स्वराज्याचे निष्ठावंत मावळे.
भाग १
पोस्टसांभार :: -रोहित सरोदे
छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल सत्तेच्या विरोधात जाऊन स्वराज्याची स्थापना केली. मराठी माणसाला स्वाभिमानाने जगायला शिकवले.अन्याय करायचा नाही आणि होऊ पण द्यायचा नाही हे त्यांचे धोरण होते.हा लढा काही एकट्या माणसाकडून होणार नव्हता.त्यामुळे त्यांचा सोबत शुरवीर,पराक्रमी मावळे होते.जे स्वराज्यासाठी प्राणाची बाजी लावायलाही तय्यार होते.यातलेच एक होते कारी गावचे कान्होजी नाईक जेधे.
कान्होजी नाईक जेधे म्हणजे बारा मावळातील एक मातबर आसामी.त्यांच्या शब्दाला मावळात खूप मान असे.त्यांच्या कुळात पिढ्यानपिढ्या रोहिडखोऱ्याची देशमुखी होती.ते रायरेश्वराच्या डोंगराच्या मांडीवर असलेल्या कारी गावात राहत. शहाजीराज्यांना मुस्तफाखान व बाजी घोरपड्याने दगाबाजीने कैद केले होते.तेव्हा त्यांच्या बरोबर कान्होजी व दादाजीपंत यांनाही कैद भोगावी लागली.पुढे दि.१६मे१६४९ रोजी शहाजीराजांबरोबर यांचीही सुटका झाली. मग शहाजीराजांनी कान्होजी व दादाजीपंत यांना शिवाजी महाराजांकडे जाण्याची आज्ञा दिली आणि 'शिवबाला व स्वराज्याला सांभाळा' असा कानमंत्र दिला.मग कान्होजी स्वराज्य सेवेला आले आणि शिवाजी महाराजांच्या उजव्या हाताचे सरदार झाले.
सन १६५९ हा काळ स्वराज्यास खूप वाईट होता.''मैं शिवाजीको गिरफतार कर हुजूर के आज पेश करुंगा'' अशी प्रतिज्ञा करून अफजल खान स्वराज्यावर चाल करून आला होता.खान म्हणजे शुद्ध कपटकसाई, हिंदूंचे देवस्थळे नष्ट करणे त्याने सुरु केले,चौकाचौकात गाई कापल्या जाऊ लागल्या,रयतेची छळ,पिळवणूक होऊ लागली,सर्वत्र नुसती नासधूस........
एवढे करूनही यश मिळत नसल्यामुळे खानाने कपटाचा एक डाव आखला.महाराजांचे काही सरदार त्याने आपल्या बाजूस करण्यास सुरुवात केली.त्यांना वतनाचे,सुभेदारीचे,धनदौलतीचे आमिष दाखवले जाऊ लागले.अश्याच आमिषाला बळी पडून (फितूर) खंडोजी खोपडा देशमुख याने महाराजांसोबत दगाबाजी केली.खानाला सामील झाला.
आणि अश्याच एके दिवशी बादशहाचे शाही फर्मान कान्होजी नाईक जेध्यांच्या दारी आले.त्या फार्मनाचा सारांश असा कि, 'शिवाजी सोबत रहाल तर वतनाला मुकाल.आमच्या सोबत या अफजलखानाच्या सेवेला जा,ते तुम्हास वतन, सुभेदारी,धनदौलत देतील. तसे न केल्यास परिणाम चांगला होणार नाही.' फर्मान वाचताच कान्होजींच्या पायाखालची जमीनच सरकली. बादशहाने थेट धमकीच दिली होती.काय करावे ते समजत नव्हते.एकीकडे वतनाचा प्रश्न तर दुसरीकडे स्वराज्य सेवा.
कान्होजीने आपल्या ५ मुलांना सोबत घेतले.घोडा काढला ,तलवार कमरेला लावली ,ते फर्मान कमरेला खोचले आणि जेधे व त्यांची मुले घोड्यावर स्वार होऊन निघाले ते थेट राजगडाला जाऊन थांबले.दरबारात येऊन महाराजांना मुजरा केला आणि ते फर्मान महाराजांना दाखवले. महाराजांनी फर्मान वाचले आणि कान्होजीला म्हणाले,'' खंडोजी खोपडा गेला तुम्हीही जा, बादशहाचा हुकुम मोडला तर तुमच्या प्राणास धोका आहे.शिवाय तुमचे वतन पण मिळेल तेथे. आमच्या सोबत राहून काय मिळणार तुम्हाला? '' हे शब्द ऐकताच कान्होजीची स्वामीभक्ती जागी झाली. कान्होजीच्या अंगातले रक्त सळसळले. कान्होजी महाराजांकडे पाहून बोलला,''राजे! असे न बोलावे. हरामखोरी तीही तुमच्याशी फक्त वतन आणि धनदौलतीसाठी मुळीच नाही.राजे! जेध्याची औलाद हरामखोरीच्या पोटाची नाही.आम्ही आपल्याकडे आलो ते थोरल्या महाराजांच्या हुकमावरून आणि सदैव आपल्याकडेच राहणार.'' यावर महाराजांनी पुन्हा विचारले,'' तुमच्या वतनाचे काय म?'' यावर कान्होजी म्हणाला,'' स्वराज्यासाठी आणि महाराजांसाठी वतनावर पाणी सोडले.'' आणि त्याने खरोखरच महाराजांसमोर हातावर पाणी सोडले.
पुन्हा महाराजांना म्हणाला,'' राजे! अजूनही तुम्हाला वाटत असेल कि मी त्या अफजलाकडे जावं तर हे मी माझ्या मुलांसोबत माझे शिर आपल्या पुढे झुकवत आहे,तुम्ही ते समशेरीने धडावेगळे करा.कटून मरू पण स्वराज्याशी कधीच गद्दारी नाही करणार.'' महाराज कान्होजीची परीक्षा घेत होते आणि त्यांची निष्ठा पाहून ते खूप खुश झाले.
अश्याच निष्ठावंत मावळ्यांमुळे स्वराज्य उभे राहिले.ज्यांना धनदौलतीपेक्षा फक्त स्वराज्य महत्वाचे होते.
धन्य ते कान्होजी.......
(संदर्भ:-'राजा शिवछत्रपती' पृ.क्र.२७०-२७६)
आमचं देवक गरुड पक्षी/पंख आहे . देवका वरून तरी आमचं मूळ आडनाव माने असावे अस वाटत पण आमचं कुलदेवी राशीन ची यमाई आहे आणि कुलदैवत जेजुरी खंडोबा
ReplyDeleteआमचं आडनाव सरोदे आहे .
गाव-सरदवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे ।
माहिती मिळाल्यास कळवावे
9422903007
sarodeamar@gmail.com