विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 20 June 2021

छत्रपती संभाजी राजेंना पकडणाऱ्या मुकर्रबखानाचा अंत

 





छत्रपती संभाजी राजेंना पकडणाऱ्या मुकर्रबखानाचा अंत

पोस्तसांभार ::आशिष माळी
"याद रखणा मुकर्रब खान ,आम्हाला हरवेल असं रणांगण नाही अन आम्हाला मारू शकेल असं मरण नाही. ठरवलं तर आम्ही या साखळदंडानी देखील लढू ,पण लढू."
हे वाक्य मुकर्रबखानाला बोलणाऱ्या संभाजी महाराजांचा शब्द ठेवला संताजी घोरपडे यांनी.ज्या संगमेश्वर वरून मुकर्रब खानने संभाजी महाराजांना पकडले त्या मुकर्रब खान आणि त्याचा मुलगा इखलियस खानाला संगमेश्वर पासून 70 किलोमीटर वर पन्हाळ्याजवळ मारले.
छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाल्यावर येसूबाई यांनी असीम बलिदान करत राजाराम महाराजांचे मंचकारोहण केले. छत्रपती राजाराम महाराज रायगडवरुन प्रतापगड, पन्हाळ्या मार्गे जिंजीला निघून गेले. येसूबाई आणि इतर लोक रायगडासहित मुघलांच्या ताब्यात गेले.
छत्रपती राजाराम महाराज जिंजीकडे प्रवास करत असताना इकडे मोगलांच्या गोंधळलेल्या अवस्थेचा फायदा मराठ्यांनी घेतला.
औरंगझेबचे सर्व सरदार आणि सेना नायक गोंधळून गेले. संभाजी महाराज नंतर पूर्ण भारत आपल्या ताब्यात आला असं समजलेल्या लोकांना हा मोठा धक्का होता. छत्रपती संभाजी महाराजांच्या पकडणाच्या अगोदर स्वराज्य फक्त कोकणात शिल्लक होते. बाकीचे घाटावरच्या किल्ले आणि ठाणे मुघलांनी बेजार केलेले.
पण या एकाच चालीत मराठ्यांचे स्वतंत्र संग्राम नाशिक पासून जिंजी म्हणजे तामिळनाडू पर्यंत वाढलेले. मराठ्यांच्या फौजा चपळ तर मुघलांच्या फौजांची गती हळू. याचा फायदा संताजी घोरपडे, धनाजी जाधव, विठोजी चव्हाण, रुपाजी भोसले ,नेमाजी शिंदे यांनी घेतला. रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण, या सारखे सदरावरील अधिकारीसुद्धा आता रणांगणात उतरले.
प्रथम पाटणपर्यंतचा भाग काबिज केला, मराठे कोल्हापुर भागात पसरलेले असताना शेख निजाम अर्थात मुक़र्रबखान मराठ्यांवर चालून आला. यावेळी सेनापती संताजी घोरपडे हे पन्हाळगडावर होते ही बातमी कळताच सेनापती संताजी घोरपडे यांनी ऑक्टो-नोव्हें १६८९ मध्ये पन्हाळगड सोडला आणि कोल्हापुर भागावर चालून आलेल्या मोगल सैन्यावर हल्ला चढवला.
मोगल आणि मराठे यांच्यात जोरदार चकमक उडाली पण सेनापती संताजी घोरपडे आणि मराठ्यांच्या कडव्या प्रतिकारापुढे मोगल सैन्यानी कमी पडले. मोगल रणांगण सोडून वाट दिसेल तिकडे पळू लागले. मुकर्रबखानाला तलवार आणि भाल्याच्या जखमा झाल्या पण त्याचे नशीब तो सेनापती संताजी घोरपडे यांच्या तावडीतून कसाबसा वाचला. पुढे या मुकर्रबखानचे नाव कुठेही आढळत नाही यामध्येच लढाईत झालेल्या जखमेने त्याचा मृत्यू देखील झाला असण्याची शक्यता आहे. मुकर्रबखानचा मुलगा इखलीयास खान उर्फ खानेआलम हा देखील या युद्धात जबर जखमी झाला होता. या लढाईत मराठ्यांचे ७०० तर मोगलांचे ४०० जण कामी आले पण मराठ्यांनी मोगलांचा दारूण पराभव केला.पण या खाफी खानने लिहलेले वृत्त्तात मुकर्रखान खान आणि त्याचा मुलगा पळून गेल्याचा लिहितो. पण त्यानंतर कोणत्याही कागदपत्रात या बाप बेट्यांचा उल्लेख नाही.
आकण्ण आणि मकान्न हे कुतुबशाही चे दोन मोठे वजीर. अबुहसंन कुतुब शहा याच्या मतने चालायचा. याचा राग मुकर्रबखाना ला होता. त्यांचा कट्टर विरोधक होता. औरंगझेब ने 1686 ला गोवळकोंडया ला वेढा घातला त्यावेळी हाच मुकर्रबखान उर्फ शेख निझाम औरंगझेब ला मिळाला. छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्यावर याचा सत्कार औरंगझेब नेंकेला होता. असा मोठा सरदार अचानकपणे याच लढाई नंतर मुघलांच्या किंवा समकालीन कागदपत्रांतून गायब झाला त्यामुळे अनेक मराठी इतिहासकार च्या मते याच लढाईत या बाप बेट्याना संताजी घोरपडे ने मारले असावे.
संदर्भ -
१) महेश तेंडुलकर, रणझुंजार सेनापती संताजी घोरपडे
२) शिवकाल ( १६३० ते १७०७ ), डॉ वि.गो.खोबरेकर

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...