विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 14 February 2021

पाषाण- कर्यात मावळची पाटीलकी शितोळे देशमुखांची

 


पाषाण- कर्यात मावळची पाटीलकी शितोळे देशमुखांची

दि. ५ जुलै १६७९ रोजीचे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळच्या सुभेदाराला लिहिलेले पत्रं ! हे पत्रं अनेक दृष्या महत्वाचे आहे, मुख्य म्हणजे पत्राची भाषा हि खाशांची आहे. खाशांची म्हणजे खुद्द शिवाजी महाराजांची भाषा जशीच्या तशी. हे पत्रं म्हणजे एरवीच्या चिटणिशी-फडणीशी पत्रांसारखं मसुदा सांगून नंतर कारकुनांनी लिहिलेलं नव्हे.
पाषाण- कर्यात मावळची पाटीलकी शितोळे देशमुखांची होती तरीही एका कुणब्याने वेगळा वाद निर्माण करून सुभेदाराला काहीतरी गैरसमज करून देऊन ती पाटीलकी लाटण्याचा प्रयत्न केला. अखेरीस शितोळे देशमुख शिवाजी महाराजांना जाऊन भेटल्यावर महाराजांनी कोनेर रुद्र सुभेदाराला पत्रं लिहून कानउघाडणी केली. यातील अनेक वाक्य महत्वाची आहेत, आणि महाराजांचं प्रशासकीय कामात किती बारकाईने लक्ष होतं यावर प्रकाश पडणारी आहेत.
"स्वामी धाकुटपासून या देशांत आहेत. मिरासदार कोण व गैरमिरासदार कोण हे जाणताती, व माणसाचे माणूस वलखतात. तू नवा वाईदेशा, नवा सुभा करावयास आला आहेस. तुजला हे काही ठावके नाही आणि उगाच येकाच्या बोले येकासी कथला करितोस हे तुजला कोणे सांगितले आहे?". याचा अर्थ असा की मी (शिवाजी महाराज) लहानपणापासून इथे वावरतोय, इथले हक्कदार कोण आहेत आणि कोण नाहीत हे मला चांगलंच माहित आहे, माणसं मी बरोबर ओळखतो. तू (मूळचा) वाईचा, इथे या सुभ्यात नवीन आहेस. तुला यातलं काही माहित नाही, आणि असं असून एकाच्या सांगण्यावरून दुसऱ्याशी कथला करतोस हे उद्योग तुला कोणी सांगितले करायला?
यात एक अतिशय महत्वाचं म्हणजे महाराजांचं निश्चयी मन दिसून येतं. या पत्रातूनच असं दिसून येतं की यापूर्वी प्रतिवाद्याची बाजू घेऊन अनेक जण आले होते. स्वतः जिजाऊसाहेबांनी यात लक्ष घातले होते तेही शिवाजी महाराजांनी मान्य केलं नाही. गोमाजी नाईक पानसंबळ यांनी या प्रकरणात काही कारणास्तव नाक खुपसलं तेव्हा महाराजांनी त्यांना ताकीद दिली. पुढे जाऊन महाराज म्हणतात की कोणी चुकून मातुश्री आऊसाहेबांचा म्हणजे जिजाबाईसाहेबांचा कागद चुकीमुळे नेला असेल तर त्यावर जाऊ नये. पाटीलकी शितोळे देशमुखांचीच आहे, त्याच्या विरुद्ध गेलात तर ताकीद मिळेल.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...