विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 14 May 2021

इतिहासात 96 कुळी मराठा असा उल्लेख पहिल्यांदा कधी व कुठे आढळतो? भाग २

 


इतिहासात 96 कुळी मराठा असा उल्लेख पहिल्यांदा कधी व कुठे आढळतो?

भाग २
संजय सोनवणी यांचे मत
96 कुळी मराठ्यांबद्दल इतिहासात नोंदी असल्या तरी सध्या ती सरकार दरबारी 96 कुळी मराठा असा या समाजाचा उल्लेख केला जात नाही. "96 कुळी ही कागदोपत्री जात नाही. शाळेच्या दाखल्यावरही अनेक लोक फक्त 'मराठा' असा उल्लेख करतात. 96 कुळी मराठा ही जात नसून तो कुटुंबांचा समूह आहे," असं सोनवणी सांगतात.
सातवाहनांच्या काळात महारठ्ठी हे पद अस्तित्वात होतं. आजच्या काळात जसा जिल्हा असतो तसा त्या काळातल्या प्रांताला 'रठ्ठ' असं म्हटलं जायचं. या प्रांताच्या प्रमुखाला 'महारठ्ठ' म्हणत. आताच्या काळात जसा कलेक्टर असतो त्याप्रमाणेच हे प्रशासकीय पद होतं. महारठ्ठ या शब्दातूनच पुढे मराठा हा शब्द नावारूपाला आला,"
महारठ्ठ हे पद पूर्वी वंशपरंपरागत नव्हतं, पण कालांतराने ते पद वंशपरांपरागत झालं. अनेक वर्षं केवळ प्रशासकीय पद असणाऱ्या लोकांमध्येच लग्नं जुळली. त्यामुळे त्यांना जातीचं स्वरूप मिळालं. कालांतराने ज्यांच्याकडे जमीनदारी राहिली नाही किंवा विभागणी होत होत अल्प जमीन हाती राहिली ते लोक स्वतः शेती करू लागले. तो वर्ग शेतकरी किंवा कुणबी म्हणून नावारूपाला आला, असं आपण म्हणू शकतो,"
डॉक्टर भांडारकर यांचे मत
एकटा क्षत्रिय दहा हजार योद्धाबरोबर लढु शकतो त्या रणधुरंधरास मरहट्ट -महारथी असे म्हणतात, असे इतिहास तज्ज्ञ डॉ भांडारकर ह्यांनी सांगितले आहे. त्यांचे असेही म्हणणे आहे कि संस्कृत शब्द 'महाराष्ट्र'या वरून मरहट्ट, महारथी, मराठा हा शब्द उदयास आला असावा. या विषयी आणखी माहिती देतांना ते म्हणतात कि ख्रिस्त सनापूर्वी सातव्या शतकात क्षत्रिय दक्षिणेत आले. याचा उल्लेख कात्यायनात आढळतो. तसेच ख्रिस्तपूर्व आढळणाऱ्या तिसऱ्या शतकातील अधिक राजाच्या शिलालेखातही याचा संदर्भ बघायला मिळतो.

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...