#छत्रपती_संभाजी_राजे कुशल #योद्धाच नव्हते तर ते एक #विद्वान_साहित्यिकही होते. त्यांनी मोठ्या प्रमाणावर साहित्य निर्मिती केली असून, त्यात '#बुधभूषण' नामक संस्कृत ग्रंथाचा समावेश आहे. या संस्कृत ग्रंथात संभाजी राजे लिहतात.
' इति श्रीमद् भृशवलान्वय मुकुटालंकार
श्रीमच्छाहराजसूत श्रीमच्छी वच्छामपतीसुत
श्रीमच्छाम्भुराज विरविते बुधभूषणे राजनीतीः ||'
अर्थ : कोशबल, दुर्गबल, सैन्यबल इत्यादी बलांचे मुकुट म्हणून शोभणारे #छत्रपती_शहाजी_राजे, त्यांचे सुपुत्र छत्रपती शिवाजी राजे आणि या शिवछत्रपतींचे सुपुत्र संभाजी राजे यांनी हे 'बुधभूषण' ग्रंथातील राजनीतीः प्रकरण लिहून सिद्ध केले. #शहाजी_राजांचा #कोशबल, #दुर्गबल, #सैन्यबल अदि प्रसिद्ध होता. त्याद्वारे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे.
#घार उंच #आकाशात असली तरी तीचे लक्ष आपल्या #घरट्यातील_पिल्ल्यावर असते. अशाच प्रकारची #भूमिका राजे शहाजी यांनी #शिवाजी राजे #प्रती वठवली होती. #शहाजीराजांच्या #मार्गदर्शनाखालीच #शिवरायांनी राजकीय धडे घेतले. पुणे परगण्यात शिवरायांना पाठवून हिंदवी स्वराज्य निर्मिती बाबतची मोर्चेबांधणी शहाजीराजांनीच केली होती.
सतराव्या शतकात #यवनी राज्यकर्त्यांचा प्रभाव व प्रसार बराच वाढला होता. या यवनी राजेशाहींची पाळेमुळे खोलवर रुजली होती. सर्वत्र यवनी साम्राज्य असल्याने रयतेला कुणी वाली उरला नव्हता. अन्याय, जुलूम, अत्याचार वाढले होते. हे सगळे मराठा सरदार निमुटपणे उघड्या डोळ्यांनी पाहत होते.
शहाजी राजेंनी जनतेचा होणारा छळ पाहून #दक्षिण_भारतात का होईना #स्वतंत्र_राज्य_असावे, असा निश्चिय केला. त्या दृष्टीने त्यांनी त्यावर अंमलबजावणी म्हणून पुणे व सुपे प्रदेशात, मुलुखात हिंदवी स्वराज्य उभारणीसाठी #आखणी_सुरु_केली.
शहाजी राजेंनी #पत्नी_जिजाबाई, #बालशिवाजी तसेच आपल्या विश्वासू सहकाऱ्यांना कर्नाटकातून पुणे-सुपे मुलुखातील जहागिरीचा कारभार जिजाऊंनी चोख बजावला, इतकेच नव्हे तर हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी राजमाता जिजाऊने बाळ शिवाजी वर योग्य ते संस्कार घडविले शिवाय युद्ध, रणनिती, राजकीय शिष्टाचार तसेच मुत्सद्देगिरीचे धडे गिरवून घेतले.
शिवरायांचे वाढते #वैभव पाहून राजे शहाजींना अत्यानंद झाला. हिंदवी स्वराज्याचा हा आनंदोत्सव त्यांनी जेजुरी येथे साजरा केला. राजे शहाजींच्या सांगण्यावरुनच शिवाजी महाराजांनी आपली राजधानी राजगडावरुन रायगडावर नेली. स्वराज्याच्या संरक्षणासाठीच शहाजी राजेंनी हा विचारपूर्वक निर्णय घेतला होता.
हे मात्र निश्चित, की #शहाजी राजांचा पराक्रम, बुद्धिमत्ता, मुत्सद्देगिरी, युद्धकौशल्य आदी गुणांमुळेच शिवरायांच्या रुपाने राजा व हिंदवी स्वराज्य मिळाले.
#स्वराज्याचे_संकल्पक, रणविद्याविशारद सैनिक, सेनापती, स्वातंत्र्यप्रेमी, , अविस्मरणिय पराक्रमी, नृपसिंह शहाजी राजे यांचा (१८ मार्च १५९४) जनन्मदिन.
राजेंना जयंतीदिनी मानाचा मुजरा
No comments:
Post a Comment