संत शिरोमणी नामदेव महाराज!
संत नामदेव महाराजांनी ३ जुलै १३५० मध्ये समाधी घेतली. त्यांच्या कार्याबाबत थोडक्यात लेख!
महाराष्ट्राची भूमी साधू संतांची भूमी! अगदी १२ व्य शतकापासून या महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले त्यांनी लोकांना भक्तीची शिकवण दिली. असेच तेजस्वी संत म्हणजे संत नामदेव महाराज होय. नामदेव महाराजांचा जन्म मराठवाड्यातील नरसी या गावी १२७० मध्ये झाला. बालपणापासून विठ्ठलाबद्दल अपार श्रद्धा नामदेवा मध्ये होती. विसोबा खेचर हे त्यांचे अध्यात्मिक गुरु होते. महाराष्ट्रातील भागवत धर्म वारकरी पंथाचा विस्तार मोठ्या प्रमाणात नामदेव महाराजांनी केला. महाराष्ट्रात तर त्यांचे अभंग मोठ्या भक्तिभावाने गायली जातात. मात्र महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन उत्तर भारतात भागवत धर्माचा प्रसार करणारे संत नामदेव हे पहिले संत होय. संत नामदेव महाराजांनी मध्ये अपार भूतदया होती. एका प्रसंगावरून त्यांच्या असं लक्षात येईल . संत ज्ञानेश्वर माऊली पेक्षा नामदेव महाराज पाच वर्षांनी मोठे होते.नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाचे काम मोठ्या उत्साहाने केले. या दोन महान संतांची भेट आळंदी येथे झाली.संत नामदेवांनी साधारण २५०० अभंग लिहिले. त्यांची नामदेव गाथा मोठ्या भक्तिभावाने महाराष्ट्रात गायली जाते. शीखाचे धर्मग्रंथ "गुरुगंथसाहेब" मध्ये अनेक हिंदी पदे नामदेव महाराजांची समाविष्ट करण्यात आली. वारंकरी संप्रदायांचा विस्तार करण्यात संत नामदेव महाराजांचा महत्त्वाची भूमिका होती. नामदेव महाराजांना ८० वर्षाचे आयुष्य लाभले. या प्रदीर्घ काळात त्यांनी वारंकरी संप्रदायाचे प्रसार संपूर्ण भारतात केला. सन १३५० मध्ये पंजाबमध्ये नामदेव महाराजांचे निधन झाले. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !
-- प्रशांत कुलकर्णी मनमाड
No comments:
Post a Comment