श्री दाजीबाभाऊ डोये वाडा, डोंगरगाव, गोंदिया
जमीदार श्री दाजीबाभाऊ डोये यांचा डोंगरगांव येथील वाडा. असे म्हणतात की ह्यांच्याकडे ४४ गावाची जमीदारी व स्वतःची २५००० एकर जमीन होती. हया वाड्याचे बांधकाम इ स १९०७ चे इंग्रजकालीन आहे, हयाचे बांधकाम करण्यासाठी साहित्य मुंबईवरुन मागविण्यात आले, कारागीर मद्रास चे होते, या वाड्याला मोरबी कंपनीच्या चिनीमातीच्या टाईल्स लावल्या आहेत, त्यांचे रंग आणि चमक आजही कायम आहे, सदर वाडा तिन मजली असून खाली तळघर आहे, हा वाडा बांधन्यास व साहित्य जमवाजमव करण्यात ६/७ वर्षे लागली असे सध्या असलेले जमीदार श्री पुर्णचंद्रराव व श्री श्यामभाऊ यांचे वडील जमीदार श्री रामकृष्णराव यांनी त्यांना सांगितले होते असे कळले, हया वाड्यात तिसरी, चौथी पिढीचे श्री सतीशराव व पाचव्या पिढीतील मुले राहतात.
(फोटो आणि माहिती - Kishor Vaidya)
No comments:
Post a Comment