विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 31 August 2021

मराठेशाहीतील एक पराक्रमी सेनानी “नरवीर चिमाजी अप्पा”....🚩

 


मराठेशाहीतील एक पराक्रमी सेनानी “नरवीर चिमाजी अप्पा”....🚩
“किल्ला ताब्यात येत नसेल तर मला तोफेच्या तोंडी देऊन किल्यावर पाठवा”...असे चिमाजी अप्पा वसई किल्ल्याच्या लढाई दरम्यान म्हणाले होते चिमाजी अप्पांनी २ वर्षे झुंज देऊन वसईचा किल्ला जिंकला आणि साष्टी बेटांवर मराठ्यांची सत्ता स्थापली १६ मे १७३९ रोजी वसईच्या लढाईत विजय प्राप्त करुन पोर्तुगीजांचे वर्चस्व नष्ट करण्याच्या महापराक्रमामुळे चिमाजी अप्पांचे नाव लोकमानसात रुजले आहे थोरले बंधू अजिंक्य योध्दा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या झगमगत्या कारकीर्दीत चिमाजी अप्पांनी त्यांना सदैव सावली सारखी साथ दिली...
चिमाजी आप्पांनी दोन वर्षाच्या मोहिमेत नुसती किनार पट्टीच नाही तर गिरीदुर्ग स्थलदुर्गासोबतच म्हणजे छोटेमोठे पाणकोट भुईकोट देखील रक्तरंजित संग्राम करून जिंकून घेत उत्तर कोकणचा सारा प्रदेश भयमुक्त केला असाच एक भुईकोट आताच्या पालघर जिल्ह्यातील शिरगाव येथे शिरगाव याच नावाने पेशवे व मराठ्यांच्या पराक्रमाची व गतवैभवाची साक्ष देत आजही ठामपणे उभा आहे...
शिरगाव वसईत पोर्तुगीजांच्या वाढत्या क्रूर अत्याचारांची दखल घेऊन वसई पोर्तुगीजांपासून मुक्त करण्यासाठी पुण्याहून श्रीमंत पेशवे चिमाजी आप्पा सैन्यानिशी वसईत येऊन दाखल झाले त्यावेळी चिमाजी आप्पांनी नुसती वसईच मुक्त केली नाही तर चिवट पोर्तुगीजांच्या वसईला वेढा घालून पार तलासरीपासून ते वर्सोवा, मढपर्यंतचा मुलुख जिंकून घेऊन क्रूर पोर्तुगीजांचे समुळ उच्चाटन केले...
चिमाजी आप्पांच्या वसई मोहीमेत या किल्ल्याने महत्वाची भूमिका वठवली होती इ.स १७३७ मध्ये मराठे व पोर्तुगिज यांच्यात पेटलेल्या वसईच्या युध्दामुळे धारावी बेटाला महत्व आले धारावी किल्ला हा वसईच्या किल्ल्या समोर आहे एका बाजूला वसईची खाडी तर दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र यामुळे धारावी किल्ल्या चे स्थान वसई मोहीमेत अतिशय महत्वाचे होते या किल्ल्यावरुन वसईच्या पोर्तुगिजांना समुद्र व खाडीमार्गे मिळणारी रसद तोडणे शक्य होते तसेच वसई किल्ल्यावर लक्ष ठेवणे व मारा करणे धारावी किल्ल्याच्या उंचीमुळे सहज शक्य होते...
➖➖➖➖➖➖➖➖
आर्टिस्ट : @kaustubh.kasture ...♥️

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...