विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 2 September 2021

दोन छत्रपती बंधूभेट

 


दोन छत्रपती बंधूभेट🏹🏹🏹
छत्रपती थोरले शाहू महाराज(सातारा) व छत्रपती संभाजी महाराज( कोल्हापूर )जाखीनवाडीतील वारणेचा तहात भेटप्रंसगाते अगोदर व नंतर झालेल्या घडामोडी समकालीन नोंदी सह देता आहेत
---------------------------------
तह झाले त्यासमयी प्रथम स्वारी साधारण नाम सवत्सरी सन इहिद्दे सल्लासीन माघ मासी साताराहुन श्रीमन्महाराज शाहूराजे याचकडून श्रीमन्महाराज राजश्री सभाजीमहाराज छत्रपति यासि न्यावयास आले व नावनिशी श्रीपतराव प्रतिनिधी व नारोराम मंत्री व अबाजी पुरधरे पेशव्यांचे मुतालिक व कृष्णाजी दाभाडे व निबांळकर व पांढरे व कित्येक नामानामी सरदार किल्ले पन्हाहिळाच्या मुक्कामी फौज सुध्दा आले श्रीमन्महाराज संभाजी महाराज छत्रपति साहेबास सर्वत्रानी नजरा व दुस्त व जडजडाव जवाहीर, हत्ती घोडे नजर करून सत्के करून जोहार केले त्या उपरि पध्दतीप्रमाणे चादरा त्यसि देऊन विडे होऊन ते किल्ले उतरले उपरातिक महाराज स्वामीची स्वारी कील्लयाखाली होऊन देवाळें नावली एथें मुक्काम जाहाला तेघून कूचदरकूच जाऊन वाठारावरी मुक्काम केला शाहूराजे उमरजेवरी होते श्रीपतराव व नारोराम मत्री वाठाराहून पुढे उमरजेस गेले आणि शाहूराजे यासह कऱ्हाड पुढे जखीणवाडीच्या नजीक माळावरी घेऊन आले त्याज बरोबर संपुर्ण सरकारकून व नामीनामी सरदार वैगरे फौज लक्ष पावेतो जखीणवाडीहून रावताची कोरगिरी वाठारा पावेंतो म्हणता दोन्ही सैन्ये मिळून दोन लक्ष जहाला श्रीमन्महाराज राजश्री संभाजी महाराज छत्रपति सोन्याच्या अबारीत स्वार होऊन समागमे सरकारकून व सरदार व नामीनामी खासे सरदार दहापाच हजारपर्यत होते कोरगिरीतून मुजरे घेत स्वारी जहाली श्रीमन्महाराज उभयता बाणाचे खास्तीवरी उभेराहून मध्ये लोक फरक करून बनवा टाकिल्या नामीनामी लोकनिशी शाहूमहाराज घोड्यावर स्वार होऊन आले श्रीमन्महाराज राजश्री संभाजी महाराज छत्रपतीची स्वारी हत्ती वरी होती, ते घोडयावरी स्वार होऊन बनवा बिछावल्या होत्या तेथे येऊन उभयता महाराज घोड्यावरून उतरले परस्पर सनिध येऊन ऐक्यता होऊन शाहूमहाराज याच्या पायावरि डोई श्रीमन्महाराज राजश्री संभाजी छत्रपती याणी ठेविली महाराजांनी परस्परांने उभयता बंधूनी आलिंगने केली , त्या वेळेस मोहरा व रूपये वसोन्याचा फुले रूप्याची फुले परस्पर सत्के जहाले, त्या समयी तोफेची सरबत्ती व नानाप्रकारचा वाधे शहाजाने वाजवून आनद जाहला फाल्गुन शुद्ध ३तृतायी मदवारी दोन प्रहार याप्रमाणे भेटीचा समारंभ जाहला तदनतर शाहूमहाराज याणा श्रीमन्महाराज राजश्री संभाजी महाराज छत्रपति याचा हात धरून उभयता बधू एक अबारीमध्ये हत्तीवर स्वार झाले खवासखान्यात दोन मोर्चल घेऊन सभूसिंग जाधवराव बसले सपूर्ण फौजेच्या कोरगिरीमध्ये जोहार घेत कऱ्हाडापर्यत गेले कऱ्हाड नजीक कृष्णातीरी मुक्काम जाहला दक्षिण तिरी श्रीमन्महाराज संभाजी महाराज छत्रपतीचा मुक्काम, उत्तर भागा श्रीमन्महाराज राजश्री छत्रपती शाहूराजाचा मुक्काम होता त्या डेरयापर्यत उभयता महाराज गेले त्या वेळेस शाहूमहाराज याची ज्या हत्तीवर स्वारी होती त्या हत्तीस व दुसऱ्या हत्तीस व दोन रंगविलेले घोडे एक रप्याच्या जिनाचा व एक जरीबादली जिनाचा व दुस्तबादली व जडजवाहीर व ढालतलवार याप्रमाण देऊन देऊन श्रीमन्महाराज राजश्री संभाजी महाराज छत्रपति नदी आलीकडे
आपल्या डेराच्या मुक्कामास आले कह्राडहून उमरेजस उभयता बंधू महाराजाची सडी स्वारी जहाली त्याणी श्रीमन्महाराज छत्रपती संभाजी महाराजस हजारे रूपये सत्का करून बादली दुस्त व जड जवाहीर व हत्ती व रंगविलेले घोडे बादली जिनाचे दिले शाहूमहराजाच्या आग्रहाने उभयता ऐक्यता असून सातारासि शिमगी पौर्णिमा व्हावी म्हणून ममतायुक्त बोलून श्रीमन्महाराज राजश्री संभाजी महाराज छत्रपति यासि घेऊन सातारियास गेले, त्या समयी संपूर्ण सातारा शहरचे लोक बाहेर येऊन उभयता बंधूचा समारम पाहून सत्के व खैरात बहुत झाली आणि सातारास पेशव्यांच्या वाडयात मुक्काम जहाला दोन महिने मुक्काम होता संपूर्ण सरकारकडून व नामीनामी सरदार याणी श्रीमन्महाराज राजश्री संभाजी महाराज यांसि मेजवानी केली नऊ हत्ती व चाळीस घोडे व जडजवाहीर व दुस्त बहुमान आले शाहुमहाराज यांणी रवानगी समयी हत्ती व रंगविलेले घोडे व जडजवाहीर, व ढालतलवार व जडावाचा खजीर व दुस्तबादली व रोख दोन लक्ष रुपये दिले आणि रवानगी केली बरोबर सरकारकून युवराज फत्तैसिंग भोसले फौजनिशा देऊन श्रीमन्महाराज याची स्वारी पन्हा पनाळियास पावती केली शाहू महाराज चार कोस येऊन माघारे सातारियासि गेले त्या वेळेस तहनामा जहाला त्याची यादी अलाहिदा असे कलम
---------------------------------------
⚔️⚔️शाहू छत्रपती महाराज व शंभुछत्रपती यांचे दरम्यान वारणेचा तह⚔️⚔️
१७३१ साली तहनामा झाला त्यातील काही कलमे
---------------------------------
लेख समकालीन कागदपत्रे नोंदी :--राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य पुणे तर्फे संस्थापक संतोष झिपरे ९०४९७६०८८८
------------------------------------
तहनामा
⛳⛳ चिरजींव राजश्री संभाजी राजे यांसि प्रति राजश्री शाहूराजे यांनी लिहून दिल्या⛳⛳
कलम १
इलाखा वारुण महाले तहत संगम दक्षिणतीर कुल दुतर्फा मुलुख दरोबस्त देखील ठाणी व किल्ले तुम्हांस दिले असत.
कलम २
तुंगभद्रेपासुन तहत रामेश्वर देखील संस्थाने निम्मे आम्हांकडे ठेऊन निम्मे तुम्हांकडे करार करुन दिले आहे.
कलम ३
किल्ले कोपाळ तुम्हांकडे दिला त्या बदल्यात तुम्ही रत्नागिरी आमच्याकडे दिला.
कलम ४
वडगावचे ठाणे (किल्ला) पाडून टाकावे.
कलम ५
तुम्हांसी जे वैर करतील त्यांचे परिपत्य आम्ही करावे आम्हांशी वैर करतील त्यांचे परिपत्य तुम्ही करावे
तुम्ही आम्ही एक बिचारे राज्यवृध्दी करावी
कलम ६
वारणेचा व कृष्णेच्या संगमापासुन दक्षिणत्तोर तहत निवृत्तिसंगम तुंगभद्रे पावतो दरोबस्त देखील गड ठाणी तुम्हांकडे दिली असत.
कलम ७
कोकणात साळशी पलीकडे तहत पंचमहाल अकोले दरोबस्त तुम्हांकडे दिले असत.
कलम ८
इकडील चाकर तुम्ही ठेऊ नये तुम्हांकडील चाकर आम्ही ठेऊ नये.
कलम ९
मिरजप्रांत - विजापूरची ठाणी देखील अथणी,तासगाव. वगैरे तुम्ही आमचे स्वा्धीन करावी .
एकूण नऊ कलमे करार करून तहनामा लिहून दिल्हा असे सदर प्रमाणे आम्ही चालू यांस अंतरात होणार नाही
-----------------------------------
लेख :-राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य पुणे तर्फे संस्थापक संतोष झिपरे ९०४९७६०८८८
----------------------------------------
⛳⛳छत्रपती संभाजी महाराज व मातोश्री जिजाबाई साहेब कुलदैवत दर्शन सातारा मुक्कामी ⛳⛳
आनद नामसवत्सरे सन खमस सल्लासीन साला श्रीमन्महाराज राजश्री संभाजी महाराज व श्रीमन्महाराज सकळ सौभाग्यासपन्न मातुश्री जिजाबाई साहेब याची स्वारी आदी जेजूरीस जहाली तेथून से+रीस मुक्काम जहाला प्रतापगडास स्वारी तेथून जहाली श्रीचे दर्शन घेऊन सप्तरात्र मुक्काम तेथे होता तदनतर कूच होऊन महाबळेश्वरा सात दिवस मुक्काम होता तेथून स्वारी सातारियास जहाली ते समयी शाहू महाराज व समस्त सरदार व सरकारकून समवेत वेदनदी पर्यंत सामोरे येऊन उभयता महाराजांच्या भेटी होऊन सातारियास जाऊन श्रीमन्महाराज छत्रपति संभाजी महाराज व श्रीमन्महाराज सकळ सौभाग्याद सपन्न मातुश्री जिजाबाई साहेब याचा मुक्काम प्रधानपंताच्या वाड्यात जहाला
दोन महिने मुक्काम तेथे होता उपरात महाराज व श्रीमन्महाराज सकळ सौभाग्यादि सपन्न मातुश्री जिजाबाई साहेब यांची स्वारी श्रीशिखरास दर्शनास जहाली महादेवा पर्यत शाहूराजे महाराज याची स्वारी जहाली तेथून कूच करुन निघाले नंतर शाहू महाराज कृष्णातीर नजीक बोरगाव येथपर्यंत सामादिक सहवर्तमान (आले) श्रीमन्महाराज राजश्री संभाजी महाराज छत्रपति श्रीमन्महाराज सकळ सौभाग्यादि संपन्न मातुश्री जिजाबाई साहेब स्वारी करवीरास जहाली मग शाहू महाराज याची स्वारी बोरगावाहून सातारियास जहाली
---------------------------------
लेख :--राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य पुणे तर्फे संस्थापक संतोष झिपरे९०४९७६०८८८
------------------------------------
🌞🌞 मातुश्री जिजाबाई साहेब कडून सन्मान 🌞🌞
१इहिद्दे आबैन रोद्रीनामसवत्सरे श्रीमन्महाराज राजश्री संभाजी महाराज छत्रपति व श्रीमन्महाराज सकळ सौभाग्यादि संपन्न मातुश्री जिजाबाई साहेब याची स्वारी सातारियासि जहाली ते समयी पाली पर्यंत श्रीपतराव व बाळाजी पंडित व सदाशिव चिमणाजी व जनार्दन बाजीराव असे पुढे आले महाराजाची स्वारी पूढे होती तेथे पंडित मशारनिल्हे याणी दर्शन घेऊन जोहार केले उपरात चादरा देऊन बहुमान कूले तदनतर महाराजांची आज्ञा घेऊन श्रीमन्महाराज सकळ सौभ्गयादि संपन्न मातुश्री जिजाबाई साहेब यांच्या जोहारास आले ते समयी बराबर चादरा दोन होत्या त्या आदी श्रीपतराव याच्या आगावरी घालते समयी त्याणी अर्ज केला की " ही मुले आहेत त्यासि चादरा आदी धाव्या, उपरात आम्ही म्हातारे आहोच त्या उपरी त्रिवर्गापैकी दोघास चादरा दोन व शेला एक या प्रमाणे दिले उपरात श्रीपतराव यासि दिले याणी पुढे स्वारी जहाली तेव निमपाडळीपर्यत शाहू महाराज सामादिकसह
--------------------------------------
वारणेचा तहाची छत्रपती थोरले शाहू महाराजांनी ताबडतोब अमलात आणली हो या पत्रावरून दिसुन येते
श १६५३चै व ६
तारीख १६-४-१७३१
फेरिस्त न ४
!!श्री!!
सन ११४०फसली
स्वस्ति श्री राज्याभिषेक शके ५७विरोधिकृत नाम सवत्सरे चैत्र बहुल ६मृगवासरे क्षत्रिय कुलावतस श्रीराजा शाहू छत्रपतीस्वामी यांनी राजश्री सुभानराव मोरे यास आज्ञा केली ऐशी जे स्वामीची व चिरजाव राजश्री संभाजी राजे यांची भेट झाली वारणेपासुन तुगभ्रदा पावेतो मुलूख दरोबस्त देखील गड, कोट ,ठाणी त्यांजकडे दिली किल्ले कोपल चिरंजीव राजश्री याजकडे देविले असे तरा पत्रे घेऊन येतील त्याच्या स्वाधीन कोपल किल्ला करणे जणिते बहुत काय लिहिणे,
मोर्तब
--------------------------------------
लेख व माहिती संकलन राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य पुणे तर्फे संस्थापक संतोष झिपरे९०४९७६०८८८
तळटीपा :-१)जोहार -मुजरा
२)सभूसिंग जाधवराव :-हे सरसेनापती धनाजी जाधव राव यांची दितीय पुत्र सेनापती धनाजी जाधव यांच्या निधनानंतर सेनापती पदी छत्रपती शाहू महाराजांनी पुत्र चंद्रसेन जाधवराव यास दिले पण नंतर चंद्रसेन निजामकडे गेल्या वर काही सेनापती पदी छत्रपती शाहू महाराजांनी धनाजीपुत्र सभूसिंग उर्फ संताजीराव जाधवराव यास दिलेयावेळीस सेनापती होते
३)शिमगी पौर्णिमा :-होळीची पौर्णिमा
४)मातुश्री जिजाबाई साहेब :-या कोल्हापूर कर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी व या तत्कालीन कालखंडात महाराणी माँसाहेब असे उल्लेख आहेत मराठ्यांच्या इतिहासातील कर्तृत्ववान स्त्री म्हणून महाराणी मातोश्री जिजाबाई साहेब याची उल्लेख केला जात कारण छत्रपती संभाजी महाराज यांच्या निधनानंतर कोल्हापूर गादीची कारभारावर प्रचंड प्रभाव व कणखर नेतृत्वाखाली राज्यकारभार सांभाळले तो महाराणी मातोश्री जिजाबाई साहेब यांनी.
५)उमरजे :-हे गाव तत्कालीन कालखंडात कसबा आहे म्हणजे आजच्या भाषेत तालुका आजचे पूर्ण कराड तालुक्यातील कारभार येथून होते असा येथील जाधवराव वाड्यात छत्रपती थोरले शाहू महाराजांनी तहाअगोदर काही दिवस मुक्काम केला आहे तसेच वारणेचा तहानंतर छत्रपती थोरले शाहु महाराज व छत्रपती संभाजी महाराजांनी उमरजे येथे मुक्कामी होते हो वरील उल्लेख आले आहे या घराण्यातील सरदार सटकुजी अथवा सटवोजी जाधव, सरदार यसोजी जाधव, सरदार मानाजी जाधव व सरदार कुसाजी जाधव हे सरदार येथे जाधव घराण्यातील होते छत्रपती च्या हुजूर पागतील शिलेदार म्हणून उल्लेख सापडते उमरजेकर जाधव घराण्यातील (या सरदारतील एखाद्या नाव कमीजास्त प्रमाणात होईल संशोधन सुरु आहे )
६)श्रीचे दर्शन :-छत्रपती घराण्यातील कुलस्वामिनी प्रतापगडावरील भवानी
७)सप्तरात्र-सात दिवस रात्री
८)श्रीशिखरास दर्शनास-छत्रपति घराण्यातील कुलदैवत श्रीशिखर शिगांणपूर थेथील शंभुमहादेव
९) सहवर्तमान -छत्रपती थोरले शाहू महाराज आपल्या संपूर्ण सहकुटुंब कबिला घेऊन आले असे अर्थ घ्यावा
१०)पाली पर्यंत -पाली येथील खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी गेले
११)ही मुले आहेत त्यास चादरा आदी धाव्या - राजा हे प्रजाची सांभाळ पिताप्रमाणे करते तर महाराणी हे आईच्या नजरेतून प्रजाकडे पाहते असे अर्थ घ्यावा सदर उल्लेख म, बाळाजी पंडित, सदाशिव चिमणाजी व जनार्दन बाजीराव या साताराकर छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या कारभारी मडंळीची सत्कार आपले मुले समजून महाराणी जिजाबाई साहेब माँसाहेब यांनी केला आहे उगीचच......
१२)सत्के -सत्कार, आदरतीर्थ, मानसन्मान
१३)सुभानराव मोरे-बहुतेक हे जावळीकर मोरे घराण्यातील असावेत कारण १७०७पासुन कोप्पल किल्लावरील किल्लेदार व गड सरनोबत म्हणून या घराण्यातील तीन सरदारांची नाव सापडतात जो छत्रपती शाहू चरित्रात कोप्पलकर मोरे म्हणून ओळखला जातात
१३)आमच्या अभ्यासनुसार तळटीपा दिले आहे यांची नोंद घ्यावी
----------------------------------
फोटो नेटसाभार :-सातारा शहरातून छत्रपती थोरले शाहू महाराज सातारा कर व छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूरकर यांची भव्यदिव्य लावजामसह सातारा नगरीत एकच अंबारीत बसुन निघालेले मिरवणूक हे फोटो कोल्हापूर छत्रपती च्या वाड्यात आजपण आहे
----------------------------------
आपले
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य पुणे तर्फे संस्थापक संतोष झिपरे ९०४९७६०८८८

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...