रायबा तान्हाजी मालुसरे
सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या मुख्य रांगेमध्ये पारगड हा किल्ला वसला आहे. या सह्याद्रीच्या कुशीत सर्वांत दक्षिणेकडील किल्ला म्हणजे पारगड किल्ला. हा किल्ला साधारपणे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात येतो. चंदगडपासून साधारण ३० किमी अंतरावर पारगड आपल्याला पाहायला मिळतो. पारगड गावही या किल्ल्यामध्येच वसले आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांनी सिंहगड किल्ला १६७१ मध्ये जिंकला होता. यावेळी झालेल्या युद्धात तानाजींचा मृत्यु झाला होता.
पुढे काही काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी पारगड किल्ला बांधला व त्याची जबाबदारी किल्लेदार म्हणून तानाजी मालुसरे यांचे पुत्र रायबा मालुसरे यांच्याकडे सोपवली. त्यावेळेस काही काळ महाराजांनी या गडावर मुक्काम केला होता असे सांगितले जाते. “आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे” असा सुभेदार तानाजी मालुसरे यांचा इतिहास अमर झाला.
त्यांचा पराक्रम इतिहास प्रसिद्ध आहे. तानाजी मालुसरे धारातीर्थी पडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः उमरठला जाऊन रायबा मालुसरे यांचा विवाह केला होता. 1674 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेजवळचा पारगाव किल्ला बांधला.
हा किल्ला अतिशय घनदाट जंगल आणि स्वराज्याच्या फार कडेला असल्यामुळे याचे नाव पारगड ठेवले छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांचे पुत्र रायबा मालुसरे यांना गडाचे किल्लेदार नेमल्यावर त्याच्यासोबत किल्यावर शेलार मामा होते. मग पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये पारगडावर मोघलांची अनेक आ क्र म णे आली पण गडावरील मावळ्यांची ती आ क्र म णे परतुन लावली आणि हा पारगड अजिंक्य ठेवला.
पारगड गोव्यावरती आक्रमण करणाऱ्या हालचालींवरती लक्ष ठेवण्याकरता बांधण्यात आला होता. “जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत गड जागता ठेवा” अशी छत्रपतींची आज्ञा होती आणि त्या आज्ञेप्रमाणे आज छत्रपतींच्या मृत्यूनंतर जवळपास आजही तानाजी मालुसरे यांच्या वंशजांनी ही आज्ञा पाळली आहे.
तसेच आजही तानाजी मालुसरे यांचे 11 वे वंशज बाळकृष्ण मालुसरे, तसेच शेलार मामांचे वंशज कोंडीबा शेलार, गडावरील झेंडे लावण्याचे काम असलेल्या वंशज शिवाजी झेंडे व खंडोजी झेंडे ,घोडदळ प्रमुखचे वंशज विनायक नांगरे तसेच गडकऱ्यांचे वंशज शांताराम शिंदे , याचबरोबर विठोजी माळवे यांचे वंशज कानोबा मावळे इत्यादी गडावरती अजूनही वास्तव्यास आहेत.
एका आक्रमनात तो’फखाना प्रमुख विठोजी माळवे हे धारातीर्थी पडले होते त्यांची समाधी या पारगडवर पहावयास मिळते. तसेच मोघलांची अनेक आ क्र म णे होऊनही पारगड शेवटपर्यंत राहिला आणि अजूनही हा गड अजिंक्य आहे. तानाजी मालुसरे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतरही रायबा मालुसरे यांनी हा पारगड अजिंक्य ठेवला होता.
जय भवानी जय शिवाजी..
No comments:
Post a Comment