विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 4 March 2021

बाळापूरचा किल्ला...

 


बाळापूरचा किल्ला...
अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील किल्ला प्रसिद्ध आहे माण आणि महीषी नद्यांच्या संगमावर हा बलदंड किल्ला बांधलेला आहे या संगमाच्या पुढे गावापलीकडे असलेली भलीमोठी छत्री आपले लक्ष वेधून घेते हि छत्री नेमकी कोणाची आहे हे स्थानिक लोकांना माहित नाही या छत्रीच्या दुरुस्तीसाठी जयपूरहून पैसे आले होते अशी आठवण काही वृद्ध मंडळी सांगतात हि छत्री जयसिंगची आहे अशीही पुष्टी दिल्या जाते...
जयपूर नरेश मिर्झाराजा जयसिंग बुऱ्हाणपूर येथे मरण पावला बुऱ्हाणपूर जवळील बोहरडा या ठिकाणी त्याच्या मृत्यूनंतर त्याची छत्री उभारली गेली जयपूर जवळील गेटोर येथे राजघराण्यातील राजांच्या छत्र्या आहेत तेथेही मिर्झाराजा जयसिंग यांची छत्री उभारलेली आहे बाळापुरची छत्री मिर्झाराजा जयसिंग यांनी उभारलेली असून ती त्यांचे वडील राजा महासिंग यांची आहे राजा मानसिंग यांनी राज्यकारभार पाहण्यासाठी आपला ज्येष्ठ पुत्र जगतसिंग याचा पुत्र महासिंग याला तयार केले होते मानसिंग यांच्या मृत्यूनंतर महासिंग हा वारसा होता.. पण जहाँगिर बादशहाचा ओढा मानसिंगचा दुसरा मुलगा भावसिंगकडे होता बादशहाने फर्मान काढून भावसिंगला आंबेरच्या गादीवर बसवले महासिंगला राजचिन्हांचा मान देऊन गढाचे राज्य सोपवले मोगलांचे मलिक अंबर बरोबरचे वैर आणि युद्ध कधीही संपणारे नव्हते या युद्धावर महासिंगची नेमणूक करण्यात आली या पराक्रमी कछवाह राजपुताना दुसऱ्याच्या हाताखाली काम करावे लागे त्यामुळे त्यांच्या पराक्रमाला झळाळी मिळत नव्हती आणि मानही मिळत नव्हता या मानसिक तणावामुळे मद्यपान करण्याचे प्रमाण वाढत असे अशा अतिशय मद्यपानाने महासिंगचा मृत्यू बाळापूर येथे झाला २० मे १६१७ पुढे जयसिंग आंबेरच्या गादीवर आल्यावर त्याने आपल्या वडिलांची छत्री बाळापूर येथे बांधली..
भगवंतदास,मानसिंग,भावसिंग मृत्यू १३ डिसेंबर १६२१ महासिंग आणि जयसिंग या कछवाह राजपूत यांची परिस्थिती दक्षिणेत आल्यावर थोड्याफार फरकाने अशीच झाली होती...
――――――――――
-इतिहासतज्ञ दुर्गमहर्षी प्रमोद मांडे सर.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...