मराठ्यांची भिवंडी वर जीत
स्वराज्यातील कोकण पट्टीतील कल्याण भिवंडी भागात आपल्या सैन्याचा शिरकाव करून ती ताब्यात घेण्यासाठी मुघलांनी प्रयत्न चालविले होते.पण शंभुराजेंच्या आदेशाने मराठ्यांनी 4 हजार घोडदळ व पायदळ घेऊन मुघलांच्या वाटा अडवून ठेवल्या होत्या.या आघाडीवर औरंगजेबाने आपल्या रणमस्तखान,पद्मसिंह,भगवंतसिंह,माकुजी,रामसिंह,हरिसिंह,रघुनाथसिंह,काबुलीसिंह यासारख्या बड्या सरदारांना धाडले होते.यांच्या बंदोबस्तासाठी शंभुराजेंनीही आपले सेनापती हंबीरराव मोहिते व इतर तीन मोठे सरदार शिवाय 20 हजार घोडदळ आणि 10 हजार पायदळ कल्याण भिवंडीला पाठवले होते.या दोन्ही सैन्यात झालेल्या लढाईत सेनापती हंबीरराव जखमी झाले आणि मराठ्यांचे तीन मोठे अधिकारी मरण पावले.मुघलांचेही भगवंतसिह व माकुजी,रामसिंह हे सरदार मारले गेले तर पद्मसिंहाला 35 जखमा झाल्या होत्या,शिवाय इतर 25 सरदारही जखमी झाले.मुघल सरदार हरिसिंह रणांगणात पडला असता मराठ्यांनी त्याला उचलून नेले.अश्या तऱ्हेने मोठे सैन्य पाठवूनही मराठ्यांच्या चिवट प्रतिकाराने मुघलांना कल्याण भिवंडी भागात प्रगती करता आली नाही.वरील लढाईची तारिख होती .27 फेब्रुवारी 1683.
-इतिहासप्रेमी विजय दादा माने
No comments:
Post a Comment