"आम्ही कान धरली शेळी आहो"
गोविंदपंत बुंदेले (मूळ आडनाव खेर) हे मराठ्यांचे उत्तरेतील एक मातबर सरदार होते. त्यांचा जन्म इ.स. १७१० मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील "नेवारे" या गावी एका कऱ्हाडे ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील हे कुलकर्णी होते.
हे पेशव्यांचे उत्तरेकडील मामलतदार किंवा विश्वस्त होते. पानिपतच्या युद्धात मराठा सैन्याला रसद पुरवण्याचे महत्ताचे काम बुंदेले करत होते.
छत्रसालाकडून मिळालेल्या बुंदेलखंडातील राज्यावर सुमारे १७३३ दरम्यान त्यांची नियुक्ती झाली असावी. प्रस्तुत पत्र हे एका वेगळ्या अर्थाने इतिहासावर प्रकाश टाकणारे आहे. १७३५ ते १७३६ दरम्यान मध्य प्रदेशातील "सागर" हे शहर गोविंद पंतांनीच वसविले ! सागर, जालौन, गुरुसराय, काल्पि , उरई या जहागिरीची त्यांनी स्थापना केली. 1733 ते 1760 या काळात त्यांच्या पराक्रमा मुळे दबदबा होता. आपले थोरले पुत्र बालाजी गोविंदपंत खेर यांना "सागर" ची जहागिरी सोपविली. धाकले पुत्र गंगाधरराव यांना काल्पी, जालौन, उरई ही जहांगीर सोपविली व ते स्वतः पण काल्पि येथे आले. त्यांचेच नातेवाईक झाशीचे आत्माराम गोविंद खेर, यांना गुरुसराय जहांगीर सोपविली होती. हेच आत्माराम खेर पुढे उत्तरप्रदेश विधान सभेचे सभापती झाले.
त्यांनी बख्र-उल्ला खान नावाचा पातशाहीत एक नामी पराक्रमी सरदार होता. त्यांनी याला चारी मुंड्या चित करून त्याचा पराभव केला होता ! हा एक फार मोठा विजय होता. गोविंदपंत यांना या विजया बद्दल आपली पाठ नानासाहेब पेशवे नक्कीच थोपटतील, शाब्बासकी मिळेल असे वाटले होते.
नानासाहेब पेशवे यांनी या विजयाबद्दल कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. तेव्हा त्यांना मनोमन खुप वाईट वाटले !
त्यांना असे वाटले, कदाचित एखादा मराठा सरदार असता तर त्याची नक्की दखल घेतली असती !
मग आमची दखल का घेतली नाही ? का आम्ही ब्राह्मण म्हणुन दुर्लक्षित आहे. त्यात त्यांनी स्वतःचा उल्लेख
" ‘आम्ही कान धरली शेळी आहो" असा केला आहे.
गोविंदपंत बुंदेले यांचे पत्र
आपली खंत व्यक्त करायची म्हणुन त्यांनी २३ सप्टेंबर १६५५ रोजी गोविंदपंत नानासाहेब पेशव्यांना एक पत्र लिहिले आहे. उत्तरेतील हकीगत सांगणारे हे पत्र स्पष्ट आणि बोलके आहे. एका बोलक्या वाक्यात पत्राचा सारांश सांगायचा म्हणजे – “…बख्र-उल्ला खान नावाचा पातशाहीत नामी सरदार होता, त्याला परम संकटात जाऊन, परम उपाय करून (बुंदेले यांनी) बुडवला.… आपली खंत व्यक्त करताना गोविंदपंत लिहितात, आमच्या ठिकाणी मराठा सरदारांपैकी कुणी हे कार्य केले असते तर त्याला स्वामींनी आभाळात ठेवले असते, खूप गौरव केला असता. आम्ही स्वामींचे ब्राम्हण आमची शिफारस कोण करणार?
गोविंदपंतांनी या ठिकाणी आम्ही ब्राम्हण म्हणून त्यांच्या पराक्रमाकडे कानाडोळा झाला असे ते लिहितात. त्यांनी कुरा कोडा नावाचे अलाहबाद नजीकचे प्रांत हस्तगत केले होते. पुढे अब्दालीच्या तुकडीकडून हेच गोविंदपंत बुंदेले पानिपत संग्रामापूर्वी मारले गेले.

स्रोत :-
मूळ पत्र संदर्भ – मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ३ (जुना) – लेखांक १३७
No comments:
Post a Comment