विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 30 January 2021

सुभेदार थोरले मल्हारराव होळकर

 उत्तरेत सुभेदार मल्हारराव होळकर [ KingMaker Of The North ] ह्यांच्या नेतृत्वाखाली मराठा घोडदळ आणि शत्रूवर दबदबा निर्माण करून रणांगणात शत्रूचे केलेले हाल एका पत्रात सापडते -

मराठा सरदारांनी उत्तरेत वेळोवेळी मोहिमा काढून आपले घोडदळ पूर्ण विचारपूर्वक नीतीने वापरले कारण मराठ्यांचा मुख्य कणा उत्तरेत घोडदळ हा होता. मधोसिंग आणि राजसिंग घोडचढा ह्यांच्या विरुद्ध सुभेदार मल्हारराव होळकर ह्यांचे युद्ध झाले. ह्या युद्धाची नोंदणी ३ मे, १७४७ दरम्यान चिंतो कृष्णा ह्यांनी केली.
" राजश्री मल्हारजी राव होळकर आम्हास घेऊन निघाले. दरकूच मांगरोळ प्रांत हाडोती येथे गाठ झाली. जमादीलैवली चार घटका मागील दिवसापासून रात्र पावेतो गोळागोळीचे युद्ध झाले. उपरांत रात्री झाली तसेच घेरा घालून कंबरा बांधून घोडेवर चार प्रहार रात्री उभेच राहिलो. कछव्याची तमाम फौज बुडविली लुटून फस्त केली. तमाम हिंदुस्तान नक्ष बसला. सरकार पागेस शेसवाशे घोडे उंट आली.
( ह्यावरून मराठा फौजा किती हाल सहन करून शत्रूला धुळीस मिळवले हे कळून येतं.)

सुभेदार थोरले मल्हारराव होळकर जयते
( खूब लढे मरहट्टे )

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...