विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 6 January 2022

सुरत बदसुरत



महाराजांनी शाहिस्तेखान सारख्या बड्या सरदाराची फटफजिती केल्यानंतर त्यांच्या नावाचा मोठा बोलबाला अखंड हिंदुस्थानात झाला आणि मोगलांची मोठी बेइज्जती झाली औरंगजेबाला दिलेली चपराक कमी वाटली म्हणून की काय महाराजांनी बादशहाचे सुरतेसारखे अत्यंत श्रीमंत शहर लुटून दुसरा दणका द्यायचे ठरवले पुरेपूर तयारी करून सुरतेवर हल्ला देखील केला 6 जानेवारी 1664 पासून पुढे सतत 5 दिवस मराठ्यांनी सुरतेवर हल्ला केला व ती लुटून घेतली महाराजांनी हल्ला केला तेव्हा सुरतेचा प्रमुख मोगल अंमलदार इनायतखान हा पळून जाऊन किल्ल्यात लपून बसला होता आणि त्या भित्र्या खानाने किल्ल्यातून युक्त्या लढविण्यास प्रारंभ केला . महाराज सुरतेस येऊन एक दिवस झाला होता सुरत बेचिराख होत होती धनवान लोकांचे वाडे मराठे खणून काढून संपत्ती बाहेर काढत होते अशा परिस्थितीत खानाने आपला एक तरुण वकील वाटाघाटीसाठी महाराजांकडे पाठविला. त्याने आपल्याबरोबर वाटाघाटीनी

जी कलमे आणली होती, ती महाराजांना थोडीसुद्धा पसंत पडली नाहीत. ते उद्गारले, "खानाची असली कलमे स्वीकारायला आम

"आम्हीही काही बायका नाही. मला तुमच्याशी काही बोलायचे आहे," काही बायका नाही आहोत!" तेव्हा तो वकील उसनन म्हणाला, असे म्हणत एकदम तलवार उपसून त्याने महाराजांवर झडप घातली पण महाराजांचा अत्यंत दक्ष व चपळ असा शरीररक्षक त्यांच्या जवळ उभा होता. वकील धावून येत असता त्याने महाराज व वकील यांच्यामध्ये आपल्या तलवारीचा असा अचूक वार केला की, वकिलाची तलवार महाराजांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्याचा हात वरच्या वर उडविता

गेल; परंतु खुनी वकील इतक्या वेगाने महाराजांवर तुटून पडला होता की, त्याच्या धडकीबरोबर तेही खाली कोसळले. खुनी महाराजांचा अंगावरच पडल्याने महाराज रक्ताच्या थारोळ्यात पडले आहेत, असे दृश्य दिसू लागले. मारेकऱ्याने महाराजांचा खून केला, ही वार्ता वाऱ्यासारखी मराठ्यांच्या लष्करात पसरली. तेव्हा सुडाच्या भावनेने पेटून उठलेल्या मराठ्यांनी सुरतेत जो सापडेल त्याची कत्तल करा, अशा आरोळ्या ठोकल्या आणि तलवारी सरसावून कत्तलीला सुरुवातही केली परंतु सुदैवाने महाराजांना फारशी दुखापत झाली नव्हती. त्यांनी

वेळीच स्वत:ला सावरले आणि सुरतेमधील लोकांची कत्तल थांबवण्याचा आदेश दिला. त्याचबरोबर लष्कराच्या कैदेत असणाऱ्या सर्व गुन्हेगारांना

व कैद्यांना समोर आणण्याचा हुकूम दिला. खुनी वकिलासह चौघा जणांची डोकी उडविण्यात आली आणि इतर चोवीस जणांचे हात तोडण्यात आले. इतर कैद्यांमध्ये मि. अँथनी स्मिथ नावाचा एक इंग्रज कैदी होता. त्याचा हात तोडण्याची पाळी आली तेव्हा तो हिंदुस्थानी भाषेत खच्चून ओरडला, “एकपरी डोके उडवा; पण हात नको." त्याचे

डोके उडविण्यासाठी मराठ्यांनी त्याची हॅट काढलीसुद्धा; परंतु महाराजांनी कसला तरी विचार करून त्याला जीवदान दिले व त्याची शिक्षा थांबवली. याच स्मिथने पुढे कैदेतून सुटका झाल्यानंतर हा प्रसंग सविस्तर वर्णिला आहे. आपल्या राजावर झालेल्या खुनी हल्ल्याने मराठे खवळून गेले होते. आता त्यांनी सुरतेतील सर्व घरांना आगी लावून दिल्या. घरे व वाडे

जमीनदोस्त केले. सुरत खरोखरच बेसुरत दिसू लागली. आगी एवढ्या भयानक होत्या, की धुरांच्या लोटांमुळे दिवस रात्रीसारखा व रात्र दिवसासारखी वाटू लागली. अशा प्रकारे मराठ्यांच्या राजवरील प्राणसंकट एका शूर मराठा अंगरक्षकाच्या दक्षतेमुळे टळले त्या मर्द मावळ्याने थोडा जर गाफीलपना केला असता तर हिंदवी स्वराज्याची स्वप्ने तिथेच विरली असती पण तो मर्द मराठा कोण होता याचा संदर्भ कुठे सापडत नाही वरील कथा ही English Records Of Shivaji ( 1659- 1682) यावर आधारित आहे त्या इंग्रजांना मावळ्यांची नावे माहीत नसावी म्हणून च त्या मावळ्याचे नाव कळू शकत नाही 

अशा या असंख्य अपरिचित शूरवीर मावळ्यांना शिवविचार प्रतिष्ठान परिवारातर्फे एक मानाचा मुजरा 🙇🏻‍♂️🚩🧡

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...