विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 19 February 2021

उदगीरच्या जहाल सैन्याची गोष्ट ..!!

 

पानिपत युद्धाला 260 वर्षे पूर्ण ...त्यानिमित्ताने वाचा

उदगीरच्या जहाल सैन्याची गोष्ट ..!!
आजच्या घडीला लातूर जिल्यातील तालुका असलेले उदगीर कर्नाटक आणि तेलंगणाच्या हद्दीला लागून असलेलं आपल्या राज्याचे शेवटचे टोक... याच शहारात बहामनी पूर्व एक महत्वाचा किल्ला आहे... मराठ्यांच्या साम्राज्य विस्ताराच्या वेळी निजामाच्या ताब्यात असलेला... या किल्यावर ज्या इब्राहिमखान गारदीची ( जगातल्या जहाल सैन्यात गणले गेलेले गारद्यांच्या सैन्याचा सेना नायक ) सत्ता होती. तिथूनचं सदाशिव राव भाऊ यांच्या नेतृत्वातील सैन्याने दिल्लीच्या तख्तताला आव्हानाची लढाई सुरु केली... अशा जहाल सैन्यावर हल्ला करून उदगीरचा किल्ला फत्तेह केला... या लढाई मागचा मुख्य बेत हे गारद्याचे सैन्य मिळवणे होते.. त्याप्रमाणे उदगीर करार झाला... याच सैन्याच्या बळावर दौलताबाद घेतलं.. पुढे पानिपतच्या युद्धात शेवट पर्यंत चिवट लढा याच गारद्याच्या तुकडीने देवून सदाशिव भाऊ युद्ध भूमीवर धारातीर्थी पडे पर्यंत यांची धड लढत होती... अशा या बहाद्दर लोकांच्या आजही उदगीर मध्ये खानाखुणा आहेत...14 जानेवारी 1761 रोजी सुरु झालेल युद्ध ही मराठ्यांच्या आज पर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी रक्तरंजीत दुःखद आठवण आहे.
@युवराज पाटील
( उदगीरचा उदयगिरी किल्ला )

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...