भाग २८
इसवी सन सतराशेसाठ मध्ये उद्गीरची लढाई झाली त्यात मोगलांकडील चंडोल यशवंतराव पवार यांनी बुडविला यावेळी यशवंतरावांनी मोठया पराक्रमाने कवठयाच्या रानात मोगलांचे चंडोलचा अगदी मोड केला .(फडके परमार इतिहास पुस्तक 56 ) व फत्ते मिळवली.असे सांगतात की कवठयाजवळ घोडनदीच्या काठी फत्तेश्वर महादेवाचे देवालय यशवंतरावांनी बांधले आहे. ते या गोष्टीचे स्मारक आहे. या स्वारीत व श्रीरंघपट्टण वगैरे कडील स्वाऱ्यात यशवंतरावांनी पुष्कळ लूट मिळवून आणली व ती सर्व पेशव्यांना अर्पण केली. त्यातून पेशव्यांनी एक राज राजेश्वराची सुंदर मूर्ती व चौघडा यशवंतरावांना दिला. ही लुटीत मिळवलेली राज राजेश्वर ची सुंदर मूर्ती धार येथील राजघराण्यातील देवालयात तेव्हापासून कुलस्वामिनी म्हणून पुजली जात आहे. तसेच संस्थानातील राजवाड्यावर चौघडा ही त्याच वेळेपासून आहे या चौघडयाच्या पितळी नौबदी वर कानडी लिपीत व भाषेत उत्कीर्ण लेख व काही चिन्हे आहेत. यशवंतरावांना कर्नाटकातील विजया पासूनच जरीपटका आणखी 25०० स्वारांचे पथकही देण्यात आले.
अशा रीतीने यशवंतरावांनी निरनिराळ्या मोहिमांत पराक्रम गाजवून शेवटी इसवीसन 1761 च्या पानिपत येथील महा रणयज्ञात मराठी सम्राज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देऊन आपली तेजस्वी कारकीर्द संपविली.
असा हा यशवंतराव पवारांच्या इसवी सन 1734 पासून 17 61 पर्यंतच्या हालचालींचा अगदी थोडक्यात वृत्तांत आहे. या 27 वर्षांच्या काळात यशवंतरावांनी अत्यंत महत्वाच्या कामगिर्य् बजाविल्या आहेत. इतकेच नव्हे तर त्यांनी आपल्या कारकिर्दीत एका वर्षाचा देखील खंड पडू न देता कधी उत्तरेस तर कधी दक्षिणेस याप्रमाणे एक सारख्या मोहिमांवर मोहिमा करुन मराठी साम्राज्याचा विस्तारासाठी जे अविश्रांत परिश्रम केले ते खरोखरच त्यांच्या सारख्या विरास अत्यंत भूषणावह असून त्यांच्या वंशजास अभिमानास्पद आहेत, यात काही शंकाच नाही !
संग्रहण -
*महेश पवार व अनिल पवार*
इतिहास माहिती प्रसारक व
सोशल मिडिया प्रमुख ,
*राजे धार पवार युवा संघटना*
*अध्यक्ष सुर्यजीत पवार*, महाराष्ट्र राज्य
(अनमोल सहकार्य :- गडप्रेमी श्री.बाळासाहेब पवार)
No comments:
Post a Comment