विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 12 December 2021

#महाजनपद_कालीन_महाराष्ट्र

 #महाजनपद_कालीन_महाराष्ट्र

---------------------------------------
पोस्त्साम्भर :

Shubham Gaikwad

महाराष्ट्राचा इतिहास म्हटला तर आपल्या डोळ्यांसमोर पहिलं नाव येतं ते म्हणजे आपल्या दैवताच छत्रपती शिवाजी महाराजांचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी नक्कीच महाराष्ट्र घडवला महाराष्ट्रच काय आजचा हा जो हिंदुस्थानचा नकाशा आहे तो फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज हा हिंदू धर्म अस्तित्वात आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच.....
पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर या महाराष्ट्राची काय ओळख होती. हा प्रश्न नक्कीच सर्वांच्या मनात येत असेल तर त्याच प्रश्नाचे उत्तर आज आपण पाहणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर महाराष्ट्रात कोणते क्षत्रिय मराठा राजवंश होऊन गेले कोणते राजे होऊन गेले त्याबद्दलची माहिती आपण आज पाहणार आहोत प्राचीन महाराष्ट्राचा इतिहास पाहणार आहोत.
तर त्यात आपण अगदी सुरुवातीपासून महाभारत कालापासून द्वापारयुगापासुन महाराष्ट्राचा इतिहास पाहूयात. आज जसे भाषावार प्रांत आहेत. भाषे नुसार राज्यांची रचना आहे पूर्वी असे नव्हते पूर्वी महाजनपद पद्धती होती. आणि या महाजनपदांमध्ये दोन प्रकार पडतात पहिला म्हणजे महाभारत कालीन द्वापार युगातील महाजनपद आणि दुसरा म्हणजे महाभारताचे युद्ध झाल्यानंतर सर्व महाजनपद नष्ट झाले. त्यामुळे महाभारताच्या युद्धानंतर पुन्हा नव्याने महाजनपदांची स्थापना झाली आणि कलियुगाचा आरंभ झाला.
प्रथमतः आपण महाभारतकालीन द्वापार युगातील कुठल्या महाजनपदा मध्ये महाराष्ट्राचा भूभाग येत होता ते पाहू.
महाभारत कालीन महाजनपद:- महाभारत काळात द्वापारयुगात जे भारतात महाजनपद होते. त्यामध्ये महाराष्ट्र हा #विदर्भ महाजनपदाचा हिस्सा होता. ज्याला आज देखील विदर्भच म्हटले जाते. विदर्भ या शब्दाचा अर्थ असा होतो. विर + तर्फ = वीर म्हणजे वीर पुरुष योद्धे आणि तर्फ म्हणजे प्रदेश विरांचा प्रदेश म्हणजे विदर्भ. कालांतराने वीर मधला र गायब झाला आणि तर्फ चा दर्भ झाला. आणि वीर तर्फ चा अपभ्रंश विदर्भ असा झाला.
भगवान #श्रीकृष्णांची पहिली पत्नी #श्रीरुक्मिणी माता याच विदर्भाची राजकन्या होती. रुक्मिणी मातेच्या वडिलांचे नाव #भिष्मक होते आणि आईचे नाव #शुद्धमती असे होते.
महाभारताचे युद्ध झाल्यानंतर महाभारत कालीन सर्व महाजनपद नष्ट झाले. आणि महाभारताच्या युद्धानंतर पुन्हा नव्याने 16 महाजनपद स्थापित झाले.
ते पुढील प्रमाणे:- 1)अंग 2)अश्मक 3)अवंती 4)चेदि 5)गांधार 6)काशी 7)काम्बोज 8)कोशल 9)कुरु 10)मगध 11)मल्ल 12)मत्स्य 13)पांचाल 14)सुरसेन 15)वज्जि 16)वत्स.
हे सर्व महाजनपद महाभारत कालानंतर म्हणजे कलियुगाच्या आरंभापासून 5000 वर्षे पूर्वीपासून तर इसवी सन पूर्व 6 शतकापर्यंत म्हणजेच आजपासून सुमारे 2600 वर्षे पूर्वी पर्यंत अस्तित्वात होते.
या सर्व महाजनपदांमध्ये महाराष्ट्र हा #अश्मक महाजनपदाचा हिस्सा होता. आणि अश्मक महाजनपद हे एकमात्र दक्षिण भारतातील महाजनपद होते. अश्मक महाजनपदावर भगवान #श्रीरामाचे वंशज म्हणजेच #इश्वाकु वंशीय राजे राज्य करीत होते. भगवान श्रीरामाच्या वंशातील इश्वाकु वंशातल्या अश्मक नावाच्या राजाने गोदावरी नदी किनारी #प्रतिष्ठानपुरी नावाचे नगर वसवले तेच आत्ताचे #पैठण होय. म्हणून या महाजनपदाला अश्मक महाजनपद म्हटले गेले. अश्मक महाजनपदाची राजधानी प्रतिष्ठानपुरी म्हणजेच सध्याचे पैठण ही होती.
याच अश्मक महाजनपदावर राज्य करणाऱ्या इश्वाकु वंशाला पुढे #शिसोदे म्हटले गेले. क्षत्रिय मराठ्यांच्या 96 कुळातील 92 क्रमांकाचे कुळ शिसोदे आहे. भोसले कुळ याच शिसोदे वंशाची एक शाखा आहे छत्रपती शिवाजी महाराज याच कुळातील म्हणून त्यांना #रघुकुलराज म्हणजेच भगवान श्रीरामाच्या कुळातील म्हटले गेले. याच शिसोदे कुळाची एक शाखा राज्यविस्ताराला उत्तरेत मेवाड ला गेली तिथे शिसोदे चा अपभ्रंश सिसोदिया झाला.
तर मराठी बंधूंनो हा झाला आपल्या महाराष्ट्राचा महाजनपद कालीन इतिहास लेख जास्तीत जास्त शेअर करा प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचवा.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...