विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 22 December 2020

#सरदार_रास्ते_वाडा- रास्ता पेठ, पुणे भाग-४


 #सरदार_रास्ते_वाडा-

रास्ता पेठ, पुणे
भाग-४
इंग्रजी अंमल जाहल्यावेळी पुणे येथील आमचे थोरले वाड्यात सरकारची फौज, जामदारखाना, नौकरखाना वगैरे येथे सुमारे वर्षभर राहिली होती. तेव्हा दौलतीचे कागदाची अफरातफर जाहली." अशी नोंद उमाबाईसाहेब रास्ते यांच्या कैफियतीमध्ये आहे. तसेच येथून सुरक्षिततेसाठी हलवलेली कागदपत्रेही, वाईच्या वाड्याला आग लागली त्यात भस्मसात झाली. नाशकास गोपिकाबाईंच्या नावाचा ट्रस्ट आहे.
पेशवाईत शेकडो सरदार निर्माण झाले. त्यांना वेळोवेळी जहागिरीचा मुलूख मिळाला. ते जेथे रहावयास गेले, तिथे त्यांनी आपल्या कुवतीनुसार बांधकाम केले. वाडे बांधले, किल्लेही बांधले त्यामुळे महाराष्ट्रात खेड्यांपर्यंतसुद्धा वस्ती वाढली, पेठा वसल्या. रास्त्यांच्या वाड्याच्या परिसरात त्यांनी रास्ता पेठ वसवली.
सव्वादोनशे वर्षांपूर्वी बांधलेली ही भव्य वास्तू फिरून पाहून मुख्य दरवाजातून
आनंद माधवरायांचा निरोप घेतला हत्तीघोडे यांचा लवाजमा, सदरेवर चाललेली कारकून मंडळीची उठबस, मुदपाकखान्यातील पंक्तीची तयारी आणि राज्याच्या खानदानी वैभवाची साक्षीदार मंडळी हे सजग झालेले सारे वातावरण अडीच तीनशे वर्षांपूर्वीचे वैभव कसे होते हे सांगण्यास पुरेसे होते.
-डाॕ. मंदा खांडगे
#माहिती - वैभव पेशवेकालीन वाड्यांचे (सन २०००)
फोटो - सरदार रास्ते वाडा, रास्ता पेठ पुणे महानगरपालिका
विकास चौधरी

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...