विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 13 July 2021

गजापूरच्या घोडखिंडीत



 हिंदुस्तानाच्या इतिहासात ३६१ वर्षांपूर्वी १३ जुलै १६६० रोजी गजापुरच्या घोडखिंडीत न भूतो न भविष्यती असे युद्ध झाले.बाजीप्रभू देशपांडे , शंभसिंग, फुलाजी देशपांडे त्यांच्या हाताखालची ६००बांदल सेना स्वराज्यासाठी, रयतेच्या राजासाठी मृत्युला मिठी मारली. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखान वधानंतर १८ दिवसात आदिलशाही मुलुख कब्जात घेतला. खासा पन्हाळा किल्ला घेतला.तिकडे सरसेनापतीं नेतोजी पालकरांनी विजापुरच्या आसपासचा प्रदेश कब्जात घेतला. पण किल्ला त्याच्या समोर झुकत नव्हता तो म्हणजे मिरज. महाराजांनी नेतोजींना दुसऱ्या मुलखात धुमाकुळ घालायला सांगून स्वत: जातीने मिरजेला वेढा द्यायला आले.इकडे आदिलशहाने सिद्दी जौहर यांस सलाबतखान किताब देऊन ३५०००-४०००० हजार फौज ,तोफा, हत्ती देऊन स्वराज्यावर पाठवले व आम्ही त्या काफरवर आमचा नामजाद सरदार पाठवला आहे व तुम्हीसुद्धा तुमच्याकडील नामजाद सरदार पाठवा. आपण दोघे मिळून त्यास बुडवू असे पत्र दिल्लीत असलेल्या औरंगजेबाला पाठवले.आता काय होणार महाराज बिथरले असतील नाही अजिबात नाही त्यांच्यासारखे संयमी पुन्हा होणे नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांना ही बातमी कळाली त्यांना हे अपेक्षितच होते.ते ताबडतोब पन्हाळयावर गेले. कारण पन्हाळा स्वराज्याच्या ऐन टोकावर उभा होता. जर जौहर स्वराज्यात घुसला असता तर रयतेस तोशीस लागली असती. अखेर सिद्दी जौहर पन्हाळयाच्या पायथ्याला पोहोचला.प्रत्येकाला कामे सांगून किल्ल्याला वेढा घातला खरतर तो वेढा महाराजांनी त्याला घालायला दिला कारण त्यांना रयतेची काळजी होती. दिवस जात होते. सिद्दी जौहरने राजापुरच्या इंग्रजांकडे तोफा व दारूगोळा मागितला. इंग्रजांनी दिलासुद्धा .असे होते विश्वासघाती इंग्रज.इंग्रज पन्हाळयावर आले.इंग्रजांनी तोफा पन्हाळ्यावर डागल्या. महाराज संतापले पण त्यांनी तो आवरता घेतला. काही काळात नेतोजी पालकरांनी. वेढा फोडण्याचा प्रयत्न केला परंतु सपशेल अपयशी ठरला.
दिवसामागून दिवस जात होते. किल्ल्यातील अन्नधान्य संपत आले होते. महाराज एकवेळ फलाहार करीत होते रात्री जेवत नसत.महाराजांनी राजकारणाचा पट मांडला त्यांना विलक्षण युक्ती सुचली. नजरबाजांना गडाखाली पाठवले. त्यांनी मोक्याची जागा शोधून काढली. इकडे शिवाजी महाराजांनी शिवा काशीद व बाकी सहकाऱ्यांना सांगितली. ठरवल्याप्रमाणे सिद्दी जौहरला गंगाधरपंत यांस वकील म्हणून पाठवले‌. शिवाजी राजे शरण येणार या एका बातमीने सिद्दी जौहर छावणी गाफिल झाली. १२ जुलै चा दिवस उजाडला आणि सहयाद्रिचे महाराज निघाले व बहूरूपी महाराजही निघाले. रात्र ,वारा,पाऊस यांनी शत्रुला गुंगारा दिला.ते शिवा काशीद होते. सिद्दीला खबर मिळाली राजे पळतायत. त्याला सुचायच बंद झाल. त्याने त्याच्या जावयाला मसूदला पाठवले पण त्याने बहूरूपी शिवाजी महाराजांना पकडले. सगळयांना संशय आला सिद्दीने विचारले कौन हो तुम त्याने मी शिवा काशीद आतापावतर महाराज पोहचले असतील गडावर मला माझ्या राजाची कापड घालायला मिळाली . साताजन्माच कल्याण झाले. रागाच्या भरात शिवाच्या छातीत तलावर खुपसली. अखेरचा मुजरा म्हणत ते शांत झाले व परत सगळे निघाले. इकडे महाराज व बाकी मंडळी घोडखिंडीत पोहचली. बाजीप्रिभूंनी सगळे ओळखल. ते महाराजांना म्हणाले राजे निघा तुम्ही महाराज. म्हणाले नाही आम्ही आपल्या मावळयांनासोबत राहणार येणाऱ्या शत्रुला अंगावर घेऊ बाजी म्हणाले महाराज तुमच्या पाया पडतो. आम्ही तुमच्यापेक्षा वयाने मोठे आहोत तुम्ही आम्हांला लेकरासारखे. लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे तोच नाही जगला तर आम्ही रयतेच्या स्वराज्याला काय तोंड देणार. तुम्ही गडावर जा तोफांचे तीन बार द्या.महाराज निघाले गळाभेट घेऊन
अचानक शत्रुची फौज आली. हरहर महादेवची गर्जना झाली. ६०० बांदलाच्या तलवाऱ्यां सरसावल्या .शत्रुची कत्तल उडाली. साक्षात कालभैरव तांडव करीत होता.राजे तिकडे गडाकडे प्रस्थान करत होते पण त्यांना तिकडे सुर्वे व दळवी फौज घेऊन विशाळगडाखाली उभे होते. इकडे बाजी व सर्व बांदल पराक्रमाची शर्थ करीत होते पण अचानक फुलाजी ठार झाले. बाजीप्रभूंचा दांडपट्टा शत्रुला पायचित करत होता. बाजी जखमी झाले होते.अचानक शत्रुगटाकडुन त्यांच्यावर झाला ते कोसळले. पण राजे गडावर जाईपर्यंत लढायचच असा
निर्धार होता. गडावरून तोफांचे आवाज झाले. तसे बाजी म्हणाले माझा राजा गडावर पोहचला आता शेवटचा राम राम घ्यावा.सगळयांची कत्तल उडाली
स्वराज्यासाठी स्वत:च्या जीवावर निखारे ठेवणाऱ्या या ६०० बांदलांना,शिवा काशीद, बाजीप्रभू देशपांडे शंभोसिंग जाधव यांना मानाचा त्रिवार मुजरा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...