विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 13 July 2021

#बांदल_सेना_शौर्य_दिन #पावनखिंडीचा_रणसंग्राम

 #१३_जुलै_१६६०


#बांदल_सेना_शौर्य_दिन
🚩⚔️🏹🚩⚔️🏹🚩⚔️🏹🚩⚔️🏹🚩
भूपा हिर्दसो भ्धुतः प्रभुत भिजन प्रियाः॥
मज्जैत्र यत्राः कुवर्णाः प्रोल्लो सन्ति पदे पदे ॥
(अर्थ:- हिरडस मावळमध्ये लोकप्रिय असणारे राजेबांदल माझी विजय यात्रा यशस्वी करत, प्रत्येक पावलाला माझ्या सैन्याचा उत्साह वाढवीत आहेत.)
हिरडस मावळ मधील बांदलांचं हे वर्णन दस्तुरखुद्द शंभूछत्रपतींनी केलंय...
या नावाचा संधी विग्रह बाण+दल= बांदल असा केला जातो..
म्हणजे तिरकामठ्याने(धनुष्यबाणाने) लढणारी सेना.
- #श्रीमंत_कृष्णाजीराजे_बांदल हे हिरडस मावळचे म्हणजेच भोर तालुक्यातील आळंदे ते उंबर्डे या ५३ गाव क्षेत्राचे स्वतंत्र वतनदार.
- सन १६२५ मधे बांदलांनी निजामाचा वजिर मलिक अंबर यास हरवून #केंजळगड जिंकला.
- १६३६ मधे दादोजी कोंडदेव (आदिलशाही विजापुर सल्तनत) यांनी #कृष्णाजी_बांदल यांच्यावर हल्ला केला व पराभुत झाले.
- पराभवानंतर दादोजींनी कृष्णाजींना मसलतीस बोलावुन कपटाने कैद केले व खून केला.
- कृष्णाजींच्या मृत्युनंतर त्यांची पत्नी दिपाऊ व पुत्र #रायाजी_बांदल आपल्या बांदल सेनेसमवेत स्वराज्यात सामील झाले.
- बांदल सेनेने स्वराज्यासाठी पुढील लढायांत मोठे योगदान दील्याचे संदर्भ मिळतात.
▶️ प्रतापगड युद्ध (अफजलखान प्रकरण)
▶️ पन्हाळगड वेढा व पावनखिंड (सिद्दी जौहर प्रकरण)
▶️ दक्षिण दिग्विजय मोहीम
-पैकी प्रतापगड युद्धात #श्रीमंत_कान्होजीराजे_जेधे समवेत बांदल सेनेने महापराक्रम गाजविला, यानंतर शिवरायांनी रुस्तम-ए-जम्याला हरवून राजापूर व विशाळगड हस्तगत केला विशाळगडाच्या संरक्षणासाठी महाराजांनी बांदल सेनेला तैनात केले.
- तसेच पन्हाळगडच्या पायथ्याला पडलेल्या सिद्धीच्या फौजेला गुंगारा देऊन विशाळगडाकडे जाताना वाटेत गजापूरच्या खिंडीत अवघ्या ३०० बांदल सेनेने सिद्दी मसूदच्या फौजेला रोखुन धरुन लढता लढता वीरमरण पत्करले.
- यानंतर छत्रपतींनी किल्ले राजगड दरबारी स्वराज्याच्या पहिल्या पात्याचा(तलवारीचा) मान #श्रीमंत_कान्होजीराजे_जेधे यांना विनंती करून #नाईक_बांदल यांना बहाल केला.
- बांदल हे जन्मजात योद्धे होते, बांदलांच्या सेनेने गजापूरच्या खिंडीत गाजवलेला पराक्रम अद्वितीयच आहे, पण आम्ही कथा कादंबऱ्या वाचून खिंड फक्त बाजीप्रभूंनीच लढवली असा समज करुन बसलो आहोत.
पण याच लढाईत #रायाजी_बांदल, #कोयाजी_बांदल यांच्यासह ३०० बांदल व इतर मावळे देखिल प्राणपणाने लढले होते.
ज्या प्रमाणात बाजीप्रभूंचा उल्लेख होतो त्या प्रमाणात आजही बांदल सेनेचा साधा उल्लेख होत नाही ही मोठी खंतच.
बाजीप्रभू हे बांदल यांच्याकडे दिवान म्हणून नोकरीस होते, ते सुद्धा पावनखिंडीत धारातीर्थी पडले.
- दक्षिण दिग्विजय मोहीमेत बांदल छत्रपतींसमवेत होते, मुघल सेनेने शिरुर-शिक्रापूर येथे केलेल्या लुटीमुळे बांदलांनी विडा उचलून मुघल फौजेवर हल्ला केला. या शिक्रापूरच्या घनघोर रणसंग्रामात बांदलांनी विजय मिळवला.
- रायाजींचे पुत्र सुभानजी यांना छत्रपतींनी मानाची तलवार बहाल केली.
तर अशी १२ मावळ मधील आणि आत्ताच्या भोर तालुक्यातील #बांदल या घराण्याची खरी कथा..
_/\_
काही विशिष्ट योद्धांचीच दखल आजवरच्या इतिहासकारांनी घेतली, त्यामुळे बांदल सेनेचा पराक्रम आजवर अंधारातच आहे.
पण खरा इतिहास हा ढगांनी झाकोळलेल्या सुर्यासम असतो जास्त काळ लपुन राहत नाही.
- छत्रपतींशी एकनिष्ठ असणाऱ्या नाईक-बांदल घराण्यातील वीरांच्या समाध्या #पिसावरे, #महुडे, #संगमनेर, #इंगवली, #आळंदे (ता.भोर, जि.पुणे) या गावी असून इतिहासप्रेमींनी थोडी वाट वाकडी करुन आवर्जुन भेट देण्यासारख्याच आहेत.
या शूर परंतू अपरिचित योद्ध्यांना आज "बांदल सेना शौर्य दिन" निमित्त विनम्र अभिवादन...
बांदलांनी छत्रपती शंभूराजेंच्या काळातदेखील स्वराज्याशी इमान ठेवले होते.
संदर्भ-
जेधे शकावली, शिवभारत, जेधे करीना, बांदल तकरीर, स्वराज्याचे शुर सेनानी
🏹🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏹
✍🏻संकलन:-

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...