विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 13 August 2021

श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर

 


श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर

१) मातब्बर सरदार मोठे दावाचे होते. ईश्वर इच्छेस उपाय नाही ! त्याचा भावी पदार्थ तसाच होता. परन्तु तिर्थस्वरूपांचे जाणे हिंदुस्थानास होऊन व परस्पर भेट होऊन मल्हाररावांचा काळ झाला. हा त्यांचा सकृत अंशच.
- माधवराव बल्लाळ प्रधान
२) मातब्बर सरदार जुन्यापैकी तेवढा होता. होळकर हिंदुस्थानी होता तेणेकरून वकुब होता.
- त्रिंबक हरी
३) 'पुनर्घटनेचे' कार्य मल्हारजींचे हातून घडून, इंदूर संस्थानात त्या घटनेनुसार अव्यवस्था मोडून टाकून अंतर्बाह्य सुव्यवस्था लावून दिली. नवी सृष्टी निर्मिली.
- डॉक्टर फ्रेजर
४) मल्हारजींनी शेकडो गणित युद्धे पहिली. हजारोगणती सेनेस इकडून तिकडे हलविले, आणि लाखोगणती रुपयांनी मालकांची व आपली तिजोरी भरली आणि राजकारणाचे नाजूक धागेधोरे उकलीले.
- सर जदुनाथ सरकार
५) स्वावलंबनाचा व स्वाभिमानाचा अगदी अलिकडचा संयोग हिंदुस्थानच्या पश्चिम भागावरून वाहत होता. या संयोगात मल्हारजींनी स्वतः शुर्चिभूत होऊन आपल्या जवळ जवळ तीन तपाच्या कारकिर्दीत हा प्रवाह उत्तरेस आणि दक्षिणेत अप्रतिहत वाहत ठेवण्याचे व पुढे वाहत राहाविण्याचे श्रेय संपादिले.
- मेजर इ. बेल. एम. पी.
६) "ईश्वर मोठा घात केला, सर्वांचे छत्र गेले. दादासाहेबांनी तमाम महाल, कोट, किल्ले, यांसी लिहिविली की चित्तात कोणीविसी खतरा न आणून आपापले जागा मजबुतीने व नाक्षने सुखरूप राहावे. सुभेदाराच्या जागी राजश्री मलेरावबाबा आहेत आहेत."
- चंद्रचूड
७) लौकिक मिळवून चाळीस वर्षे अधिक त्यांनी सैन्याच्या अधिपत्यात घालवली. ते आपल्या कारकिर्दीच्या अखेरीस तर मराठ्यांच्या जुटीत अग्रगण्य संमेलनात होते यात संशय नाही. सध्या गृहस्थी चालीविषयी व पौरुषेय, धैर्याविषयी मराठे लोक त्याजहुन दुसर्यास विशेष गणित नाहीत.
- माल्कम
८) मल्हाररावांचे शौर्य, साहस, युद्धचातुर्य इतके श्रेष्ठ व अद्वितीय होते की मराठ्यांच्या योद्यांपैकी "भीष्म" ही संज्ञा यथार्थरीतीने त्यांना देण्यात आली.
- श्री. व्यं. द्रविड
९) ओठात कुलदैवत खंडोबाचे नाव ठेवून _'आया मल्हार' !_ ही रणघोषणा देत खांद्यावर होळकरी 'बांडा झेंडा' मिरवत पुण्यापासून दिल्लीपर्यंत घोडा फेकणारा होळकर पाठीमागे सोळा कोटींचा राबता दणकट खजिना ठेवून खंडोबाला प्रिय झाला. पेशव्यांच्या खालोखाल सुभेदार या दर्जाचा स्वयंपराक्रमी अधिकारी झाला. "होळगावचे हे धनगरी कोकरु बाळ लोकरीची लव घेऊन जन्मले आणि सिंहाच्या छाव्यासारखे तळपले".
- ज्येष्ठ साहित्यिक शिवाजी सावंत.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...