विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 4 July 2021

स्वराज्य महासती श्रीमंत सकल सौभाग्य संपन्न कांक्षीणी वज्रचुडेमंडित महाराणी पुतळाबाई राणीसाहेब छत्रपती

 स्वराज्य महासती श्रीमंत सकल सौभाग्य संपन्न कांक्षीणी वज्रचुडेमंडित महाराणी पुतळाबाई राणीसाहेब छत्रपती” ह्यांस विनम्र अभिवादन...

माहिती लेखन : डॉ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे (ताईसाहेब)..


🙏🚩
छत्रपती शिवरायांचा आणि पुतळाबाई राणीसाहेब यांचा विवाह १५ एप्रिल १६५३ मध्ये पुणे येथील शहाजी राजांच्या जहागिरीत थाटामाटात पार पडला. पुतळाबाई राणीसाहेब या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौथ्या पत्नी होत्या.त्या नेताजी पालकर यांच्या घराण्यातील होत्या. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पुणे व अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर घोड नदीच्या दक्षिणेस चार किलोमीटर अंतरावर असलेले मौजे तांदळी हे त्यांचे मूळ गाव...
छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर पुतळाबाई राणीसाहेब एक निष्ठावंत पत्नी म्हणून राजांच्याबरोबर राहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर स्वराज्याच्या जडण-घडणीत पुतळाबाई राणीसाहेब यांचे मोठेच योगदान होते. सईबाई राणीसाहेब यांच्या मृत्यूनंतर राजांना आधार वाटत होता तो म्हणजे धाकल्या राणीसाहेब श्रीमंत सकल सौभाग्य संपन्न पुतळाबाई राणीसाहेब यांचाच...
पुतळाबाई राणीसाहेब निपुत्रिक असूनही त्यांनी संभाजीराजांना आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे वाढवले, संस्कारी बनवले त्यांच्याकडून कोणतीही चूक होणार नाही याची त्यांनी पुरेपुर काळजी घेतली पुतळाबाई राणीसाहेब अत्यंत प्रेमळ, मायाळू आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांच्यावर अतिशय प्रेम करणाऱ्या अशा राणीसाहेब होत्या आयुष्यभर छत्रपती शिवरायांना मोठा आधार होता तो फक्त जिजाऊंचा..त्यानंतर सईबाई राणीसाहेब यांचा व तद्नंतर राजांना आधार वाटत होता तो फक्त श्रीमंत सकल सौभाग्य संपन्न पुतळाबाई राणी साहेब यांचाच...
माहिती लेखन : डॉ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे (ताईसाहेब)..🙏
➖➖➖➖➖➖➖➖
चित्रकार : Pramod Kallappa Morti...👌🏼♥️

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...