिवरायांच्या काळापासून तडवळे गाव अस्तित्वात आहे. खराडे हे मराठा घराण्यातील भोसले कुळाचे एक उपकुळ असुन खराडे हे नाव सांगली जिल्ह्यातील खराडी गावामुळे पडले आहे. खराडे सरदारांनी आयुष्यभर मराठी साम्राज्याची सेवा केली. मराठा आरमाराचे सरदार सुभानजी खराडे छत्रपती शिवाजी यांचे विश्वासू सरदार होते. सरदार शिताजी खराडे आणि त्याचा मुलगा सरदार फकीरजी शिताजी खराडे यांचा अब्दालीचा वझीर शहापसंद खान याच्याशी लढताना मृत्यू झाला. सरदार तानाजी खराडे यांनी बु रा डी घाटच्या लढाईत आणि इ.स १७६१ च्या पानीपतच्या रणसंग्रामात भाग घेतला होता.
टीम - पुढची मोहीम
No comments:
Post a Comment