विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 1 June 2021

पुरंदरचे मराठे

पुरंदरचे मराठे 


 मै रेतीला बवंडर हू दिलेरखान इन सब को अपनी आगोष मे ले के डूबा दुंगा....! | जयसिंह

राजाजी रेत के बवंडर दिल्ली के मैदानो पर कुछ कर नही सके, ये चट्टानी मरहट्टो के सामने तो आपको अपनी खैर मनानी चाहिये | दिलेरखान
एक कडवा राजपूत, आपल्या तितक्याच कडव्या सहकाऱ्याशी हितगुज करत होता, पण तो सहकारी, आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा चिवटपणा अनुभवत होता, आणि त्याच्या तोंडून, स्वतःच्या सहकार्याच्या मनसुब्यांची कुचेष्टा व्हावी इतका समोरील पराक्रम अवाक करणारा होता. एक वार मिर्झा राजांनी दिलेर खानाकडे आपला जळजळीत कटाक्ष टाकला, पण मराठ्यांसमोर आपल्या सैन्याची मात्रा चालतच नाही हे पाहून मनातून खासा व्यथित झाला होता.
हे शिपाईच खुदाचे होते. संपूर्ण बळानिशी मराठे मोगली लोंढ्यावर तुटून पडत होते, मोगली जथ्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. त्यामुळे सातत्याने लढणाऱ्या मर्दांच्या मानवी शरीराच्या मर्यादाही त्यांच्या पराक्रमाच्या आड येऊ लागल्या होत्या. पुरंदरावर असणाऱ्या मराठ्यांची संख्याही मुळातच तुटपुंज होती.
गड जिंकावा म्हणून कधी दिलेरखान कधी मिर्झाराजे आपापल्या परीने प्रयत्नांची शिकस्त करत असताना, मराठ्यांनी त्यांच्या आकांक्षा अशाकाही धुळीला मिळवल्या का ये पुरंदरच्या वेढ्यात त्यांना गडाचग खड्या चढणीचा टप्पा काबीज केल्याचे समाधान मानावे लागत होते.
वेढ्याच्या रोजच्या रोज बातम्या राजगडी जाऊन धडकतच होत्या, त्यांत नसानसात नुसतं शौर्य भिनवणाऱ्या मुरारबाजीनं आपल्या लोकांना कशा प्रकारे प्रवृत्त करून ठेवलंय हे देखील कळत असे.
अल्लाची मेहरबानी म्हणावी का पुरंदराच्या पांढऱ्या बुरुजावर असणाऱ्या दारूगोळ्यानं पेट घेतला अन ८० मावळे एका क्षणातच आकाशी उडून कामी आले. पण शेकडो वर्षांनी मेलेल्या मनांना जिथं स्वत्वाचा अंकुर फुटला होता ती झुंजार मनं आता मागं हटायला तयार नव्हती.
सफेद बुरुज पडला व मोगल पुरंदर माचीला येऊन भिडले. तरही जणूकाही घडलेच नाही, अशा आवेगाने मराठे लढतचं होते. किल्ल्यावरून तोफांचा मारा सुरु झाला. आणि त्याला प्रतिकार म्हणून मोगलांनी देखील लाकडी दमदमे उभारून तोफांची सलामी देण्यास सुरवात केली, यातच बुरुजावरील मराठे जखमी होऊ लागले.
अखेर काळा बुरुज अन त्याच्याजवळील दुसरा बुरुज खाली करून मराठे बालेकिल्ल्यावर निघून गेले. दि. २ जून १६६५ रोजी पुरंदर माची व पाच बुरुज मोगलांच्या ताब्यात गेले.
तरीही पुरंदर लढतचं होता. लढतचं होता............!
अभिषेक कुंभार

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...