जाधव आडनावाचा इतिहास
महाराष्ट्रात आठव्या शतकापासून यादवांचे राज्य होते. हे यादव श्रीकृष्णाचा भाऊ बलराम यांचे वंशज होते. बलरामाच्या वंशातील दृढप्रहार हा या वंशाचा मूळ पुरुष होता. या वंशातील सेऊणचंद्र यादवाने महाराष्ट्रात साम्राज्य स्थापन केले.त्यामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये बलराम या व्यक्तिमत्त्वाला खूप मोठे आदरस्थान होते. बलरामाची प्रतिमा ही नेहमी खांद्यावर नांगर घेतलेली दाखवली जाते - यावरूनच समजून येते की भारतातील शेतकऱ्यांमध्ये बलरामाला दैवताचे स्थान होते. उत्तर भारतामध्ये शेतकर्यांमध्ये बलराम हे नाव प्रचलित आहे. उदाहरणार्थ बलराम जाखड हे शेतकरी कुटुंबातील होते. एकेकाळी केंद्रीय कृषिमंत्री होते. महाराष्ट्रात हेच नाव 'बळीराम' असे ठेवले जात असे. बलरामाला शेतकरी कुटुंबांत आदराने बळीराजा असे म्हटले जात असे. साधारण दोनशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रामध्ये ब्रिटिश सरकारच्या काही चाकरांनी - ब्रिटिशांच्या फायद्यासाठी हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू केले. त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्यांनी राक्षस राजा बलि हाच शेतकऱ्यांचा बळीराजा असल्याचे लिहायला आणि सांगायला सुरुवात केली. सरकारच्या पाठिंब्यामुळे हा प्रचार शंभर-दीडशे वर्षे सुरू राहिला आणि आता तर लोक राक्षसराजालाच शेतकऱ्याचा बळीराजा मानतात.परंतु महाराष्ट्रातील यादव / जाधव घराणे किंवा त्यांच्याशी संबंधित अन्य मराठा घराणी - ज्यांच्यामध्ये बलरामाचे रक्त वाहते आहे; त्यांच्यापासून एक मोठा बहुमान काढून घेण्यात आला आहे. ही फसवणूक महाराष्ट्रात 'पुरोगामी' म्हणवल्या जाणाऱ्या लोकांनी केली आहे.
जाधव घराणे हे देवगिरीच्या यादवांच्या घरण्यातूनच निर्माण झाल्याच्या काही नोंदी आढळतात. साधारणतः १३ व्या शतकात कृष्णदेव महादेव रामदेवराय यांना खिलजीने पराभूत केलं. त्यानंतर कृष्णदेव गोविंददेव यांच्यापासून जाधव आडनाव लावण्यास सुरुवात झाली.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा, जिजाऊंचे पिता, निजामशाहीतील मराठा वतनदार असणारे राजे लखुजीराव जाधव यांनी 12 वर्ष अजिंक्य राहिलेला देवगिरी किल्ला जिंकून जाधव घराण्याचे नाव खऱ्या अर्थाने उंचावले. जाधव हे आडनाव क्षत्रीय मराठ्यांचा वारसा सांगणारे असले तरी सद्य परिस्थितीत महाराष्ट्रातील इतर समाजात देखील जाधव आडनाव लावल्याचे पाहायला मिळते.
जाधव हे आडनाव मूळचे यादव या शब्दावरून आले आहे .
महाभारतातील कौरव व पांडवांचे पूर्वज पुरु यांच्या एका सावत्र मोठया भावाचे नाव यदु होते . ह्या यदुस त्याचे वडील राजा ययाती ने राज्य करण्याच्या अधिकारातून पदच्युत केले , तेव्हापासून त्याचे वंशज स्वतः ला यादव म्हणवून घेऊ लागले .
पुढे याच यादवांचे काही वंशज स्वतःस जाधव म्हणवू लागले .
No comments:
Post a Comment