विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 13 November 2021

#मराठा_साम्राज्यात_पवारांची #विशेषता_धारच्या_पवारांची_कामगिरी भाग २२

 


#मराठा_साम्राज्यात_पवारांची
भाग २२
इसवी सन 1738 चा पावसाळ्यानंतर पोर्तुगीजांवर जंगी मोहिम करण्यासाठी सर्व मोठे मोठे सरदार तिकडे पाठविण्यात आले. या मोहीमेवरच पुढे ह माळव्यातील प्रमुख सरदारही गेले. इसवीसन 1739 जानेवारीत ही वसईची मोहीम जोरात होती. त्यावेळी तारापूरच्या हल्ल्यात यशवंतरावांनी चांगले शौर्य दाखविले.( ब्र च ले 49 ) या स्वारीत देवासचे तुकोजी पवार हजर होते. वसईचे कारस्थान रंगात येऊन चिमाजीआप्पा व मोठ्या फौजा वसई काबीज करण्यात गुंतल्या होत्या; तितक्यात नादीरशहाची धाड दिल्लीवर आली. मराठा मंडळाची व छत्रपती शाहू महाराजांची इच्छा बादशाह मदत करून नादिरशहास घालून द्यावा अशी होती ; परंतु सर्व फौजा वसईकडे गुतल्यामुळे , बाजीरावास एकदम जोराने हिंदुस्थानात जाता आले नाही. माळव्याची फौज मल्हारराव होळकर , राणोजी शिंदे व यशवंतराव पवार यांच्या हाताखाली पाठविण्याबद्दल बाजीरावांनी पिलाजी जाधव यांना लिहिले होते. (राजवाडे खंड 6 ले. 130) त्याप्रमाणे वसई कडील काम आटोपताच पवार , होळकर व शिंदे सरदार फौजांसह रवाना झाले व नंतर बाजीराव वही नादिरशहाच्या स्वारीस निघाले ; परंतु तारीख 22 मे चे सुमारास बाजीराव बर्हाणपुर जवळ आले असता, तेथे नादिरशहा निघून गेल्याची खबर त्यांना कळली. स्वारीवर निघालेली सरदार मंडळी माळव्यात येऊन पुढे बुंदेलखंडात गेली. बाजीरावही बुंदेलखंडात आले. तेथे तारीख एक जुलै सतराशे 39 रोजी छत्रसालाच्या मुलाशी एक करार झाला त्यात बाजीरावांनी मल्हारराव होळकर,राणोजी शिंदे व यशवंतराव पवार यांना आपल्या तर्फे मध्यस्थ म्हणून ठेवले होते.( तह करार मदार पृष्ठ 9 ) यानंतर बाजीराव परत पुण्यास आले.( शकावली पृष्ठ 84)
यानंतर दक्षिणेत नासिरजंगाच्या स्वारीवर जाऊन बाजीराव पुन्हा सतराशे 40 च्या मार्च महिन्यात उत्तरेकडे आले; ते पुढे खरगोन जिल्ह्यात रावेरखेडी येथे रेवातीरी तारीख 28 एप्रिल 1740 रोजी वारले.(ई.1925 पासून रावेरखेडी येथें बाजीरावांच्या समाधी जवळ त्यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम देवास पाती 2 चे दिवाण रावसाहेब य्ं)
बाजीरावांच्या मृत्यूनंतर निजामाने पुन्हा गडबड सुरू केली त्याने मोठा उपक्रम म्हणून उपद्व्याप मांडुन अजीमुल्लाखानास माळव्याची सुभेदारी देऊन वस्त्रे देऊन रवाना केले.
संग्रहण -
*महेश पवार व अनिल पवार*
इतिहास माहिती प्रसारक व
सोशल मिडिया प्रमुख ,
*राजे धार पवार युवा संघटना*
*अध्यक्ष सुर्यजीत पवार*, महाराष्ट्र राज्य🙏
(अनमोल सहकार्य :- गडप्रेमी श्री.बाळासाहेब पवार)

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...