विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 4 April 2021

२८ मार्च १७२१ ‘शाहुनगरची’ स्थापना...


 २८ मार्च १७२१ ‘शाहुनगरची’ स्थापना...


भारतातील एकमेव अभेद्य राजधानीचे शहर म्हणजेच सातारा.. शहराचे (शाहूनगर) संस्थापक “छत्रपती थोरले शाहूमहाराज”...

औरंजेबाच्या कैदेतून सुटून आल्यावर शाहूमहाराजांनी सातारच्या किल्ल्यावर आपल्या राज्याभिषेक करवून घेतला व सातारच्या किल्ल्यावरूनच त्यांनी राज्यकारभाराची सूत्रे हलवण्यास सुरुवात केली अडचणीत सापडलेले मराठा साम्राज्य शाहूमहाराजांच्या समयसूचक धोरणांमुळे हळू हळू मोकळा श्वास घेऊ लागले विखुरलेले एक एक मराठा सरदार एकत्र करून त्यांच्यात स्वराज्यची उर्मी नव्याने जागृत करत शाहूमहाराजांनी मराठा स्वराज्याला मराठा साम्रज्याचे स्वरूप देण्यास सुरुवात केली मराठा साम्राज्याचा चोहूबाजूला जसाजसा विस्तार होऊ लागला तसातासा सातारच्या किल्ल्याचा परिसर प्रशासनच्या दृष्टीने कमी पडू लागला व त्यातूनच सातारा शहराच्या स्थापनेची कल्पना पुढे आली आणि शहराची मुहूर्तवेढ रोवत शाहूमहाराजांनी मराठा स्वराज्याच्या ७० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच स्वज्याची राजधानी डोंगरावरून जमिनीवर आणली...

सातारा शहराची अर्थात शाहुनगरीची रचना व त्यातील भागांची नवे शाहूमहाराजांच्या आमदनीची आठवण करून देतात राजकीय महत्व संपले तरीही मराठा साम्राज्यही राजधानी म्हणून साताऱ्याचा अभिमान महाराष्ट्रीयांना आजही वाटतो शाहुनगरची स्थापना १७२१ च्या सुमारास झाली शाहूमहाराजांच्या दिनांक २८ मार्च १७२१ च्या पत्रात तातडीने वाडा बांधल्याचा उल्लेख आहे शाहूमहाराजांच्या व पेशव्यांच्या भेटी होत त्या रोजनिशीत नोंदल्या आहेत त्यावरून शहर रचनेच्या कालावधीचा अंदाज लागतो डिसेंबर १७२० च्या सुमारास श्रीमंत बाजीरावांनी शाहूमहाराजांची भेट सातारा किल्यावर घेतली त्यानंतर सात-आठ महिन्यांच्या भेटी माची किल्ले सातारा येथे झालेल्या आहेत त्यापुढे ऑगस्ट १७२१ ला शाहूनगर नजीक केल्ले सातारा येथे श्रीमंत बाजीरावांनी शाहूमहाराजांची भेट घेतली असा उल्लेख आहे.. अर्थात १७२१ च्या सुमारास शाहूनगर स्थापना झाली...

हिंदुस्तानच्या राजकिय घडामोडींवर अंकुश ठेवणारा स्वराज्याची चौथी राजधानी किल्ला “अजिंक्यतारा”....🚩

➖➖➖➖➖➖➖➖
फोटोग्राफी : उमेश पिल्लाई.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...