पराक्रमी शितोळे- सरकार घराणे :-
सुनिलाराजे प्रल्हादराव शितोळे देशमुख यांनी आपल्या घराण्याचा इतिहास या पुस्तकातून मांडला आहे. शितोळे घराण्याची ऐतिहासिक कागदपत्रे श्रीमंत सरदार कृष्णराव मालोजीराव शितोळे यांनी जपून ठेवली होती ती त्यांनी सुनिलाराजे यांच्याकडे सोपवली. सनदा आणि विविध कागदपत्रे तीनशे -साडेतीनशे वर्षांपूर्वीची आहेत. त्याचा तपशीलवार अभ्यास करून हे पुस्तक लिहिले आहे. शितोळे- देशमुख हे पुणे प्रांताचे देशमुख. बाराशे वर्षांहूनही अधिक काळ या घराण्याकडे देशमुखीचे हक्क अबाधित होते. या पुस्तकामुळे शिवाजी महारांजांना सहकार्य करणाऱ्या शितोळे देशमुख यांच्यासारख्या मोठ्या सरदारांची तपशीलवार माहिती व त्यांचा पराक्रम आणि देशभरात त्यांच्या घराण्याला असलेला मान याची माहिती मिळते. 300-350 गावांची देशमुखी शितोळे घराण्याकडे होती.
No comments:
Post a Comment