विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 21 April 2021

सम्राट अशोक इतिहास व कार्य

 पुस्तकाचे नाव :- सम्राट अशोक
लेखक :- वा.गो. आपटे
प्रकाशन :- मधुश्री प्रकाशन



किंमत :- १५०/-

*सम्राट अशोक  इतिहास व कार्य..!!*

भारतासह पाकिस्तान, नेपाळ, बांगला देश, अफगाणिस्तान, भूतान, इराण, तुर्कमेनिस्तान, ताजिबस्तान, उझबेकिस्तान, या देशावर एकहाती शासन चालवणारे, उत्कृष्ट, महापराक्रमी चक्रवर्ती सम्राट अशोक..!
प्रसिद्ध इतिहासकार एच.जी. वेल्स म्हणतो. - "जगामध्ये स्वत:ला राजे, महाराजे म्हणवणारे हजारो होऊन गेले; पण खऱ्या अर्थाने ज्याचे नाव जगाच्या इतिहासात तळपतच राहील असे एकमेव म्हणजे सम्राट अशोक"
भारतीय इतिहासातील प्राचीन इतिहास म्हणून ओळखला जाणारा तत्कालीन शासन काळ म्हणजेच मगध साम्राज्य. पाटलीपुत्र एक प्रभावी व समृद्धशाली राज्य होते जिथे अनेक शूर राजांनी राज्य केले त्याच पाटलीपुत्र येथील मौर्य शासक अशोकच्या जीवनाविषयी जाणून घ्या...
चक्रवर्ती अशोक सम्राट हे बिंदुसार आणि महाराणी धर्मा यांचे पुत्र होते. त्यांच्या फक्त तीन मुलांचा उल्लेख आपल्याला इतिहासामध्ये सापडतो.
सम्राट अशोक ह्यांना राणी पद्मावती, तीश्यारक्षा, महाराणी देवी व करुवकी इत्यादी राण्या होत्या तसेच कुणाल, महेंद्र, संघमित्रा, जालूक, चारुमती, तीवाला इत्यादी संताने होती.
सम्राट अशोक ने इसवी सन पूर्व २६१ मध्ये कलिंगवर आक्रमण केले. ही लढाई रक्तरंजित झाली. शिलालेखांच्या अनुसार कलिंगच्या युद्धात सव्वालाख लोक सामील होते आणि त्यामध्ये एक लाखाहून अधिक लोक मारले गेले असा उल्लेख आहे. कलिंगच्या युद्धातील नरसंहार बघितल्यानंतर त्यांनी क्षत्रिय धर्म टाकून दिला व बुद्ध धम्माची दीक्षा घेतली.
त्यानंतर त्यांनी आपले पूर्ण आयुष्य शांती सामाजिक आणि धार्मिक प्रगतीवर समर्पित केले.
सम्राट अशोक यांच्याबद्दल महत्वपूर्ण गोष्टी
सम्राट अशोक आपल्या आयुष्यामध्ये एकही युद्ध हरले नाही. अशोकाने ८४ हजार स्तूप बांधले यामध्ये मध्य प्रदेशातील सांचीचा स्तूप व सारनाथ येथील शिलालेख स्तंभ विश्व प्रसिद्ध आहे.
सम्राट अशोकने आपल्या जीवन कार्यामध्ये २३ जागतिक दर्जाच्या विश्वविद्यालयांची स्थापना केली होती.
तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला, कंधार सारखे विश्वविद्यालय त्यांच्याच कार्याने झाले.
ह्या विद्यालयांमध्ये परदेशातून विद्यार्थी शिकण्यासाठी येत असत हि विश्वविद्यालये त्यावेळेसची सर्वात श्रेष्ठ विश्व विद्यालये होती. अशोकाने स्वतःचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना बौद्ध धम्म प्रचारासाठी श्रीलंकेला पाठविले. ही भावंडे पुन्हा कधीही भारतात परतली नाहीत.
सम्राट अशोकाने तिसरी धम्मसंगीती बोलावून धम्माचे व संघाचे मूळ स्वरुप पुन्हा स्थापित केले. त्यामुळे बौद्ध धम्माचे तत्वज्ञान जिवंत राहिले.
अशोकाच्या शासन काळात भारतात विज्ञान व तंत्रज्ञान यांसोबतच आरोग्य शास्त्रात खूप प्रगती झाली. त्यांच्या शासनकाळात चोरी, लुट वगैरे सारख्या घटनांना कडक शासन मार्गाचा अवलंब अशोकाने केला यामुळे ह्या सर्व बाबींना आळा बसला.
अशोकाने दळणवळणासाठी रस्ते निर्माण केले तसेच वाटसरुना भोजन व पाणी पिण्याची सोय उपलब्ध केली. आज मोठ्या महामार्गांवर दोहोबाजूंनी झाडे लावण्याची पद्धत दिसून येते. ही कल्पना सम्राट अशोकाचीच.सारनाथ येथील शिला स्तंभ व अशोकचक्र आज भारतातील प्रमुख वास्तू म्हणून ओळखल्या जाते. भारतीय झेंड्यातील अशोकचक्र अशोक राजाच्या महान कारकिर्दीची साक्ष देते, त्यामुळेच ते आज भारताचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून ओळखल्या जाते.
अश्या या महान राजाचा इसवी सन पूर्व २३२ साली मृत्यू झाला. इतिहासात केवळ युध्द व हिंसा ह्याचाच समावेश नसतो तर एक तत्ववेत्ता राजा सुध्दा जन्म घेऊन गेला आहे ज्याने दया शांती अहिंसा ह्यांचा परम आदर्श जगाला दिला ह्याचे मूर्तिमंत उदाहरण आपल्याला अशोकच्या रूपाने पहायला मिळते.
अशा सम्राट अशोकाचे चरित्र मुळातून वाचायला हवे...!!

*विशेष टीप :- शिवस्पर्श प्रकाशनाची आणि डॅा.आ.ह. साळुंखे व प्रा. मा.म.देशमुख तसेच पुरोगामी चळवळीच्या लोकांनी वाचायलाच हवीत अशी इतर अनेक पुस्तके आमच्याकडे उपलब्ध. जरूर मागवा*

*परस्परांना पुस्तके भेट द्या. वाचन चळवळ जोपासा*

-ॲड.शैलजा मोळक
मी वाचक-लेखक # वाचन संस्कृती
शिवस्फूर्ती मीडिया सेंटर व शिवस्पर्श प्रकाशन पुणे
पुस्तके मागवण्यासाठी संपर्क :-
9823627244

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...