पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील ऐतिहासिक पणदरे गावात जगताप पाटीलांचा वाडा आहे. सासवड प्रमाणे पणदरे गावामध्ये जगताप परिवार मोठया प्रमाणामध्ये आहे. पणदरे गाव बारामतीपासून १२कि.मी अंतरावर आहे. पणदरे गावामध्ये जगताप घराण्यातील अनेक शूर होऊन गेले त्यांचे काही वाडे गावामध्ये आहेत. तसेच काही जणांनी आपले वाडे आपापल्या शेतामध्ये बांधून घेतले भिकोबानगर , मानपवस्ती , जगताप वस्ती , पवई , सागोबाचीवाडी अश्या अनेक वस्त्यांवरती जगताप घराण्यातील वाडे आहेत .बाजूने बारा-बलुतेदार वाड्याच्यामध्यभागी जगताप वाडा आहे. जगताप वाडा हा बारा- बलुतेदारांच्या मध्ये असल्यामुळे मुस्लिम बांधवांच डोल हे वाड्याच्यासमोरून मुस्लिम बांधव डोल नेण्यास परंपरेने सुरुवात केली जाते. डोल गावातून फिरवून ते मशिदीत आणले जाते वाड्याच्या पाठीमागे ग्रामदैवत भैरवनाथ देवाची काठी यात्रेच्या दिवशी वाड्याच्यापाठीमागुन देवाची काठी नेण्यास सुरुवात केली जाते. देवाची काठी गावातून फिरवून मंदिरात आणली जाते. इ.स. १८८९ साली प्लेग हा रोग आल्यामुळे गावातील लोकांनी आपली घरे, वाडे सोडून रानात राहण्यासाठी गेले. गावातील हा वाडा काही वर्षांनी खचला गेला. वाड्याची कमान आणि बुरुज इ.स.१९७८ सालापर्यंत होते. वाड्याच्या भिंतीची रुंदी ४ फुटापेक्षा जास्त आहे. भिंतीला चिकटून बुरूज अस्तित्वात आहे. इ.स.१८८९ साली जगताप कुटुंबीय रानात राहिला गेल्यामुळे गावातील वाडा पडत गेला. प्लेगची साथ संपल्यानंतर काहीजण परत गावातील वाड्यात रहायला आल्यावर वाडा पडलेल्या अवस्थेत असल्यामुळे वाड्यात आपआपल्या वाटणीनुसार नवीन घरे बांधण्यात आली.
गावातील वाड्याची ३ जणांत वाटणी झाली.पहिला भाग आप्पाजी जगताप यांना दुसरा भाग सिद्राम जगताप यांना तिसरा भाग मानसिंगराव पाटील जगताप यांना आला. वाटणीतील तिसरा भाग आलेले मानसिंगराव (पाटील) जगताप यांनी सस्ते पाहूण्यांना विकला. गावातील जुनी लोक सांगतात की राजमाता जिजाऊ माता यांचे माहेर सिंदखेड जाधवराव वाड्याच्या बाजूने बारा-बलुतेदार आहेत. त्याप्रमाणेच पणदरे गावात जगताप वाड्याच स्वरूप आहे जगताप वाड्याच्या चारी पाची बाजूने सर्वप्रकारचा समाज आहे.
वस्तीवरचा जगताप वाडा-
इ.स.१८८९ साली रानात राहिला गेल्यावर रानात म्हणजे वस्तीवर वाडा बांधला गेला. हा वाडा पांढऱ्या मातीच्या भेंड्या बांधून बाहेरून दगडीभिंत बांधून चूण्याचा वापर केला होता. हा वाडा 2 भावांमध्ये बांधला गेला. पणदरे गावात पहिल्यांदाच स्लॅप घर बांधण्यात आल्यामुळे गावातील लोक वस्तीवरच्या वाड्यावर स्लॅप पाहण्यासाठी येत असत. वाड्यातील स्लॅपचे घर पाहून गावातील ग्रामपंचायतीची मातीची इमारत पाडून स्लॅपची नवीन ग्रामपंचायत इमारत बांधण्यात आली. वाड्यामध्ये श्री स्वामी समर्थाच मंदिर आहे. वाड्याच्या समोर पार असून पारामध्ये उंबराच झाड आहे. या वस्तीला अनंतराव(फक्कडआण्णाची वस्ती)(बाग) नावाने ओळखले जाते. ८०% भावकी वस्तीवर तर २०% भावकी गावात राहत आहे. सगळ्या वस्ती धरून त्याच नाव जगताप वस्ती असे आहे.
माहिती साभार : जयंत जगताप पाटील
टीप : आपल्या गावांध्ये काही जगताप घरण्यासंबन्धी ऐतिहासिक माहिती असल्यास संपूर्ण माहिती छायाचित्रणासोबत पाठवावी .
No comments:
Post a Comment