विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 4 March 2021

वैभवशाली हिंदुंचे बागलाण राज्य संपुष्टात आले

 १५ फेब्रुवारी इ.स.१६३८


वैभवशाली हिंदुंचे बागलाण राज्य संपुष्टात आले
अकबराने जेव्हा खानदेशाचे राज्य जिंकले तेव्हा प्रतापशहा बहिर्जी बागलाणचा राजा होता. त्याने मोगलांचे सार्वभौमत्व पत्करले पुढे शाहजहानशी या राजाने मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले. जुलै १६३६ ला औरंगजेबाची दक्षिणेचा राज्यपाल म्हणून नेमणूक झाली. इ.स १६३८ मध्ये मोगलांनी बागलाणवर हल्ला केला आणि मुल्हेर किल्ला जिंकला व त्याचे नाव औरंगगड असे ठेवले. १५ फेब्रुवारी १६३८ रोजी वैभवशाली हिंदुंचे राज्य संपुष्टात येऊन तेथे मोगलांची सत्ता प्रस्थापित झाली. मुल्हेर ही बागलाणची परंपरागत राजधानी, किल्ल्यावर महंमद ताहिर याची नेमणूक प्रथम किल्लेदार म्हणून झाली या ताहिरने मुल्हेरजवळ ताहीर नावाचे गाव वसवले व त्याचे कालांतराने ताहिराबाद असे नामकरण झाले. इ.स १६६२ मध्ये मुल्हेर किल्ल्यामधील सैनिकांनी अपुर्या पगारासाठी बंड केले. दुसर्या सुरत लुटीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी बागलाण मोहीम उघडली. यामध्ये त्यांनी साल्हेर, मुल्हेर व इतर किल्ले स्वराज्यात सामील करून घेतले.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...