विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 13 August 2021

“तेजस्विनी अहिल्यादेवी खंडेराव होळकर”...

 १३ ऑगस्ट १७९५...


“तेजस्विनी अहिल्यादेवी खंडेराव होळकर”...
महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते त्याकाळी स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांचा वडिलांनी त्यांना लिहिण्या वाचण्यास शिकवले होते...
१७४९ मध्ये अहिल्याबाईंचे पती खंडेराव होळकर कुंभार यांच्या लढाईत मृत्यू झाला १२ वर्षांनंतर त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांचे निधन झाले त्या नंतर मालाव्या राज्याची राणी म्हणून त्यांचे नाव देण्यात आले आक्रमण कर्त्यांना लुटण्यापासून त्यांनी राज्याचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला त्यांनी स्वत: युद्धात सैनिकी नेतृत्त्व केले तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नियुक्ती केली राणी अहिल्यादेई मंदिरे एक महान प्रमुख आणि बांधकाम व्यावसायिक होते त्यांनी संपूर्ण भारतभर शेकडो मंदिरे आणि धर्मशाळा बांधले...
देवांची ओळख घडवली जाते ज्या अपार श्रद्धेने अहिल्या देवीनी पूजा केली असेल तेच देव आज आपल्या समोर मांडून ठेवले आहेत ही जाणीवही नतमस्तक करते नकळत हात जोडले जातात श्रद्धेपार उरते साध्वी राणी अहिल्या.. महेश्वरचा श्वास.. केवळ या वाडय़ावरच नाही तर एकूणच महेश्वर गावावर वाडा संस्कृतीची झलक नजरेस पडते महेश्वरी साडीचा एक अपूर्व ठसा राणी अहिल्यादेवी गावावर उमटवून गेल्या आहेत किल्ल्यात महादेवाचे मंदिर असंख्य पायऱ्यांनी बांधून काढलेला घाट...
घाटावर छत्र्यांची गर्दी घाटावरली मुक्ताबाईंची छत्री (समाधी) मोठी त्यामानाने अहिल्यादेवीची छत्री (दहन स्थळ-समाधी) साधी-सुधी त्याच बरोबर किल्ल्यावर भव्य दिव्य असे श्री अहिल्यश्वेरचे मंदिर आहे..
ते मंदिर राणी अहिल्यादेवी होळकर यांचे छत्री मंदिर म्हणून ओळखले जाते किल्ल्यावर श्रीमंत विठोजीराव होळकर यांची हि समाधी आहे (श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर-प्रथम यांनी बांधली) काही शतकापूर्वी बांधलेला घाट आजच्या काळातही इथल्या लोकांचे पालनपोषण करतो आहे इंदुर् ह्या लहानशा खेड्याला भरभराटिस आणण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे मात्र त्यांनी आपली राजधानी ही महेश्वर येथे स्थापीत केली त्या आपल्या प्रजेला आपल्या अपत्याप्रमाणे वागवत येथील किल्ल्याचे आज एका अद्ययावत हॉटेल मध्ये रुपांतर झाले आहे नर्मदासरोवर धरणाने त्यातील नर्मदेची पातळी वाढणार आहे (वाढली आहे) त्यामुळे राजवाड्याला धोका निर्माण झाला आहे १३ ऑगस्ट १७९५ ला राणी अहिल्यादेवी होळकर यांचे निधन झाल्यानंतर श्रीमंत सुभेदार तुकोजीराव होळकर (प्रथम) हे सन १७९५ ला गादीवर बसले...
――――――――――――
तेजस्विनी राजमाता अहिल्यादेवी होळकर विनम्र अभिवादन...🙏🚩

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...