शके १५८७ च्या पौष व. १३ रोजी मोगलांचा पांचवा बादशहा शहाजहान याचे निधन झाले.
शहाबुद्दीन मुहमद किरान उर्फ शहाजहान हा जहांगीर ऊर्फ सलीमचा जोधपूरच्या राजकन्येपासून झालेला पुत्र होय. सन १६२८ मध्ये हा गादीवर आला. सर्व आप्तांचा नायनाट करून याने सन १६३७ मध्ये शहाजी राजांचा पराभव केला व अहमदनगरच्या निजामशाहीचा सर्व मुलूख आपल्या ताब्यांत आणला. युरोपियन लोकांच्या बायतीत हा मोठा धूत होता. त्यांनी धर्माच्या बाबतीत हात न घालावा म्हणून हा अत्यंत दक्ष असे. पोर्तुगीझ धार्मिक जुलूम करतात, म्हणून याने हुबळी नदीच्या काठी असलेली त्यांची वखार लुटली. असफरखानाची मुलगी मुमताज ही शहाजहानची बायको होती. या मुमताजवर त्याचे फारच प्रेम होते. याची कारकीर्द म्हणजे मोगल अमदानीचे सुवर्णयुग होय. हलींचे दिल्ली शहर यमुनेच्या कांठावर यानेंच बसविले. हा मोठा विलासी व रंगेल असे. जुम्मा मशीद, मोती मशीद, दिवाणी आम, दिवाणी खास, वगैरे प्रेक्षणीय इमारती यानेच बांधिल्या. हा बादशहा वृद्ध झाला तेव्हां याचा वडील मुलगा दारा शुकोह राज्यकारभार पाहूं लागला. पुढे औरंगजेबाने सर्व बंधूंचा नायनाट करून आपला पिता शहाजहानास यालाच कैदेत टाकलें व राज्य बळकावले. पित्याला त्याने कैकवेळा विष घालून मारण्याचा यत्न केला. आठ वर्षांची कैद शहाजहानास भोगावी लागली, आणि त्यांतच त्याचा अंत झाला. शहाजहान इतरांविषयी बेपर्वा, वर्तनांत गर्विष्ठ, स्थिर वृत्तीचा व शांत स्वभावाचा होता. युद्धकलेत त्यांचे प्रावीण्य विशेष होते. राज्यकारभारांत तो बराच कुशल होता. त्याच्या दरबाराचा डौल विशेष थाटाचा असे. कविताश्रवण, संगीत, नृत्य, नाटक इत्यादींची त्याला विशेष आवड होती. सुप्रसिद्ध मयूरसिंहासनाची निर्मिति यानेच केली.
-२२ जानेवारी १६६६
No comments:
Post a Comment