नारायणराव पेशवे यांच्या खूनानंतर कोणाकोणाला शिक्षा झाली?
पोस्तसांभार ::आशिष माळी
सध्या 'रामशास्त्रीं' सारखखे न्यायनिष्ठ असणे ही खुपच दुर्मिळ गोष्ट आहे. न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभूंणेनी नारायणरावांच्या हत्येची चौकशी करून आनंदीबाईना धारच्या किल्ल्यात नजरकैदेत ठेवले (तेथेच दुसरा बाजीराव जन्मला.) त्यानंतरच्या चौकशीत रामशास्त्री प्रभुण्यांनी थेट रघुनाथराव पेशव्यांना देहांताची शिक्षा ठोठावली होती.
हत्येतील अपराधी महंमद इसफासला नोव्हेंबर १७७५ ला आणि खरगसिंग व तुळाजी पवार ह्यांना इ. स. १७८० ला मृृत्यूदंड देण्यात आला.
सुमेरसिंग हा हाती येण्यापूर्वीच जुलै १७७४ वारला. त्याचे मुलगे व दुसरे कित्येक अपराधी आयुष्यभर तुरुंगात राहिले.
इतरांना निरनिराळ्या गडांत न्यूनाधिक सक्तीच्या व मुदतीच्या तुरुंगात ठेवण्यात आले. सर्वांची घरे व संपत्ती सरकारात जप्त करण्यात आली.
त्या झटापटीच्या वेळीस मारले गेलेल्या माणसातील चाफाजी टिळेकर व नारो गणेश फाटक यास इनाम जमिनी देण्यात आल्या
महंमद इसफ ह्यास पकडणारा ताजखान ह्यासही इनाम जमीन देण्यात आली.
तुळ्या पवार व खरगसिंग हैद्राबादच्या सैन्यात जाऊन चाकर राहिले होते. ते हाती येण्यास पुष्कळ वेळ लागला. सर्व जण हाती आल्यावर सर्वांच्या जबान्या घेण्यात आल्या व शिक्षा देण्यात आल्या .
गारदी पळून जाऊन इंग्रजांच्या आश्रयास गेले होते. त्यास इंग्रजांनी धरून पुण्यास पाठविले. पायास सुया टोचू,न हत्तीचे पायी बांधून, तापलेल्या सळ्या कानात घालून, त्यांचे हाल करून मारले.[1]
हा भारताच्या इतिहासात न्यायाधीशाने सत्ताधीशाला असा दंड सुनावण्याचा पहिलाच प्रसंग असावा! मात्र या शिक्षेची अंमलबजावणी कधीच झाली नाही, कारण त्यावेळी पेशवे घराण्यात दुसरा पुरुष जिवंत नव्हता आणि याच राघोबांनी पुढे पराक्रमही गाजवला. प्रायश्चित्ताच्या नावाखाली हा मृत्युदंड माफ केला गेला!
पार्श्वभूमी
पेशवे माधवरावांनी मृत्युवेळी रघुनाथरावाहाती नारायणरावांचा हात देऊन, सांभाळ करण्यासाठी सखारामबापू, नाना व मामा पेठे यांच्यासमक्ष त्यांना सांगितले व तेव्हा रघुनाथरावांनी स्विकारले. सखाराम बापूनेही वचन दिले होते .
मुळात या काळात सर्वाधिक कर्तृत्ववान ठरत, मराठा साम्राज्य रघुनाथरावांनीच वाढवले होते. अटकेपार जाणे ही म्हण त्यांच्या पराक्रमामुळेच पडली. पेशवेपदापासुन दोनदा डावलल्याने ते नाराज झाले होते. त्याला इतर मंडळींनीही खतपाणी घातले. यातूनच नारायणरावांच्या खुनाचा बेत ठरला.
नारायणराव पेशव्यांना धरण्याचे काम वाड्यावरील पहारा करणार्या गारद्यांच्या सुमेरसिंग, खरकसिंग, महंमद इसब या तीन जमातदारांना सोपविले. त्यांना रघुनाथराव पेशवे व आनंदीबाईंनी हुकूम दिला. त्यात नारायणरावास ``धरावे’’ असे वाक्य होते. पण पूर्वी ठरल्याप्रमाणे, आनंदीबाईने तो हुकूम मागून घेऊन, रघुनाथरावांच्या अपरोक्ष त्यातील ``ध’’ चा ``मा’’ केला(वास्तवात मोडी लिपीत हे शक्य नाही). महंमद इसाफच्या जबानीत तो 'नारायणरावास मारावे असे कोणाचेच मत नव्हते ते काम आयत्या वेळेस सुमेरसिंगाने केले' असे म्हणतो.
गारद्यांस या कामासाठी साष्टी, नगर व पुरंदर हे तीन किल्ले आणि पांच लक्ष रुपये देऊ केले होते.
नानांना या पकडण्याची थोडीशी कुणकुण होती, कारण गारदी नेहमीच पैशासाठी कटकटी करीत; तसेच स्वतः थोरले माधवराव १ वर्ष व दादा तर ५ वर्षे बंदी होते. त्यामुळे पकडण्याच्या कटाविषयी फारशी दक्षता कोणी घेतली नाही.
घडले कसे
इ. स. ३० आॅगस्ट १७७३ ला नारायणराव पेशवे सकाळीं कुलाब्याहून आलेल्या रघोची आंग्र्यांना भेटले व पर्वतीहून वाड्यांत परतले. त्यांना वाटेंत 'गारदी आज दंगा करणार' हे कळल्यावर त्यांनी हरिपंत फडक्यास गारद्यांचा बंदोबस्त करण्यास सांगितले. परंतु हरिपंतानें तात्काळ बंदोबस्त न करता तो कोठें बाहेर गेला, बंदोबस्त करण्याचे त्याने ठरविले; दंग्याबद्दल त्याला विशेष वाटले नाही. वरील पकडण्याची आज्ञा, तुळाजीजवळ होती .मुख्य कारभारी तुळाजी होता. त्याने कटवाल्या मंडळीस कळवून लवकर काम संपवले .
दुपारी बारा वाजता सुमेरसिंगादि मंडळीने ७००-८०० गारदी हजेरीच्या निमित्ताने गोळा करुन, दिल्लीदरवाज्यावर चाल करून व पहारेकरी कापून सर्वत्र आपल्या चौक्या बसविल्या आणि एकसारखी लुटालूट व कत्तल चालविली. देवघर झाडून लुटले. ब्राह्मण ७।८ असामी, दोन गाई, दोन कुणबिणी, याखेरीज चौकीदार मारले गेले(गारदी नारायणरावांमागे पळत असताना शनिवरवाड्यातल्या काही कुणबीनी किंचालल्या. तेव्हा चिडलेल्या गरद्यांनी दोघीना कापून काढले). सुमेरसिंग व महंमद इसब एक टोळी घेऊन नारायण पेशव्यांचा शोध घेत होते. तेव्हा नारायण पेशवे हे दादांच्या खोलीत जाऊन त्यांना मिठी मारून प्राण वाचविण्यासाठी काकुळत करू लागले. गारदी आले. राघोबादादांनी त्यांना पेशव्यांस न मारण्याचे सांगितले, तेव्हा त्यांनी आता आम्हास मागे सरता येत नाही, पेशव्यास तुम्ही सोडा, नाही तर दोघेही मराल असे सांगितले. त्याचवेळी सुमेरसिंगाने एक वार केला, त्याने दादास जखम झाली; तेव्हा त्यानी पेशव्यांस लोटून दिले. इतक्यात तुळाजी पवार याने पेशव्यांचे पाय धरून खाली पाडले; तो चापाजी टिळेकर नांवाचा एक विश्वासू खिदमतगार त्यांच्या अंगावर पडला; परंतु काही उपयोग न होता गारद्यांनी त्या दोघांना ठार केले, इच्छारामपंत ढेरेहि यावेळी मारला गेला. नंतर राघोबादादांच्या नांवाची द्वाही वाड्यांत गारद्यांनींफिरविली.
वाड्यांत गारद्यांचा दंगा झाल्याचे शहरांत समजले. पुण्यात हुल्लड माजली. बापू, नाना, मामा वगैरे मुत्सद्दी जमा होऊन त्यांनी शहरची नाकेबंदी केली. परंतु वाडा गारद्यांच्या ताब्यात राहिला व आतील बातमी बाहेर कळेना. वाड्यास तोफा लावून गारद्यांस बाहेर काढावे असे कोणी सुचविले, परंतु ते बापू, नाना, मामांना पटेना. कारण वाड्यात श्रीमंत अद्यापि जिवंत असतील असेच त्यांना वाटत होते. इतक्यात दादांची चिठ्ठी सखाराम बापूस आली की, ``आतां व्यर्थ खटपट कशास करिता? चिरंजीव राव गारद्यांच्या कटकटीत मारले गेले.’’ मग बापू वाड्यात गेला व दादांस भेटला. नारायण पेशवे याना अधिकाधिक बंदी होईल असे सखाराम बापू ना वाटले, पण घडलेली भयंकर गोष्ट पाहून त्याचे मन विटले. दादाने त्यास कारभार हाती घेण्यास सांगितले, तेव्हा आपले शरीरी समाधान नाही, फडणविसास बोलवा. असे म्हणून तो घरी गेला. सायंकाळी त्रिंबकमामास बोलावून मध्यरात्री शवाचे दहन करविले. शवाच्या तुकड्यांची मोट बांधून गुप्तपणे दहन विधि उरकण्यात आला, असे रियासती मधे आहे.
सुमारे दीड-दोन मासांनी नारायणरावांच्या हत्येचा तपास संपल्यानंतर रामशास्त्री प्रभुण्यांनी राघोबा पुरावा सादर केला. त्या वेळी राघोबा शास्त्रीबुवास म्हणाले, "रावास धरण्याचा हुकूम मी सुमेरसिंग व महंमद इसफ ह्यांस दिला खरा, पण त्यांस मारण्याचा हुकूम मी काही दिला नव्हता". रामशास्त्री यांच्या तपासात दिसून आलेली हकीकत दादास कळविल्यावर दादाने यास काय शिक्षा म्हणून विचारले असता देहान्त असे उत्तर रामशास्त्र्यांनी दिला.
बारभाईंनी पुरंदरावर गंगाबाई ( नारायणरावानची बायको ) यांच्या नावाने कारभार सुरु केला. व लगेच गुन्हेगारास पकडून शिक्षा करण्याचे काम चालू झाले ते कैक वर्ष चालले यात पन्नास गुन्हेगार आहेत.
बारभाई हे नारायण पेशवे चा खून झाल्यावर सत्ताकाळात त्यांच्या वतीने कारभार पाहणारे बारा व्यक्तींचे मंडळ होते. नारायण पेशवे गर्भवती पत्नी व होणाऱ्या संततीचे रक्षण करण्यासाठी हे मंडळ एकत्र आले व नंतर त्यांनी कारभार पाहिला.
बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणवीस
सखारामबापू भगवंतराव बोकील
महादजी राणोजी शिंदे
मालोजी घोरपडे
हरिपंत फडके
मोरेश्वर बाबुराव भानू उर्फ मोरोबादादा फडणवीस
त्र्यंबकराव पेठे
तुकोजी होळकर
भवानराव प्रतिनिधी
बाबुजी नाईक बारामतीकर जोशी
मल्हारराव भिकाजी रस्ते
फलटणकर
तळटीप
1] मराठी रियासत - गोविंद सखाराम सरदेसाई
2}]नारायणराव पेशव्यांची बखर;
3] ग्रँटडफ
तळटीपा
[1] शिवकालीन इतिहासाची पाने
No comments:
Post a Comment