विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 30 January 2021

राजनैतिक सल्लागार व विश्वासू सेवक सोनोपंत डबीर

 

राजनैतिक सल्लागार व विश्वासू सेवक सोनोपंत डबीर

२५ जानेवारी १६६५...
शिवाजी महाराजांचे राजनैतिक सल्लागार व विश्वासू सेवक सोनोपंत तथा सोनोजी विश्वनाथ डबीर यांचे निधन...
सोनोपंत डबीर म्हणजे शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळीतील एक मौल्यवान रत्न.. मराठा साम्राज्याचे पेशवे (पंतप्रधान) श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील शंकर मंदिरात शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ साहेब व सोनोपंत डबीर यांची सुवर्णतुला केली होती...
सोनोपंत डबीर यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांना सुनावलेले खड़े बोल....,
जेव्हा शाहजीराजे आदिलशाहकड़े बंदी होते त्यांच्या सुटकेसाठी आदिलशाहने सिंहगड किल्ला परत मागितला होता तेव्हा छत्रपती शिवाजी राजे आपल्या पित्यावर रुष्ट झाले होते अणि तेव्हा सोनोपंत डबीर यांनी त्यांचा रुसवा काढताना...,
“पराक्रमी राजलाच पृथ्वी वश होते राजे एक सिंहगड गेला म्हणुन तुम्ही पित्यावर रागावता, त्यापेक्षा एक गडाच्या बदल्यात आदिलशाहने शाहजीराजंसारख्या सिंहाला मुक्त केले आहे राजे आता तुम्ही पृथ्वीवर राज्य करा....”
राजनैतिक सल्लागार व विश्वासू सेवक सोनोपंत डबीर ह्यांस विनम्र अभिवादन.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...