शककर्ते छत्रपती शिवरायाचे नातु व छत्रपती राजाराम महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज
छ.संभाजीराजे २० डिसेंबर १७६० रोजी निधन पावले. "संभाजीची स्वारी कसबे वडगाव येथे होती. तेथे एकृती जड जाहली. यामुळे निकडीने करवीरास निघाली. टोपनजीक माळावर कैलासवास केला. संभापूर नाव ठेविले. गाव वसविला. मार्गशीर्ष शुद्ध १२ मंदवार दोन प्रहरी कैलासवास केला. दहन कोल्हापूर येथे पंचगंगेच्या काठी झाले. २
संभाजीराजे यांनी ४६ वर्षे राज्य केले. एवडा प्रदीर्घ काल राज्य करण्याची संधी त्यापूर्वी छत्रपती घराण्यात कोणालाही मिळाली नव्हती. शककतें शिवाजीमहाराजांनी ६ वर्षे राज्य केले आणि राज्यविस्ताराच्या अनेक महत्त्वाकांक्षा मनात असतानाच त्यांचे आयुर्मान संपले. संभाजीमहाराजांनी ९ वर्षे सत्ता गाजविली आणि त्यानंतर त्यांना शत्रूच्या हाती पडून हौतात्मय पत्करावे लागले. राजाराममहाराजांना गादीवर बसण्याची शक्यता व संधी असूनही ते शेवटपर्यंत गादीवर बसलेच नाहीत, पण त्यांची सत्ता फार मर्यादित प्रदेशात ११ वर्षे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चालत होती. ते मराठ्यांचे अनभिषिक्त छत्रपती होते. त्यांच्यानंतर ताराबाईचे पुत्र दुसरे शिवाजी गादीवर बसले. कोल्हापूर राज्याचे पहिले छत्रपती हे होत. ते चौदा वर्षे राज्यावर होते. त्यानंतर त्यांना व ताराबाईंना पन्हाळ्यावर नजरकैदेत राहावे लागले. संभाजीमहाराजांनी मात्र इ. स. १७१४ पासून इ. स. १७६० पर्यंत राज्य केले. या कालखंडात प्रथम त्यांना रामचंद्रपंत अमात्यांसारख्या मुरब्बी मुत्सद्याचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मातोश्री राजसबाईही कारभारात लक्ष घालीत असत. राजसबाईच्या वृद्धापकाळी संभाजीराजे यांच्या कारभाराला महाराणी जिजाबाई यांनी विशिष्ट वळण लावले. त्यांचा दरारा व शिस्त कोल्हापूर राज्याची अधिसत्ता बळकट करण्यासाठी उपयुक्त ठरली. संभाजीराजे सामान्यतः जिजाबाईंच्या धोरणाबाहेर फारसे जात नसावेत असे दिसते. शाहूमहाराज निधन पावल्यानंतर संभाजीराजे यांनी साताऱ्याकडे फौजा वळविल्या होत्या; पण जिजाबाईंच्या सल्ल्यावरून त्यांनी आपला मोर्चा मागे वळविला. या प्रसंगाच्या अगोदर नानासाहेब पेशवे व संभाजीराजे यांचा इ. स. १७४० मध्ये जो इतिहासप्रसिद्ध करार झाला त्या वेळीही जिजाबाई त्यांच्याबरोबर साताऱ्याला होत्या. त्यांना त्या कराराची चांगली माहिती होती. त्यांनी नानासाहेब पेशवे व सदाशिवरावभाऊ पेशवे यांना जी पत्रे लिहिली त्यात त्या कराराची आठवण दिली आहे. ज्या ज्या वेळी संभाजीराजे साताऱ्याला जात असत त्या त्या वेळी जिजाबाई त्यांच्याबरोबर असत.
संभाजीराजे धार्मिक वृत्तीचे होते हे त्यांनी मंदिरांना आणि साधुसतांना दिलेल्या सनदापत्रावरून दिसते. १७२८ साली ते निजामाबरोबर गोदावरीच्या खोऱ्यात लष्करी मोहिमेवर होते तेव्हा त्यांनी अंबेजोगाई येथील दत्तभक्त आणि प्रसिद्ध कवी दासोपंत यांच्या समाधीसाठी इनाम दिलेले आहे. तसेच वेदशास्त्रसंपन्न देवदत्त परमानंद कवींद्र या धर्मनिष्ठ विद्वानास गाव इनाम दिलेला आहे. हिंदू साधूप्रमाणे मुसलमान मशिर्दीनाही गाव इनाम दिल्याची नोंद कागदपत्रात आढळते. साधुसंताप्रमाणे राज्यातील विद्वान आणि धार्मिक प्रवृत्तीच्या लोकांनाही सनदापत्रे दिलेली आहेत. हरिवंश सांगणाऱ्या पुराणिकाला इनाम दिले. तसेच, मौजे तेरवल पर रामबाग येथील मुक्तेश्वराच्या समाधीस महाराजांनी गाव इनाम दिला. मुक्तेश्वर हे एकमात्र महाराजांचे नातू होते. मुक्तेश्वराच्या पणतूने (त्याचेही नाव मुक्तेश्वरच) समाधीच्या व्यवस्थेसाठी व उत्सवासाठी देणगी मागितली. तो विद्वान होता तसाच गायन विद्येतही निपुण होता
संभाजीराजे यांच्या कारकिर्दीत करवीरनिवासिनी महालक्ष्मीची पुन्हा स्थापना झाल्याचा एक महत्त्वाचा उल्लेख सापडतो. कोल्हापूर शहराच्या इतिहासाच्या दृष्टीने तो महत्वा आहे. त्यात म्हटले आहे, "श्री राजा शंभूछत्रपति स्वामी यांनी वेदशास्त्रसंपन्न राउश्री शिवरामभट यांचे पुत्र नरहरभट सावगावकर वास्तव्य श्री करवीर यांसी आज्ञा केली, तुम्ही स्वामीसन्निध पन्हाळ्याचे मुक्कामी विदित केले की श्री महालक्ष्मी) करवीर हे अनादी क्षेत्र त्यासी अवांतराचे योगास्तव बहुत दिवसांपूर्वी देवालये सोडून पुजारी याचे घरी होती. त्यास पूर्वी राज्य विजापूर आदी करून स्वस्थ होते. परंतु पूर्वस्थलीत श्रीची स्थापना कोणी केली नाही. श्रीने आपणास साक्षात्कारे प्रेरणा करून आपले स्थळी बसावे ही इच्छा केली झाली. हे वृत्त पूर्वी आपण स्वामीस सांगितले त्यावरून स्वामीनी राजश्री शिदोजी हिंदुराव घोरपडे ममलकतमदार यास आज्ञा केली. त्यावरून ममलकतमदार यांनी करवीरास येऊन मन्मथनामसंवत्सरी विजयादशमीस श्रीची स्थापना पूर्वस्थळी देवालयात सुमुहूर्त केली. आणि मग श्रीच्या पूजाअर्चेसाठी आणि उत्सवासाठी महाराजांनी सावगाव इनाम दिला. याच इनामपत्रात कोल्हापूरची महालक्ष्मी पुराणप्रसिद्ध जागृत असून "एक काशीक्षेत्र की दुसरे करवीरक्षेत्र" असा गौरवाचा उल्लेख केला आहे (ता. ८-११-१७२३). मुसलम अमलाखाली देवस्थानावर संकटे येत असत. अशा प्रसंगी मूर्ती मंदिरातून हलवून गुप्त रीतीने इतरत्र ठेवावी लागे. असाच प्रसंग महालक्ष्मी मंदिरावर आलेला असावा.
सनदा दिल्या होत्या.
संभाजीमहाराजांनी सिंहगडावर छत्रपती राजाराममहाराजांच्या समाधीवर इ.स. १७३२ माली छत्री बांधली. यासंबंधी चिमाजीआप्पा पेशवे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे, ाजमान्य राजश्री चिमणाजी पंडित यांप्रती, आज्ञा केली ऐसीजे की, सिंहगडी कैलासवासी महाराजांचे वृंदावन बांधावयास काम चालीस लाविले आहे. त्याच्या साहित्याविषयी तुम्हाकडे हरजी ढमढेरे पाठविले आहेत. तरी अनुकूल पडेल ते साहित्य करून वृंदावन तयार होय ऐसे करणे."
संभाजीराजे यांची एकंदर सात लग्ने झाली होती. सात राण्यांची नावे आणि त्या ज्या
घराण्यातील होत्या त्या घराण्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
१. आनंदीबाई -बुधकर घाटगे यांची कन्या.
२. उमाबाई-खानवेलकर यांची कन्या.
३. अर्कवृक्ष-
४. जिजाबाई-तोरगलकर शिंदे यांची कन्या.
५. सुंदराबाई- तुरुबेकर घाटगे यांची कन्या.
६. सकवारबाई -सूर्यवंशी राजे यांची कन्या
७. दुर्गाबाई-मोहिते यांची कन्या.
८. कुसाबाई--माणगावकर घाटगे यांची कन्या.
यांपैकी कोणत्याही राणीपासून संभाजीराजे यांना पुत्रसंतती झाली नव्हती. राजे निधन पावले त्या वेळी सर्वांत शेवटची राणी कुसाबाई गरोदर होती. "कुसाबाई प्रसूत झाली, परंतु पुत्र झाला नाही. कन्या झाली."
छ.संभाजीराजे देहावसान टोप-संभापूर या ठिकाणी झाले. कोल्हापूर राज्याच्या इतिहासात त्यांचे अनन्य साधारण असे महत्वाचे स्थान आहे. ते २० डिसेंबर १७६० रोजी निधन पावले.
व एका कालखंडाची समाप्ती झाली.
- महेश पाटील सर
No comments:
Post a Comment