मुख्यत्वे गोदावरी नदीच्या खोऱ्यात पसरलेले हैदराबाद राज्य प्रशासकीय दृष्ट्या ४ विभाग आणि १६ जिल्ह्यांमध्ये विभागले होते. मराठवाडा विभागात औरंगाबाद बीड नांदेड आणि परभणी हे जिल्हे होते. गुलबर्गा विभागात बिदर, गुलबर्गा,उस्मानाबाद, रायचूर जिल्हे, गुलशानाबाद किंवा मेदक विभागात अत्राफ इ बलदाह, महेबुबनगर, मेदक, नालगोंडा, निझामाबाद जिल्हा; तर वरंगळ विभागात आदिलाबाद जिल्हा, करीमनगर आणि वरंगळ जिल्हा होता .
निजामाने इतर बराचसा भाग ब्रिटिशांना विविध वेळी विविध कराराअंतर्गत संपूर्ण किंवा भाडेपट्ट्यावर बहाल केला. प्रशासकीय व्यवस्था मुख्यत्वे सरंजामशाही स्वरुपाची होती. शेतसारा वसुलीकरिता जहागिरी बहाल केलेल्या असत. जहागिरदार मुख्यत्वे मुस्लिम व काही प्रमाणात हिंदू असत, किल्लेदार मात्र प्रामुख्याने मुस्लिम असत. करांचा काही भाग वेगवेगळ्या वेळी मोगल, मराठे, इंग्रज इत्यादींना तत्कालीन करारांनुसार चौथाई स्वरूपात निजाम देत असे. प्राप्तिकर नसे.
No comments:
Post a Comment