विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 27 June 2021

बजाजी निंबाळकर भाग १

 

बजाजी निंबाळकर

भाग १ 

बजाजी निंबाळकर हे विजापूरच्या आदिलशाहीचे निष्ठावंत सेवक होते. आपली बहीण सईबाई हिचा विवाह त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी लावून दिला होता. तद्पश्चातही निंबाळकर हे आदिलशाहीच्या दरबारी चाकरी करायचे. १६४८ साली आदिलशहाने शहाजीराजांना कैद करून शिवाजीवर फतेहखान व फरादखानास पाठविले होते. त्यावेळी त्यांच्यासमवेत फलटणचे निंबाळकरही स्वराज्यावर चालून आले होते.

या बजाजी निंबाळकरांना जुलमाने बाटवून मुसलमान केले होते.संदर्भ हवा ] त्यांना शिवाजी महाराजांनी परत हिंदू धर्मात आणले. या धर्मराजकारणात राजमाता जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. एवढेच नव्हे तर, महाराजांनी बजाजी निंबाळकर यांचा मुलगा महादजीशी आपल्या सखुबाई नावाच्या मुलीचा विवाह करवून दिला. हा विवाह १६५५ साली झाला. त्यावेळी महादजी हे फलटणचे सरदार होते.

या बजाजीराव निंबाळकरांचे निधन १६८२मध्ये झाले. त्यांची समाधी फलटण गावी आहे. बजाजी निंबाळकर यांचा मुलगा महादजी व सून सखुबाई यांची समाधी माळशिरस गावी आहे

फलटण हे गाव आदिलशाहीच्या राज्यात महत्त्वाचे समजले जाई. महाराजांच्या काळात बजाजीराजे नाईक निंबाळकर हे तिथले जहागीरदार होते.

फलटणचे बजाजी नाईक निंबाळकर यांच्यासबंधी एक प्रसिद्ध दंतकथा आहे. ती अशी की -

“विजापूरच्या आदिलशहाने त्यास विजापूरला धरून नेले व त्याचे धर्मांतर केले. गावी परतल्यावर आपल्याकडून झालेल्या धर्मांतराचा बजाजींना पश्चात्ताप झाला. बजाजीराव ह्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी शिखर शिंगणापूर येथे विधिसर हिंदू धर्मात आणले. त्यानंतर काही दिवसांनी बजाजीचा मुलगा महादजी निंबाळकर यास शिवाजी महाराजानी आपली मुलगी दिली.”

मात्र, असे धर्मांतर झाले असा कुठेही उल्लेख नाही आणि जर बजाजीराव यांचे धर्मांतर झालेच असेल तर मग त्यांचे ” मुसलमान “ नाव काय, हे आजतागायत कोणीही देत नाही. या कथेचा उल्लेख करताना कुठलीच तारीख – शक – संवत्सर काहीसुद्धा आजपर्यंत उपलब्ध झालेले नाही. दंतकथाकार कथेत बजाजीराजे हे १६४२ मधे मुसलमान झाले असे म्हणतात. त्या हिशोबे त्यांचे १६४२ ते १६५१ या कालखंडामध्ये जर धर्मांतर झाले असेल तर त्यांचा कागदोपत्री उल्लेख हा मुसलमान नावाने यायला हवा, पण तो येत तर नाहीच तर, याच दरम्यान त्यांचा उल्लेख समकालीन कागदपत्रामंध्ये हिंदू म्हणूनच केला जातो.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...