विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 14 February 2021

## खळतकर देशमुख ##

 









## खळतकर देशमुख ##

मराठ्यांच्या इतिहासात प्रसिद्ध पावलेल्या अनेक मराठ्यांच्या कुळांपैकी "खळतकर" देशमुख यांचेही एक नाव आहे
.ह्या घराण्यास "खळतकर "आडनाव पडण्यापूर्वी दुसरे नाव असले पाहिजे. .परंतु त्या संबंधी काही माहिती मिळत नाही ,
पुणे प्रांतात "जेजुरी "जवळील "खळद" नावाचे एक गाव आहे
.तेथील हे पाटील असल्यामुळे ह्या घराण्यास गावाच्या नावावरून "खळतकर" हे आडनाव पडले ,
खळद गावची पाटीलकीचा उपभोग घेत असता त्या गावचे कुलकर्णी व "पाटील खळतकर "यांच्यात वाद व तेढ उत्पन्न झाली ,
त्यामुळे तेथून जवळ असलेल्या "केडगाव" नावाच्या खेड्यात जाऊन राहिले
.त्याखेरीज "नांदगाव" या गावीही त्यांचे वास्तव्य होते.
नांदगाव या गावाची पाटीलकी अर्धी पेशव्यांकडे असलेले "गुंड "यांच्याकडे होती व अर्धी खळतकरांकडे होती
,नांदगाव ची पाटीलकी मिळावी यासाठी म्हणून नांदगावकर व केडगावकर या दोन्ही घराने प्रयत्न केला ,
पेशव्यांनी खळतकराना पाटीलकी बहाल केली
, या नंतर खळतकर घराणे पेशव्याचे दरबारी मानकरी म्हणून राहिले. त्यांच्या पुरुषांनी अनेक लढयात भाग घेऊन मर्दुमकीची शर्थ केली होती. तसेच ते अश्वपरीक्षेत तरबेज होते ,
ही त्यांची कीर्ती सर्वश्रुत होती,त्यामुळेच त्यांच्यातील गुणांमुळे त्यांच्या घराण्याचा भाग्यदाय जवळ आला होता ,
एके समयी नागपूरचे पाहिले" राघोजी भोसले "हे पेशव्यांच्या भेटीस आले असता त्यांनी खळतकरांच्या किर्ती विषयी ऐकले व त्यांना आपल्या पदरी ठेवण्याची इच्छा व्यक्त केली
,पेशव्यांनी" खळतकर" याना राजे राघोजी भोसले यांच्या स्वाधीन केले
राघोजी भोसले नागपूरकर यांचे बरोबर पुणे प्रांतातूनआलेला "खांबोजी खळतकर "हा होय ,
राघोजो भोसले यांनी खांबोजीस नागपुरास आल्यावर त्यांना "हिंगणघाट" येथील जमेदरी,उघाई, तोरण टक्का, पाट पासोडी ,रिठ आबादी, होळी ,दसरा ,पोळा वगैरे सर्व प्रकारचे मान मरातब दिले ,
खांबोजीस चार पुत्र होते
त्या पुत्रांनी" हिंगणघाटची" बाजारपेठ वसवली.
तेव्हापासून ते तिथले जमेदर झाले
ह्या घराण्यास प्रथम देशमुखी नव्हती ,शिवापुरचे कोंडे देशमुख यांनी आपली मुलगी या घराण्यात दिली
त्याने जावयास शिवापुरचे देशमुखी आंदण देवुन खळतकारास देशमुख केले.
यांचे गोत्र "गार्ग्य" आहे ,कुलदैवत रासुबाई व खंडोबा आहे. हे सर्व" सांब भक्त "आहेत देवक "वेळवाचे " आहे.
खांबाजीच्या दुसऱ्या मुलाचा मुलगा हिंगणघाट येथे न राहता काटोल तालुक्यातील" दिग्रस "गावी राहू लागला ,
दिग्रस गाव भोसल्यांकडून मोकसा दाखल मिळाले होते ,
नागपूरकर भोसल्यांच्या दरबारात खळतकर याना चांगला प्रतिष्ठित मानकार्यांच्यात मान होता.
यांच्या पदरी हत्ती, घोडे, युद्ध उपयोगी सरंजाम होता.
पुढे त्यांचे वंशज "नानासाहेब खळतकर "यांनी" काटोल" तालुक्यात प्रथम संत्र्याची लागवड सुरू केली,
त्यांना इंग्रज सरकारने 1913 मध्ये नागपूर प्रांतात "रावसाहेब" ही पदवी दिली व ज्या तीन मराठ्यांचा सन्मान लोककल्याणासाठी काम करणाऱ्यांमध्ये केला त्यात राजेबहद्दर रघुजी भोसले ,महाडिक व खळतकर हे होते,
माझ्या तालुक्यातील मातीत अनेक अनमोल रत्ने जन्माला आली ,
त्यांची कीर्ती दाही दिशा पसरली व पुरंदर तालुक्याचे व आपल्या कुळाचे नाव उज्वल केले ,
सर्व फोटो हे राघोजी भोसले यांच्या राजवाड्याचे आहेत दिग्रस च्या खळतकरांचे वाड्याचे फोटो उपलब्ध झाले नाहीत,

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...