श्रीमंत तिसरे तुकोजीराव उर्फ बापूसाहेब महाराज पवार
postsaambhar: mahesh pawar
के.सी.एस.आय , सेनासप्तसहस्री यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
श्रीमंत दुसरे कृष्णराव महाराज यांना पुत्र नसल्यामुळे त्यांनी त्यांचे बंधू श्रीमंत आनंदराव महाराज पवार, विश्वासराव यांचे चिरंजीव दिनांक 14 एप्रिल 1900 रोजी दत्तक घेतले व त्यांचे नाव तुकोजीराव असे ठेवले.
श्रीमंत तुकोजीराव महाराजांचा जन्म दि. 1 जानेवारी 1988 रोजी देवास येथे झाला होता. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण देवास येथे पूर्ण केले नंतर डेली कॉलेज , इंदूर व शेवटी मेयो कॉलेज , अजमेर येथे सन 1905 मध्ये ते डिप्लोमा एक्झामिनेशन चांगल्या मार्कांनी पास झाले .त्यानंतर तुकोजी महाराजांनी इंदुरास राहून कायद्याचा अभ्यास केला.
शिक्षण संपल्यानंतर देवास येथे परत आल्यावर महाराजांनी व्रतबंध, राज्याधिकारग्रहण व विवाह करण्याचे ठरविले होते. पवार घराणे पुरातन क्षत्रिय असून वेदोक्त कर्म या घराण्यात पूर्वापार चालू होती परंतु मधल्या काळात ती होणे बंद पडले म्हणून आपला आपल्या व्रतबंधापासून ती पुन्हा सुरू करण्याचा त्यांचा विचार होता , पण त्यास देवासच्या काही ब्राह्मण पुढाऱ्यांकडून विरोध झाला , तेव्हा महाराजांच्या वतीने अवधानी, अत्रे व गंधे दिवाण यांनी द्वारकेत शारदा पीठाच्या शंकराचार्यां पुढे हे प्रकरण मांडून त्यावर परमार उर्फ पवार कुळ क्षत्रिय असून त्यास वेदोक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे .अशा निकालाचे आज्ञापत्र मिळवले. तुकोजी महाराजांनी फक्त आपल्या राजघराण्यासच नाही तर पर्यायाने समस्त क्षत्रिय पवार घराण्यास परत वेदोक्ताचे हक्क मिळवून दिले.
दिनांक 24 फेब्रुवारी 1908 रोजी त्यांनी आपल्या संस्थानाची संपूर्ण राज्य सूत्रे हातात घेतली. त्यानंतर त्यांनी आपल्या संस्थानात नवीन पद्धतीच्या सुधारणा करण्यास आरंभ केला.दि. 1 जानेवारी 1913 रोजी त्यांनी नवीन राज्यघटना तयार करून घेऊन पाच सभासदांच्या प्रधान मंडळाची स्थापना करून राज्यकारभार सुरू केला. सन 1911 मध्ये दिल्ली येथे बादशहा जॉर्ज पंचम यांनी तुकोजी महाराजांना के.सी.एस.आर ही मानाची पदवी बहाल केली.
तुकोजी महाराजांनी मराठा समाजाच्या उन्नतीसाठी मोठे योगदान दिले. अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे ते एक थोर आधारस्तंभ होते. तुकोजी महाराजांनी धुळे,रत्नागिरी,जळगाव व मलकापूर येथे अनुक्रमे 1912, 1922, 1929 1933 साली भरलेल्या प्रांतिक मराठा शिक्षण परिषदेचे अध्यक्षस्थान भूषविले होते.
तुकोजी महाराजांनी आपल्या कार्यकाळात श्री महाराणी राधाबाई कन्या शाळा. किंग जॉर्ज हायस्कूल, श्री आनंद भुवन राजवाडा,तुकोगंज मार्केट, तोफखाना, श्री भगवतीद्वार सराय, श्री गोपाळ कृष्ण मंदिर इत्यादींची स्थापना केली.
अशा या राजकारणपटुता, विद्वत्ता,दूरदृष्टी,समयसूचकता,
दातृत्व व समाज बांधवां विषयी कळकळ असलेल्या महाराजांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
No comments:
Post a Comment