विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 12 June 2021

कदमांची घराण्याची कुळकथा !

 कदमांची घराण्याची कुळकथा !




पोस्तसांभार :: डॉ.सतीश कदम
कर्नाटकातुन कदंब राजवंश इ.स. ३५० ते ५२५ पर्यंत राज्य करत होता हे सर्वांना माहितच आहे. त्यांच्या राज्यात दक्षिण महाराष्ट्रही सामील होता. बनवासी नंतर हंगळ आणि गोव्यातही त्यांनी पाय रोवले. या कदंब राजवंशाची उत्पत्ती कशी झाली याची माहिती अनेक शिलालेखांतुन मिळते. शिवशंकराचा स्वेद कदंब व्रुक्षावर पडला व त्यातुन त्रिलोचन कदंब (वा मयुरशर्मा) या आद्य राजपुरुषाचा जन्म झाला अशी पुराकथा येते. जन्मता:च त्याला तीन नेत्र आणि चार बाहु होते असेही ही पुराकथा सांगते. अन्यही काही पुराकथा आहेत, आणि त्याही शिव-पार्वतीपासुनच या वंशाचा जन्म झाला असे सांगतात.
या राजवंशातील मयुरशर्मा कदंबच्या नावामागे "शर्मा" हे पद असल्याने तो ब्राह्मण असला पाहिजे असे काही इतिहासतद्न्य मानतात. महाराष्ट्रातील अजय मित्र शास्त्री आणि वि. भि. कोलतेही ब्राह्मण मुळाचे समर्थक आहेत. पण हाच प्रकार त्यांनी खुद्द सातवाहनांबद्दलही केला आहे आणि ते अत्यंत चुकिचे आणि अनैतिहासिक कसे आहे हे मी अन्यत्र स्पष्ट केले आहे.
मयुरशर्म्यानंतरच्या सर्वच कदंब राजांनी मात्र "वर्मा" हे उपपद घेतले आहे व ते क्षत्रियवाचक आहे. (उदा. मयुरशर्म्याचा पुत्र कंगवर्मा). इतिहासात अनेक क्षत्रिय राजांनीही शर्मा हे उपपद लावल्याचे दिसते त्यामुळे शर्मा-वर्मा यातुन जात-वर्ण शोधणे चुकिचे आहे....तसेच ब्राह्मणाने राजपद धारण केले तरी आपला वर्ण सोडल्याचे एकही उदाहरण इतिहासात मिळत नाही. श्रुंग घराणे या द्रुष्टीने पहावे. थोडक्यात कदंब ब्राह्मण नव्हते...तसेच वर्णाश्रमधर्मानुसार क्षत्रियही नव्हते. ब्राह्मण इतिहासकारांनी इतिहासातील प्रत्येक महत्वाचा राजवंश हा ब्राह्मणच होता हे सिद्ध करण्याच्या नादात अनेक ऐतिहासिक सत्ये दडवली आहेत. त्यांचे म्हनने खरे असते तर आजचे सारे कदम ब्राह्मण असायला हवे होते किंवा काही ब्राह्मणांची आदनावे कदंब/कदम असायला हवी होती. पण तसे चित्र नाही.
कर्नाटकातील हे कदंब राजघराण्याशी आजच्या महाराष्ट्रातील कदमांशी सर्वस्वी पुर्णपणे संबंध जोडता येत नाही, हेही तेवढेच खरे, पण कदंब व्रुक्ष देवक माननार्या समाजातच कदंब राजवंश जन्माला आला, त्या अर्थी कदंब जनसमुहाची व्याप्ती फार मोठी होती हे स्पष्ट दिसते. कदम हे आडनाव "कदंब" या व्रुक्षाशी निगडीत आहे, हे स्पष्ट आहे. कदंब व्रुक्ष हा सिंधु काळापासुन पवित्र मानला गेला आहे. भारतातील अनेक पुरातन मानवी समुदायांचे हा व्रुक्ष देवक असुन तो अति पुजनीय मानला गेला आहे. भारतातील अनेक आडनावे ही देवक प्रथेतुनही निर्माण झाली आहेत हे येथे लक्षात ठेवायला हवे. खुद्द कर्नाटकात कदंबु नावाची एक लढवैय्या जमात आहे.
कदंब देवक असलेल्या, शिवापासुन आपली उत्पत्ती झाली असे मानणार्या मानवी समुदायाने आपले आडनाव "कदम" ठेवणे संयुक्तिकच आहे. पण सारेच कदंब कुलीन कदमच आडनाव लावतात असे नाही तर त्यातही कालौघात बदल घडलेले आहेत. काजळे, कळंब, भसे, हिरे ही काही उदाहरणे आहेत. हेही मुळचे कदंबच आहेत. हे बदल घडण्याची कारणे तत्कालीन समाजस्थितीत शोधावी लागतात.
कदम ही पुरातन काळापासुन एक लढवैय्या जमात राहिलेली आहे. अगदी पानिपत युद्धापर्यंत त्यांचा नावलौकिक कायम राहिलेला आहे. खानदेशातील कदमबांडे हेही याच जनसमुदायातील आहेत.
कदम मंडळी पुर्वी वर्णव्यवस्थेत नव्हती. ती कट्टर शैव असुन तुलजाभवानी, खंडोबा अशा अवैदिक देवतांचे भक्त राहीले आहेत...किंबहुना त्यांची कुळदैवतेही हीच आहेत. कदंब राजवंशातील काही राजांनी अश्वमेध यद्न्य केला आहे हेही खरे आहे, पण तत्कालीन परिस्थितीत राजे ब्राह्मणांसाठी य्द्न्यही करीत, विहारांनाही देनग्या देत आणि जैनांनाही मदत करत. यद्न्य केला म्हणुन त्यांना वैदिक ठरवले तर ते त्याच वेळीस बौद्धही होते आणि जैनही होते असे मान्य करावे लागते. त्यांना क्षत्रियत्व कधीच बहाल केले गेलेले दिसत नाही.
(जसे भोसले कुळालाही केले गेले नाही. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक वैदिक नव्हे तर पुराणोक्त पद्धतीने झाला होता. संदर्भासाठी पहा ..."गागाभट्टीय" कारण गागाभट्टाने वरकरणी महाराजांना क्षत्रिय मानले असले तरी प्रत्यक्षात त्याची क्रुती ही त्यांना शुद्रच ठरवणारी होती. वेदोक्त राज्याभिषेक हा ऐतरेय ब्राह्मणातील विधींनुसार करावा लागतो...प्रत्यक्षात त्याने व्रात्यस्तोम विधी सोडला तर अन्य विधी पुराणोक्त पद्धतीनेच केले. यावरुन होणारा बोध म्हनजे कदम्ब वंशीयही ब्राह्मण तर सोडाच कधीच क्षत्रीयही मानले गेले नव्हते...आणि त्याचा काहीएक फरक पडत नाही...दैवायत्त कुले जन्म: मदायत्तंच पौरुषम" हेच काय ते खरे.
पुर्वोक्त एका लेखात मी आजचा मराठा समाज हा अनेक वंशांच्या मिश्रणातुन तयार झाला आहे असे म्हटले आहे. कदंब आणि अन्य राजघराण्यात विवाह झाले आहेत हे मी शिंद राजवंशाच्या संदर्भातही दाखवुन दिले आहे.
कदमही मुळचे उत्तरेचे आहेत काय असा प्रष्न (जसा शिंद वंशाच्या संदर्भात विचारला गेला आहे) पडणे स्वाभाविक आहे...पण ते वास्तव नाही. तसे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. पुराणकथा सर्वस्वी आहेत तशा स्वीकारता येत नाहीत. तत्कालीन बव्हंशी सम्राट उत्तरेकडचे असल्याने आपलेही मुळ उत्तरेकडे दाखवण्याच्या नादात ही गफलत झालेली दिसते.
डॉ.सतीश कदम

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...