विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 27 February 2021

#स्वराज्याचे_पाचवे_सरलष्कर_म्हाळोजीबाबा_घोरपडे

 

जन्म - १६२०
संताजींचे वडील म्हाळोजींन पासूनच स्वराज्याच्या सेवेस सुरुवात झाली होती त्याची नोंद,【करवीर सरदारांच्या कैफियत】या पुढील प्रमाणे आहे मुळपुरूष म्हाळोजी बाबा घोरपडे व शककर्ते शिवराय यांचे वडील शहाजीराजे भोसले हे आदिलशाहीत सरदार होते हिंदू धर्माचे कामात विकल्प आलेवरुन म्हाळोजीराजे व छत्रपती शिवाजी राजे यांचे हिंदू धर्माचे संस्थापक करणे बद्दल एकमत होवून बेलभंडार परस्पर देऊन तह जाहला,तेथून पादशाहाचे हुकूमतीत न चालता राज्याधी व्रुध्दिस आरंभ करून प्रांत काबीज करत चालले तेव्हा मराठी फौजेचा बंदोबस्त करण्याबद्दल पादशाहाकडुन मुसलमान सरदार येऊन त्याजबरोबर कितीएक प्रसंग जाहले त्यात दिवसेंदिवस मराठी फौजेस जय प्राप्त जाहला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक युद्ध मोहिमांत म्हाळोजींनी महत्त्वपुर्ण कामगिरी केलेली होती त्याचे मुल्यमाप होऊ शकले नाही, छत्रपती शिवरायांच्या शेवटच्या कारकिर्दीत संभाजीराजांनी केलेल्या बंडानंतर ज्यावेळी युवराजांना पन्हाळ्यावर आणण्यात आले तेव्हा म्हाळोजीराजे पन्हाळ्याचे सरनोबत होते या विषयी पुढील प्रमाणे नोंद सापडते, श्री शिवछत्रपती शककर्ते महाराज यांनी राज्यास प्रारंभ केला त्या समयी घोरपडे यांचा पुरुष म्हाळोजी हे छत्रपतींपाशी पाचशे स्वारानिशी चाकरीस राहिले, काही दिवसांनी महाराजयांचे जेष्ठ पुत्र संभाजी महाराज पन्हाळ्यावर होते म्हाळोजी घोरपडे यांस स्वारांसुध्दा पन्हाळ्यास छत्रपतींनी पन्हाळा किल्ल्याचे सरनोबती देऊन संभाजी महाराज यांसपशी ठेवले पुढे शिवाजीराजे यांचा काळ झाला नंतर संभाजी महाराज यांनी म्हाळोजीबाबा घोरपडे पन्हाळ्यावर ठेऊन आपण रायगडास गेले पुढे हंबीररावांच्या निधनानंतर संभाजीराजांनी म्हाळोजी घोरपडे यांना घोडदळाची सरनोबती दिली, छत्रपती शिवाजी नंतर संभाजींच्या कारकिर्दीत म्हाळोजीराजांनी अनेक महत्त्वपुर्ण भूमिका बजावल्या एवढेच नाहीतर संभाजीराजांच्या अखेरच्या काळात त्यांना वाचविण्याकरिता म्हाळोजींनी आपल्या प्राणाची बाजी लावली छत्रपती संभाजीराजांना पकडण्याकरिता मुकर्रबखान उर्फ शेख निजाम आला तेव्हा राजांचा मुक्काम संगमेश्वर येथे होता २०० स्वार व १०००पायदळासह त्याने कोल्हापूरहुन अंबा घाटातून संगमेश्वर गाठले १फेब्रुवारी१६८९ ला त्याने संगमेश्वरला वेढा घातला तेव्हा संभाजींन जवळ कवीकलशासह फक्त तीनशे स्वार व काही निवडक अंमलदार उपस्थित होते संभाजींवर हल्ला करण्याकरिता आलेला मुकर्रबखानाला रोखण्याकरिता म्हाळोजीराजे संभाजीराजांना वाचविण्याकरिता झालेल्या धुमश्चक्रीत सरनोबती म्हाळोजीराजे धारातीर्थी पडले, या विषयी【घोरपडे घराण्याच्या वंशावळीत】उल्लेख पुढील प्रमाणे आहे इतक्यात अवरंगजेब पादशाहा याची फौज चालून आली, सबब म्हाळोजी घोरपडे महाराजांकडे संगमेश्वरास गेले तेथे पादशाही फौजेची व महाराजांची लढाई होवुन संभाजी महाराज यांसी धरून नेले त्या गर्दीत म्हाळोजी बाबा ठार जाहले या वेळी म्हाळोजीराजे सोबत त्यांचे तीन पुत्र अनुक्रमे【संताजी, बहिर्जी, मालोजी】यांनी विशेष पराक्रम गाजीवला.*
*【महाराष्ट्रातील इतिहासाची साधने】 ह्यात घोरपडे घराण्याच्या इतिहासाविषयी पुढील प्रमाणे माहिती आढळते छत्रपती संभाजी महाराज यांणी म्हाळोजी घोरपडे यांसी सरंजामी देऊन मुखत्यारी सांगोन सरनोबताची वस्रे दिल्ही आणी किल्ले पनालेस ठेऊन आपण रायगडास गेले पुढे राज्यात फौजा येवुन संभाजी महाराज मुलुख सर करित होते इतक्यात अवरंगजेब पादशाहा याची फौज चालून आली सबब.म्हाळोजी घोरपडे महाराजांकडे संगमेश्वरास गेले तेथे पादशाहीकडील फौजेची व महाराजांची लढाई होवून संभाजीराजास धरून नेले त्या गर्दीत म्हाळोजी बाबा घोरपडे ठार जाहले पुढे राजाराम महाराज छत्रपती यांनी सेनापतीची वस्त्रे संताजीबाबा घोरपडे यांसी दिली,
शके १६१०,【हिंदुराव घोरपडे घराण्याच्या इतिहासातही वाईच्या युध्दात हंबीरराव पडल्यानंतर संभाजीराजांनी म्हाळोजी घोरपडे यांना सेनापतीपद दिले व ते १ फेब्रुवारी १६८९ पर्यंत कायम आसल्याचे म्हटले आहे】
अशाप्रकारे खुद छत्रपती शिवरायांचा वारसा असणार्या म्हाळोजींच्या【संताजी, बहिर्जी, व मालोजी】या तिन्ही पुत्रांनी स्वराज्याची सेवा केली त्यात विशेष म्हणजे संताजी घोरपडेंचे स्वपराक्रमाने मराठ्यांच्या इतिहासात वेगळे स्थान राहिले आहे,
*१५ वर्ष ते शहाजीराजे यांचे सोबत होते. १६५४ पासून ते१६८०पर्यत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बरोबर स्वराज्य स्थापनेच्या कार्यात सहभागी होते स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे यांच्या सोबत स्वराज्य रक्षणासाठी कार्य केले आणि संभाजीराजे यानां शत्रूपासून वाचविताना संगमेश्वर येथे सतत५२ वर्ष स्वराज्यसेवा बजावून ते धारातीर्थी पडले, तेव्हा त्यांचे वय-६९ वर्ष होते.आणि तो दिवस होता१फेब्रुवारी १६८९
भोसले घराण्याचे तिन पिढ्यास़ोबत राहुन सतत ५२ वर्षे स्वराज्यसेवा केली,🚩
म्हाळोजी बाबांना अखंड मानाचा मुजरा🙏🚩
पोस्ट साभार - Instagram page 👇 @sarsenapati_santaji_ghorpade

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...